जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे आदरणीय शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार आता गप्प का? असा सवाल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बावनकुळेंनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत विरोधकांना सवाल केला.
Read More
व्यक्तीने कितीही मोठ्या पदावर असले तरी असंवेदनशील बोलू नये. पण विजय वडेट्टीवारांनी अत्यंत असंवेदनशील आणि देशातील जनतेला दुखावणारे वादग्रस्त वक्तव्य केले आहे, अशा शब्दात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वडेट्टीवारांना सुनावले आहे.
विजय वडेट्टीवारांना पहलगाममधील दहशतवाद्यांचा पुळका!
पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी हिंदू आहात का? असे विचारून लोकांवर गोळीबार केला, असे मृतांचे नातेवाईक सांगत आहेत. मात्र, जात विचारण्यासाठी दहशतवाद्यांकडे वेळ असतो का? असे असंवेदनशील वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
काँग्रेस आणि विजय वड्डेट्टीवार आतंकवाद्यांना क्लीन चीट देत आहेत, असा हल्लाबोल भाजपकडून करण्यात आला आहे. जात विचारण्यासाठी दहशतवाद्यांकडे वेळ असतो का? असे वादग्रस्त विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले होते. यावर भाजपने त्यांना खडेबोल सुनावले आहे.
विजय वडेट्टीवारांचे विधान म्हणजे एकप्रकारे शत्रूंना प्रोत्साहन देण्यासारखे आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सोमवार, २८ एप्रिल रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
काँग्रेस नेते दहशतवाद्यांना निर्दोष ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का? असा संतप्त सवाल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दहशतवादाला कोणतीही जात, धर्म नसतो. दहशतवाद्यांना लोकांकडे जाऊन त्यांच्या कानात त्यांचा धर्म कोणता आहे, हे विचारण्यासाठी वेळ असतो का? असे वादग्रस्त विधान केले होते. यावर आता बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिले.
दहशतवाद्यांना पाठीशी घालून तुम्हाला काय साध्य करायचे आहे हे जनतेला चांगलेच समजले आहे, अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर केली आहे. वडेट्टीवारांनी पहलगाम हल्ल्याबाबत केलेल्या विधानाला त्यांनी प्रत्युत्तर दिले.
Vijay Vadettiwar काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबावर केलेली टीका, ही याच प्रवृत्तीचे उदाहरण. वडेट्टीवार म्हणाले की, “गाण्यापलीकडे मंगेशकर कुटुंबीयांचे योगदान काय?” आपल्या देशात जेव्हा एखाद्या कुटुंबाने आपले संपूर्ण जीवन राष्ट्रसेवेच्या सुरांमध्ये गुंफले, तेव्हा त्यांच्या नावावर आज प्रश्न उपस्थित करणारी वृत्ती ही उलट्या काळजाचे प्रतीकच मानावी.
विजय वडेट्टीवार आणि संजय राऊत इंटरनॅशनल लीडर आहेत. त्यामुळे त्यांनाच प्रश्न विचारू द्या आणि त्यांनाच उत्तरे देऊ द्या, अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. गुरुवार, १० एप्रिल रोजी त्यांनी अमरावती येथे माध्यमांशी संवाद साधला.
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी राज्य सरकारची असून ज्या ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे त्या सर्वाना नियमाप्रमाणे मोबदला दिला जाणार आहे, असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
'एका माळेचे मणी, ओवायला नाही कुणी’ अशी काँग्रेसची गत. विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे मातब्बर पराभूत झाल्यामुळे महाराष्ट्र काँग्रेस दु:खी होईल, अशी अपेक्षा होती. कसले काय? दुसर्या फळीतील नेत्यांनी जणू दिवाळीच साजरी केली. त्यांच्या चेहर्यावरचा आनंद आजही कमी झालेला नाही. सर्वांत आनंदी झाले ते नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार. पटोलेंनी प्रदेशाध्यक्ष पद भूषवले असले, तरी सरंजामी नेते त्यांना कायम दुय्यम वागणूक द्यायचे, हे ते खासगीत कबूल करतील. त्यामुळेच बहुदा सरंजाम्यांच्या पराभ
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी शुक्रवार, १४ मार्च रोजी होळीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली. मात्र, यावर विजय वडेट्टीवार यांनी वेगळेच मत व्यक्त केले. नाना पटोलेंनी घाई केली असल्याचे ते म्हणाले
नरेंद्राचार्य महाराजांबद्दल वडेट्टीवारांनी केलेल्या वक्तव्यावर उबाठा गट गप्प का? असा सवाल मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी बुधवार, २६ फेब्रुवारी रोजी केला.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्याविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याच्या विरोधात राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ नरेंद्राचार्य महाराजांचे अनुयायी रस्त्यावर उतरले आहेत.
मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पूर्वीसारखी धार नाही, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यासांठी मनोज जरांगेंनी शनिवार, २५ जानेवारीपासून पुन्हा एकदा आंदोलन सुरु केले आहे. यावर वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया दिली.
संजय राऊतांचे विधान हा राजकीय बालिशपणा आहे, असे प्रत्युत्तर मंत्री उदय सामंत यांनी दिले. ते सध्या दावोस दौऱ्यावर असून त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत विजय वडेट्टीवार आणि संजय राऊतांच्या विधानावर पलटवार केला.
जागावाटपात घालवलेला वेळ हेदेखील महाविकास आघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण आहे. परंतू, हा वेळ घालवण्यामागे काही षडयंत्र होते का? असा संशय काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. शुक्रवार, १० जानेवारी रोजी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या सहकाऱ्यांवर पराभवाचे खापर फोडले.
कोणालातरी सर्वाधिक जागा लढवून राज्याचे मुख्यमंत्रीपद हवे होते, असे वक्तव्य संजय राऊतांनी केले आहे. जागावाटपास झालेला विलंब हे विधानसभेतील पराभवाचे मुख्य कारण असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली होती. शुक्रवार, १० जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत राऊतांनी यावर प्रत्युत्तर दिले.
मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काऊंटर होऊ शकतो, अशी माहिती आपल्याला मिळाल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. बीड सरपंच हत्या प्रकरण सध्या चांगलेच तापले असून यातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, वडेट्टीवार यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला.
मुंबई : काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार यांच्याविरोधात एक वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याला भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवार यांची निदान उपमुख्यमंत्री म्हणून जागा फिक्स आहे. तुमची विरोधी पक्षनेता म्हणून जागा कुठे आहे याचा शोध घ्यावा. दुसऱ्याच्या जागेची काळजी घेण्यापेक्षा आपली जागा कुठे गायब झालीय ती शोधा, असा टोला दरेकर ( Pravin Darekar ) यांनी वडेट्टीवार यांना लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत आहेत, याचा विदर्भाच्यादृष्टीने आनंद आहे. देवेंद्र फडणवीस लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून काम करतील आणि विदर्भाचा बॅकलॉग भरून काढतील, अशा शब्दांत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी फडणवीसांवर स्तुतीसुमने उधळली. त्यांनी शुक्रवार, २९ नोव्हेंबर रोजी माध्यमांशी संवाद साधला.
मुंबई : “काँग्रेससह महाविकास आघाडीचा जाहीरनामा फसवा असून त्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. मतांसाठी काँग्रेस खोटारडेपणा करीत आहे,” असे टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांनी रविवार, दि. १० नोव्हेंबर रोजी केली.
मतदारांशी बोलताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. भाजपकडून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून काँग्रेसचा हात, मतदारांचा घात, अशी टीकाही त्यांच्यावर करण्यात आली आहे.
१० एकर शेतीत ३ भाऊ असल्याने एका भावाला ४ एकर तर इतर दोन भावांना प्रत्येकी ३ एकर शेती मिळेल, असं विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलं आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत त्यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला.
महाविकास आघाडीचं जागावाटप संख्येनुसार नाही तर मेरिटनुसार झालं, असं वक्तव्य काँग्रेस नेते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारी यांनी केले आहे. त्यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला. जागावाटपासंदर्भात मविआच्या बैठका सुरु असून त्यांच्यातील तिढा अद्याप सुटलेला नाही.
विधानसभा निवडणूकीच्या जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीच्या बैठकांचं सत्र सुरु आहे. दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जागावाटपावर भाष्य केलं. गुरुवारी महाविकास आघाडीची अंतिम बैठक आयोजित करण्यात आली असून उद्या किंवा परवा जागावाटप जाहीर होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्याबाहेर भाजपने आंदोलन सुरु केलं आहे. चंद्रपूरमध्ये युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष असलेल्या अमोल लोडे याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. या घटनेच्या निषेधार्थ भाजपच्या युवा मोर्चाकडून हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे.
नितेश राणे हे हिंदूत्वादी नेते असून ते कळवळीने हिंदूत्वाचे विषय मांडतात, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. भाजप आमदार नितेश राणेच्या वक्तव्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तक्रार केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
विदर्भातील काँग्रेस नेते खासदार प्रतिभा धानोरकर आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यातील वाद पुन्हा उफाळला असून यावर तोडगा काढण्यासाठी दिल्ली दरबारी बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या वादावर आता तोडगा निघतो का? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
महाविकास आघाडीमध्ये १२५ जागांबाबत कुठलीही अडचण नसून तिन्ही पक्षांचं एकमत झालं आहे, अशी माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. तसेच लवकरच मविआची पुढची बैठक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला.
आपलं राज्य पहिल्या नंबरवर आल्यानंतर जे राज्य आपल्या कितीतरी मागे आहे ते राज्य पुढे आहे, असं म्हणणं म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही का? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना केला आहे. त्यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला.
विजयभाऊ आणि नाना भाऊ यांच्यात भाऊ भाऊ आणि एकमेकांना फाडून खाऊ, असं सुरु आहे, असा घणाघात भाजप नेते आशिष देशमुखांनी केला आहे. तसेच त्या दोघांमध्ये अजिबात पटत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी मंगळवारी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधला.
पुण्यातील कल्याणीनगर भागातील पोर्शे कार अपघात प्रकरणी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात खडाजंगी पाहायला मिळाली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला असून उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावर निवेदन केलं.
विधानसभा निवडणूकीच्या तारखांची घोषणा होण्याआधीच मविआमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन घमासान सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. उबाठा गटाच्या संजय राऊतांनी नेहमीप्रमाणे मुख्यमंत्रीपदावर दावा केला. त्यामुळे निवडणूकीआधी त्यांचा फाजील आत्मविश्वास वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीला जोरदार टोला लगावला आहे. महाविकास आघाडीमध्ये कुरघोड्यांचं राजकारण सुरु असून आगे आगे देखो होता है क्या? असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत मविआवर निशाणा साधला.
"मला तिकीट मिळू नये यासाठी काँग्रेसमधील अनेक लोकांनी सुपारी दिली होती," हे वक्तव्य आहे, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांचं. नाना पटोले विरुद्ध विजय वडेट्टीवार, नाना पटोले विरुद्ध बाळासाहेब थोरात आणि लोकसभेच्या जागावाटपावेळी पुढे आलेला नाना पटोले विरुद्ध वर्षा गायकवाड हे काँग्रेसमधील अंतर्गत वाद सर्वपरिचित आहेतच. परंतू, आता प्रतिभा धानोरकरांच्या या वक्तव्याने धानोरकर विरुद्ध विजय वडेट्टीवार हा नवा वाद पुढे आलाय. प्रतिभा धानोरकरांनी आपल्या वक्तव्यात कुणाचं नाव घ
आमच्या पक्षातील अनेक लोकांनी मला तिकीट न मिळण्यासाठी सुपारी दिली," असा धक्कादायक आरोप चंद्रपूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केला आहे. राजुरा येथे आयोजित सत्कार समारंभात त्या बोलत होता. दरम्यान, त्यांचा रोख विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावरच असल्याच्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहे.
विजय वडेट्टीवारांचे मुंगेरीलाल के हसीन सपने आहेत, असा टोला भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी लगावला आहे. तसेच जयंत पाटील भाजप किंवा काँग्रेसच्या वाटेवर असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला.
ज्या जागेवर विजय वडेट्टीवार निवडून येतात तिथेसुद्धा आता महायूतीचे लोकप्रतिनिधी निवडून येणार आहेत. त्यामुळे वडेट्टीवारांनी ४ जूननंतर भाजपवासी होण्याची तयारी करावी, असा टोला भाजप आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे. त्यांनी शुक्रवारी शिर्डीमध्ये माध्यमांशी संवाद साधला.
मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यातील दहशतवाद्यांशी काँग्रेसचा संबंध आहे. त्यामुळे काँग्रेसमधील लोकांचा आणि दहशतवाद्यांचा 'ये रिश्ता क्या कहलाता है'? असा प्रश्न देश विचारत आहे, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. बीडमध्ये मंगळवारी महायूतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
निवडणूकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असा दावा शरद पवार यांनी केला आहे. या वक्तव्याला काँग्रेस नेते नाना पटोले आणि विजय वडेट्टीवारांनी दुजोरा दिला आहे. शरद पवारांच्या म्हणण्यात तथ्य आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
संजय राऊत हा महाराष्ट्रातला बिलावल भुट्टो आहे, असा घणाघात भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे. मुंबईतील २६/११ च्या दहशदवादी हल्ल्यात शहीद हेमंत करकरे यांना लागलेली गोळी कसाबच्या बंदुकीतून लागली नसून ती एका रा.स्व.संघ समर्थक पोलीस अधिकाऱ्याने चालवली होती, असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. यावर उबाठा गटाच्या संजय राऊतांनीही टीका केली होती. त्यांना आता राणेंनी प्रत्युत्तर दिले आहे.
विजय वडेट्टीवारांच्या मताशी काँग्रेसचा संबंध नाही, असे म्हणत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी त्यांना चांगलाच दणका दिला आहे. काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी २६/११ च्या हल्ल्यातील शहीद हेमंत किरकिरे यांच्या मृत्यूबाबत गंभीर आरोप केला होता. याबद्दल रमेश चेन्नीथला यांना विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते सोमवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या आणि युवक काँग्रेसच्या नेत्या शिवानी वडेट्टीवार यांना पक्षाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. पक्षाच्या प्रचारात सहभागी न झाल्याबद्दल ही नोटीस बजावल्याचे सांगण्यात येत आहे. यासोबतच काही पदाधिकाऱ्यांनाही ही नोटीस बजावण्यात आल्याचे बोलले जात आहे.
विजय वडेट्टीवार हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचे राईट हँड असून ते लवकरच भाजपमध्ये जाणार आहेत, असा गौप्यस्फोट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केला आहे. तसेच यासंदर्भातील चर्चेत आपण उपस्थित असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी चर्चा करताना त्यांनी हा खुलासा केला.
माझ्या नादी लागू नका. आम्ही कपडे फाडण्यात एक्स्पर्ट आहोत, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना दिला आहे. विजय वडेट्टीवारांनी केलेल्या टीकेला त्यांनी बुधवारी जोरदार प्रत्युत्तर दिले.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना राजकारणाचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे ही निवडणूक माझ्यासाठी सोपी नाही, असे मत प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले आहे. काँग्रेसने दिवंगत नेते बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना चंद्रपूरमधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता चंद्रपूरात सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर असा सामना रंगणार आहे.
चंद्रपूर लोकसभेवरून काँग्रेसमध्ये प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यात रस्सीखेच सुरु असताना अखेर धानोरकरांना उमेदवारी मिळाली आहे. दरम्यान, उमेदवारीबद्दल आभार मानताना त्यांनी वडेट्टीवारांचं नाव घेणं टाळलं. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे लोकसभा निवडणूकीला घाबरले आहेत. तसेच पराभवाच्या भीतीने त्यांनी पळ काढला आहे, अशी टीका भाजप नेते आशिष देशमुख यांनी केली आहे. त्यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला