एखाद्या श्रीमंत माणसाला विनवणी करावी आणि त्याने आपल्या हातांनी हजारो रूपयांची राशी प्रदान करावी, त्याप्रमाणे हा पिता देत नाही, तर त्याही पलीकडे जाऊन तो आपल्या याचकांच्या बुद्धीला सम्यक दिशा देतो. गायत्री मंत्रातही याचकरिता किती सुंदर कामना केली आहे- ‘धियो यो न: प्रचोदयात्।’ हे ईश्वरा! तू आम्हा जीवमात्रांच्या बुद्धितत्त्वांना सन्मार्ग दाखव, प्रेरणा दे.
Read More
चार वेदातील सर्व मंत्रांमध्ये ज्याचा सर्वोच्च असा महान दिव्य अर्थ आहे, अशा गायत्री महामंत्रांतर्गत स्तुती, उपासना व प्रार्थना या तीन भागांपैकी ‘उपासना’ या विषयावरचे आपण निरूपण जाणून घेत आहोत. दुसर्या चरणातील ‘सविता’ या शब्दावर मागील भागात प्रकाश टाकण्यात आला आहे. आता ‘देवस्य, वरेण्यं, भर्गः धीमहि ।’ आणि या दुसर्या प्रार्थना अंतर्गत ‘धियो यो नः प्रचोदयात् ।’ या तिसर्या व अंतिम चरणावर चिंतन करू या!
मागील भागात आपण ईश्वराचे मुख्य नाव ‘ओ३म्’ यासंदर्भात विस्तृतपणे चर्चा केली. यात ‘ओ३म्’चा अर्थपूर्ण जप केल्याने होणारे लाभ यावर प्रकाश टाकण्यात आला होता. आता या भागात गायत्री मंत्राची स्तुती व उपासना यासंदर्भात चर्चा करूया.
आज ग्रंथरूपात असलेल्या वेदांच्या चारही संहिता कालौघाने नाहीशा झाल्या किंवा या वेदशास्त्राच्या अध्ययन-अध्यापनाची प्रक्रिया जरी खुंटली तरी अंतरंगातील ज्ञानात्मक वेदराशी कधीच नष्ट होऊ शकत नाही. कारण, वेद हे परमेश्वराचे अमर काव्य आहे.