काहीही झाले तरी महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचे महिमामंडन आणि उदात्तीकरण होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, १७ मार्च रोजी दिली. भिवंडी येथे 'श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर (शक्तिपीठ) परिसरा'च्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, आ. किसान कथोरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
Read More
( Chhatrapati Shivaji Maharaj magnificent temple in Bhiwandi ) भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा गावात शिवभक्त राजू चौधरी यांच्या संकल्पनेतून चार एकर जागेत छत्रपती शिवाजी महाराज मंदिर व शिवजन्म ते शिवराज्याभिषेक सोहळ्याचा जाज्वल्य देखावा उभारण्यात आला आहे. “गडकिल्ल्यांच्या धर्तीवर दुसरे व महाराष्ट्रातील पहिले असलेल्या या शिव छत्रपती मंदिरांचे लोकार्पण सोमवार, दि. १७ मार्च रोजी तिथीनुसार होणार्या शिवजयंतीदिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे,” अशी माहिती ‘शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट’चे संस्थ
(Bangladeshi) बेकायदेशीररित्या भारतात प्रवेश केलेल्या बांग्लादेशीवर कारवाई सुरू केली आहे. ठाण्यातील मनोरमा नगर येथे आयुर्वेदीक औषधांचा बाजार मांडून नागरिकांना गंडवणाऱ्या एकाला तर भिवंडीत दोन बांग्लादेशीना पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. भिवंडी पश्चिम येथे भरारी पथक व नारपोली पोलीस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत संशयित वाहनांमध्ये रू. ३ लाख ३१ हजार ६०९ रुपयांचा मुद्देमाल विनातपशील आढळला असून ज्यात चांदी व चांदीचे काम असलेल्या वस्तूंची बिले तपासणीदरम्यान सादर न केल्याने भरारी पथकाने हा मुद्देमाल जप्त केला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
एकीकडे लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सुरु असताना उबाठा गटाच्या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. भांडूपमध्ये डमी मशीनचे प्रात्यक्षिक दाखवल्याप्रकरणी उबाठाच्या दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे.
"वरून (हायकमांडचा) आदेश आला तरी शरद पवारांच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही", अशी भूमिका घेत भिवंडी जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे सांगली पाठोपाठ भिवंडीतही मविआसमोर बंडखोरी थोपविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
महाविकास आघाडीत सांगली आणि मुंबईच्या जागेसाठी रस्सीखेच सुरु असतानाच आता काँग्रेसच्या परस्पर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने भिवंडी ( Bhiwandi Loksabha ) मध्ये आपला उमेदवार घोषित केला आहे. त्यामुळे या जागेवरुन पुन्हा काँग्रेसमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे. भिवंडीतुन काँग्रेसचे इच्छुक उमेदवार दयानंद चोरघे यांनी अपक्ष निवडणुक लढवणार असल्याचं म्हणलं आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हाती घेतलेल्या ‘ठाणे – भिवंडी – कल्याण मेट्रो ५ मार्गिकेतील पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होत आले आहे. या पहिल्या टप्प्यातील ठाणे – भिवंडी या मार्गावरील सर्व स्थानकांच्या स्लॅबचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे आता स्थानकातील रुळ बसवणे आणि इतर कामे यासाठी सुरुवात करण्यात येणार आहे.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राज्यव्यापी ‘महाविजय २०२४’ लोकसभा प्रवासात शनिवार दि. २८ ऑक्टोंबर रोजी भिवंडी लोकसभा क्षेत्राचा दौरा करणार आहेत. या प्रवासात ते लोकसभा क्षेत्रातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघातील सुपर वॉरिअर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील व ‘संपर्क से समर्थन’ अभियानात भाग घेत सर्वसामान्य जनतेशी संवाद साधतील.
महाराष्ट्रात विक्रिस परवानगी नसलेला ५५ लाखांचा विदेशी मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क, कोकण विभागीय भरारी पथकाने भिवंडी येथे जप्त केला आहे.याप्रकरणी, रमेंद्रकुमार रमाकांत तिवारी (४८), रा. शेलारगाव, भिवंडी, आणि रियाज अली आबिद (५५), रा. म्हाडा कॉलनी,भिवंडी यांना अटक करुन गोदामातील परदेशी वाईनच्या ७५० मिलीच्या एकुण ५२८८ बाटल्या जप्त करण्यात आला.
भिवंडीतून लव्ह जिहादचे नवीन प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी आरोपी सिराज याने प्रथम या महिलेशी फेसबूकच्या माध्यमातून मैत्री केली. सिराजने महिलेला आपले नाव 'राजू' सांगितले होते. यानंतर सिराजने महिलेशी हिंदू परंपरेनुसार विवाह केला. काही दिवसांनंतर त्याने मुस्लिम म्हणून आपली खरी ओळख उघड केली आणि महिलेला इस्लाम धर्म स्वीकारायला लावला.
इसिस प्रकरणी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, पडघा येथील बोरिवली गावातील शमील नाचन याच्या घरात धाड टाकुन शोधमोहीम राबवली.यावेळी घरातुन दहशत माजवण्यासाठी लागणारी सामुग्री तसेच हार्डडिस्क,मोबाईल फोन आणि बॉम्ब बनविण्याबाबतची काही हस्तलिखिते जप्त करण्यात आली.
भिवंडी निजामपूर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने व शहराच्या विकासाच्या दृष्टीने भुयारी गटार योजना राबविणे आवश्यक होते. यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत भुयारी गटाराच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू असून हे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असे प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितले.
एमएमआरडीएच्या मेट्रो टीमने मेट्रो मार्ग ५ च्या ठाणे-भिवंडी दरम्यान प्रगतीपथावर असलेल्या मेट्रोच्या सर्व पूर्वनिर्मित घटकांची उभारणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. धामणकर नाका मेट्रो स्थानकावरील शेवटच्या प्लॅटफॉर्म स्तरावरील एल बीमच्या उभारणीसह या मार्गिकेच्या सर्व सहा स्थानकांसाठीच्या संपूर्ण घटकांच्या उभारणीचे काम पूर्ण झाले आहे.मेट्रो मार्ग ५ हा मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा ठाणे - भिवंडी - कल्याण दरम्यान २४.९ किमीचा उन्नत मेट्रो मार्ग आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबई शहर, उपनगरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते, रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. गावागावातील नदी, नाले, ओहोळ तुडुंब भरून वाहत असून, छोटे-मोठ्या पुलांवरुन पाणी वाहत आहे. गावागावातील नदी, नाले, ओहोळ तुडुंब भरून वाहत असून, छोटे-मोठ्या पुलांवरुन पाणी वाहत आहे. मराठवाडा, विदर्भातही येत्या काही तासांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे.
डोंगराच्या पायथ्यानजीक व नदी किनाऱ्याजवळ तसेच पावसाळ्यात पूर्णतः पाणी साचून चिखल व दलदलीमुळे भिवंडी तालुक्यातील मैंदे, वळणाचा पाडा, बिजपाडा या गावांमधील रस्ता वाहतुकीस त्रासदायक होत होता. त्यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानांतर्गत 'के ३१' तंत्रज्ञान वापरून एकूण १.७१९ किमी लांबीचा नाविन्यपूर्ण रस्ता तयार करण्याचे काम यशस्वीरित्या पुर्ण करण्यात आले. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, रुपाली सातपुते याच
भिवंडी : भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) सभापतीपदी भाजपाचे सचिन बाळाराम पाटील यांची, तर उपसभापतीपदी शिवसेनेचे मनिष वसंत म्हात्रे यांची आज निवड झाली आहे.
जंगलसंवर्धनाचा ध्यास घेतलेले भिवंडी, देवराई येथील दिनेश मेघे. कोकणा समाजातील दिनेश हे वनहक्क, ‘पेसा’ कायद्याचे विशेष तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या जीवनकार्याचा घेतलेला मागोवा...
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘कौशल्य विकास योजना’ व ‘स्टार्टअप’ योजना यांचा समन्वय साधून नवउद्योजक तरुणांना रोजगारनिर्मीतीची संधी उपलब्ध केली आहे. त्याचा फायदा घेऊन तरुणांनी नोकरी करण्याऐवजी नोकरी देणारे नवउद्योजक होण्याचा प्रयत्न करावा,” असे आवाहन केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले.
देशातील पहिले वनवासी कार्बन न्यूट्रल गाव भिवंडी तालुक्यात उभारण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय ग्रामविकास व पंचायत राजमंत्री गिरीराज सिंह यांच्यासमोर प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आल्यानंतर, त्यांनी प्रकल्पाला निधी देण्याचे जाहीर केले आहे. पहिले वनवासी गाव कार्बन न्यूट्रल करण्यासाठी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. जम्मूमधील पल्ली गाव हे देशातील पहिले कार्बन न्यूट्रल गाव झाले आहे. या गावात सौरऊर्जेचावापर केला जात असून, ग्रामपंचायतीतील सर्व रेकॉर्ड डिजिटल आहेत.
घर, संसार आणि नोकरीच्या रहाटगाडग्यात महिलांचे बरेचदा आपल्या वैयक्तिक आरोग्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. तेव्हा, आज, दि. ८ मार्च या जागतिक महिला दिनानिमित्ताने महिलांना त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य कसे संतुलित राखता येईल, यासाठी भिवंडी येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ, ‘यश नर्सिंग होम’ आणि ‘सोनोग्राफी सेंटर’मध्ये प्रॅक्टिस करणार्या आणि ‘इंडियन मेडिकल असोसिएशन, भिवंडी’च्या प्रेसिडेंट डॉ. उज्वला बरदापूरकर यांच्याशी केलेली ही खास बातचित...
भिवंडी तालुक्यातील कामवरी नदीत जलपर्णीमुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण झाले आहे. उल्हास नदीवर हर्बल फवारणी केल्यामुळे जलपर्णी कायमस्वरूपी नष्ट झाल्या आहेत. याच पद्धतीने जलपर्णी नष्ट करण्यासाठी कामवरी नदीसह राज्यात हर्बल फवारणी पद्धतीचा वापर करणार असल्याचे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत याबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत नळाने पाणी पुरविण्यासाठी सुरू केलेल्या ‘हर घर नल से जल’ योजनेतून जल जीवन मिशन अंतर्गत भिवंडी तालुक्यात जलक्रांती’ होत आहे. भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागातील १९६ गाव-पाड्यांमध्ये ‘जल जीवन मिशन’ व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून ३८१ कोटी रुपये खर्चून नळाने पाणीपुरवठा करण्याच्या योजनांचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते नुकतेच भूमिपूजन करण्यात आले.
भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेमध्ये सध्या कोणतीही भरती प्रक्रिया प्रस्तावित नसून तशी माहिती असल्यास ती अफवा आहे. अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक विजयकुमार म्हसाळ यांनी केले आहे.
ठाणे जिल्ह्यातील तानसा व मोडक सागर धरणाच्या परिसरात झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे ही दोन्ही धरणे लवकरच ‘ओव्हरफ्लो’ होऊन वाहण्याची शक्यता आहे.
ठाणे जिल्ह्यात बारावीपाठोपाठ दहावीतही सावित्रीच्या लेकीच अव्वल ठरल्या आहेत. माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२२ अर्थात दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला.
भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याकारणाने, भिवंडी परिसरात जमावाने २ भावांची मारहाण केली.
लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याचा मुद्दा प्रथमच राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला आहे. अखिल भारतीय लवणकार (आगरी) समाजाच्या नवी दिल्लीत सोमवारी झालेल्या बैठकीत दि. बा. पाटील यांचे विमानतळाला नाव देण्याबरोबरच समाजाच्या विविध मागण्यांसाठी रामलीला मैदानावर पावसाळ्यानंतर दोन लाख समाजबांधवांचा मेळावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
मोहम्मद पैगंबर यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मिडीयावर पोस्ट केली म्हणुन साद अश्पाक अन्सारी या युवकाला भिवंडी पोलिसांनी अटक केली आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या रॉ वॉटर पाईपलाईनची कल्याण फाटा भिवंडी येथे गळती काढणे, पावसाळ्यापूर्वी टेमघर येथे २२ केव्ही सबस्टेशनमध्ये अत्यावश्यक कामे करावयाची आहेत.
“कल्याणमध्ये मेट्रोचे काम अद्याप सुरू झालेले नसताना राज्य सरकार मात्र बिल्डरांकडून ‘मेट्रो सेस’ वसूल करीत आहे. ‘मेट्रो सेस’ हा जाचक आहे. ज्या भागात मेट्रो सुरू झालेली आहे, त्या भागात ‘मेट्रो सेस’ वसूल करणे योग्य आहे. पण, ज्या भागात मेट्रोचे कामच सुरू नाही त्याठिकाणी ‘मेट्रो सेस’ रद्द करावा,” अशी मागणी ‘एमसीएचआय’ या बांधकाम व्यावसायिक संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
प्रत्येक समाजातील बांधवांना आपल्याच समाजातील वाटणारे गणेश मोकाशी हे मुंबई क्षेत्र सामाजिक समरसता प्रमुख. महाराष्ट्र, गोवा राज्यात समरसतेचे कार्य करणार्या गणेश यांच्या कार्याचा घेतलेला हा मागोवा...
"राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगली येथे दि. २० एप्रिल रोजी झालेल्या सभेत कन्यादान या हिंदू धर्मातील पवित्र विधी संदर्भात वादग्रस्त विधान केलं. त्यांनी फक्त एका महिलेचाच नव्हे तर या धार्मिक विधी अंतर्गत लग्न झालेल्या राज्यातील अनेक महिलांचा सार्वजनिकरित्या अपमान केला आहे.", असे म्हणत भिवंडीच्या नीता वैभव भोईर यांनी राष्ट्रीय महिला आयोगाला पत्र पाठवलं आहे. त्याच बरोबर या महिलेकडून आयपीसीच्या कलम ३५४ आणि कलम ५०९ अंतर्गत मिटकरींविरोधात गुन्हा दाखल व्हावा अशी मागणीही करण्यात आली आहे.
राज्य सरकारमध्ये तीन पक्षांची महाविकास आघाडी असली तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून फोडाफोडीचे राजकारण सुरुच आहे.राष्ट्रवादीने तर काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला आहे
आगीच्या तीन घटना घडल्याने ठाण्यात खळबळ
राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्यावरून भाजप नेत्यांनी केली टीका
खडतर परिस्थितीवर मात करून कलागुणांच्या जोरावर जिद्दीने थेट विदेशात भरारी घेणाऱ्या पोलीस खात्यातील आरती आनंद बेळगली (माया पाटील) यांच्याविषयी...
बदलापूरपर्यंत मंजूर केलेल्या मेट्रोचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करावा, भिवंडी-कल्याण मेट्रोच्या निविदा काढाव्यात आणि भिवंडी तालुक्यातील ६० गावांना जोडणारा रिंग रोड तयार करून सुविधा द्याव्यात, आदी मागण्या खासदार कपिल पाटील यांनी एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवासन यांच्याकडे केल्या आहेत. या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन श्रीनिवासन यांनी दिले आहेत.
भिवंडी तालुक्यातील कारीवली गाव येथील मित्तल इंटरप्राइजेस या कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकून ठाणे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तब्बल १२ हजार जिलेटीन कांड्या आणि ३ हजार ८ इलेक्ट्रीक डिटोनेटर्सच्या स्फोटकाचा साठा सोमवारी रात्री जप्त केला.
आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगांवर धैर्याने मात करत उद्योजिका वैशाली कुंभार यांनी आज अनेक महिलांसमोर नवा आदर्शच मांडला आहे. पतीच्या निधनानंतर खचून न जाता, पतीने उभारलेले व्यवसायाचे साम्राज्य आज तितक्याच ताकदीने वैशाली सांभाळत आहेत. ’आर. के. असोसिएट्स’ या ‘आर्किटेक्ट अॅण्ड कन्सल्टिंग इंजिनिअर’ क्षेत्रातील नामांकित कंपनीच्या संचालिका वैशाली राजेश कुंभार यांनी जागतिक महिला दिनानिमित्ताने दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या माध्यमातून कथन केलेला त्यांचा प्रेरणादायी प्रवास...
‘लॉकडाऊन’च्या काळात गरीब, कामगार व मजूर वर्ग यांच्या मदतीला धावून जात भिवंडी महापालिकेतील भाजपचे विरोधी पक्षनेते नगरसेवक यशवंत टावरे यांनी माणुसकीच्या नात्याने प्रत्येक नागरिकाला अन्नधान्य, जेवण व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप भिवंडीसह आजूबाजूच्या गावांतदेखील केले. त्याचा अनेक गरजूंनी लाभ घेतला. तेव्हा, अशा या ‘कोविड योद्ध्या’च्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेणारा हा लेख...
भिवंडीतील इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता १० वर पोहोचला आहे. अजूनही दुर्घटनास्थळी अडकलेल्या २०-२५ जणांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. स्थानिकांनी एकूण १९ लोकांना बाहेर काढले. एनडीआरएफतर्फे बचावकार्य सुरू आहे. एका लहान मुलालाही वाचवण्यात यश आले आहे.
केंद्र सरकारने देशात ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ गावी परतण्याची परवानगी दिली आहे. केंद्र सरकारच्या परवानगीनंतर आज ठाणे जिल्ह्यातील भिवंडी रोड रेल्वे स्थानक ते गोरखपूर अशी विशेष श्रमिक रेल्वे रात्री १ वाजता १ हजार १०४ मजुरांना घेऊन रवाना झाली. या रेल्वेतील प्रवाशांना टाळ्यांच्या कडकडाटात जिल्हाप्रशासनाने निरोप दिला.
महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या १८९५ झाली आहे. यामध्ये मुंबईत ११३, रायगड एक, अमरावती एक, पुणे चार, मीरा-भाईंदर सात, नवी मुंबई दोन, ठाणे परिसर दोन, भिवंडीत एक, वसई विरार दोन, पिंपरी चिंचवड एक, असे १३४ नवे रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. पुण्यात कोरोनावर उपचार घेत असणाऱ्या दोन महिलांचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला. पुण्यातील एकूण मृतांची संख्या ३१ झाली आहे. नाशिकमध्ये १३, नागपूरमध्ये १४ आणि भिवंडीत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे
मुंबई : कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी जिथे जगभरातून प्रयत्न केले जात आहेत, त्याच वेळेस काही समाजातील लोकांनी याकडे दुर्लक्ष केल्याने हा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे. मुंबईत कलम १४४ लागू केले असतानाही मशिदीत नमाजपठणासाठी बाहेर पडलेल्या लोकांमुळे मंदीर ट्रस्टीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जे.जे. पोलीस ठाण्यात सुन्नी शाफी मशिदीच्या ट्रस्टींवर दीडशे जणांना मशिदीत एकत्र बोलावल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
‘द एज्युकेशन अहेड’ पुरस्कार प्रदान
४ नगरसेवक असणाऱ्या ‘कोणार्क विकास आघाडी’चा महापौर
भिवंडी-वाडा-मनोर या महामार्गावर बुधवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास डॉ. नेहा शेख (वय २५) या तरुणीचा दुचाकीवरून पडून अपघात झाला. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, यापूर्वीही झालेल्या विविध अपघातांप्रकरणी सुप्रीमो कंपनीला सर्वोच्च न्यायालयाने हा रस्ता दुरुस्त करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले नसते तर कदाचित डॉ. नेहा शेख हिचा जीव गेला नसता, अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
भाजपच्या ‘नवसंकल्प’ उपक्रमातून खा. कपिल पाटील यांनी शेलार गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच बलाढ्य महाराष्ट्रासाठी आगामी निवडणुकीत भाजपला मत देण्याचे आवाहन केले.