छत्रपती शाहू महाराज विद्यापीठाचे कुलगुरु आणि भारतीय विश्वविद्यालय संघाचे उपाध्यक्ष प्रा. विनय कुमार पाठक यांच्या नेतृत्वाखाली देशभरातल्या २०० कुलगुरुंनी राहुल गांधी यांना निषेधाचे पत्र लिहिले आहे. त्यांचे म्हणणे आहे की ”कुलगुरुंची नियुक्ती गुणवत्तेनुसार नाही, तर एका विशिष्ट संघटनेच्या इशार्यावर केली जाते असे राहुल गांधी म्हणाले. त्यामुळे राहुल यांनी देशभरातील विद्यापीठांची बदनामी केली आहे.” यावर वाटते की, राहुल गांधी कुलगुरुंची, देशातल्या विद्यापीठांची अशी बदनामी का करत आहेत?
Read More
घोडबंदर रोडचा गायमुख घाटरस्ता खराब झाल्याने अवजड वाहनांना होणारे अपघात रोखण्यासाठी या रस्त्याच्या दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग गायमुख घाटाचे खोदकाम करून ग्रॅडीएन्ट कमी करणार असुन यासाठी अडिच ते तीन महिने कालावधी लागणार आहे.सध्या केवळ वनखात्याची परवानगी मिळणे बाकी आहे. अशी माहिती ठाणे शहर वाहतुक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली. साधारण साडेनऊ कोटीचा खर्च अपेक्षित आहे. दुरुस्तीच्या कामामुळे या रस्त्यावर अवजड वाहतुकीला तीन महीने प्रवेशबंदी करण्यात येणार आहे.
दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय आणि राजकीय विश्लेषक शेख शौकत हुसेन यांच्यावर खटला चालवण्यास दिल्ली पोलिसांना परवानगी दिली आहे. या दोघांवर प्रक्षोभक भाषणे देऊन सामाजिक आणि धार्मिक सलोखा बिघडवल्याचा आरोप आहे. १० ऑक्टोबर रोजी राज निवासच्या अधिकाऱ्यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.
रविवारी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. परंतु, प्रस्थान सोहळ्याला गालबोट लावण्याचा अयशस्वी प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. यावर आता पोलिसांनी लाठीमार केल्याचे व्हिडिओ सगळीकडे पसरवले जात आहेत. परंतु, खरोखर लाठीमार झाला का की, वारीच्या माध्यमातून काही करामती लोकांनी आपली राजकारणाची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला, हे जाणून घेणे आवश्यक आहे.
सर्वेाच्च न्यायालयाने दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंगचे अधिकार हे दिल्ली सरकार असल्याचा निर्णय दिला होता. मात्र आता हा निर्णय केंद्र सरकारने फिरवला आहे. त्यांनी हे अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंगचे अधिकार नायब राज्यपाल विनय कुमार यांच्याकडे ठेवण्याचा अध्यादेश काढला आहे. दिल्लीत महत्तवाचे कार्यलये असून त्यांच्या सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे केंद्राने अध्यादेशात म्हटले आहे.
झारखंडमधील एका मिशनरीच्या शाळेत 'जय श्री राम' चा जयघोष दिला म्हणून दोन दिवसांसाठी संपूर्ण वर्गाला निलंबित केल्याची घटना घडली आहे.विश्व हिंदू परिषदेने या प्रकरणाची चौकशी करून शिक्षण विभागाकडे कारवाईची मागणी केली आहे. पंरतू या सर्व प्रकरणावर शाळेच्या मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे की, विद्यार्थ्यांवर शाळेतील नियमांचे आणि शिक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली.
५ ऑगस्ट २०२०, रोजी अयोद्धेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते श्रीराम मंदिर शिलान्यास पूजन होणार आहे. संपूर्ण शिलान्यास पूजन विधी प्रा. विनय कुमार पांडेय करणार आहेत. काशी विश्व हिंदू विद्यापीठात त्यांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय आचार्य दल पूजनाची तयारी करत आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी चेहऱ्यावर मास्क लावणे गरजेचे असल्याचे दिसून येते. भारतीय बनावटीचे स्वदेशी खादीचे मास्क परदेशी बाजारपेठेत जाण्यासाठी तयार आहेत.