भारतीय महिलांकडून स्वत:च्या आर्थिक स्वावलंबनाकडे कल वाढताना दिसतोय. भारतीय सांख्यिकी विभागाने प्रकाशित केलेल्या एका सर्वेक्षणातून ही माहिती उघड झाली आहे. टाईम युज सर्व्हे या संस्थेकडून केल्या गेलेल्या सर्वेक्षणानुसार २०२४ या वर्षात भारतीय महिलांकडून दिवसातील सरासरी २० टक्के वेळ हा रोजगारक्षम कामांमध्ये म्हणजेच पैसे कमावण्यासाठी खर्च होतो असे हा अहवाल सांगतो
Read More
केंद्र सरकारकडून नवीन सार्वत्रिक पेन्शन योजना आणण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. यामध्ये सर्व नोकरदार तसेच स्वयंरोजगारित व्यक्तींनाही यामध्ये सहभागी होता येणार आहे.
स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया कडून २०२४ मधील ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी एमएसएमई म्हणजेच सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग क्षेत्राच्या कामगिरीचा आढावा प्रकाशित करण्यात आला आहे
भारतीय निर्मिती म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वेगाने वाढ करत असल्याचे दिसत आहे. एस अँड पी ग्लोबल या संस्थेच्या सोमवारी प्रकशित झालेल्या अहवालात ही माहीती उघड झाली आहे
मुंबई : व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या समन्वयातून पालघर आयटीआयमध्ये मॉडेल करिअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या करिअर सेंटरमध्ये तरुणांना सीआयआय (कान्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री) प्रशिक्षण देत आहे. नुकतेच २७ तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आगामी काळात या सेंटरच्या माध्यमातून अधिकाधिक रोजगार मिळतील, असा विश्वास कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा ( Mangal Prabhat Lodha ) यांनी व्यक्त केला.
Employment-rich Nashik भारताला जगातील श्रेष्ठ अर्थव्यवस्था म्हणून प्रतिष्ठित करण्याचा उद्देश ‘स्वावलंबी भारत अभियाना’चा आहे. या अभियानाला नाशिकमध्येही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, नाशिक जिल्हा उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे आतापर्यंत 2 हजार, 500 तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करून सहकार्य करण्यात आले आहे. या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया ‘स्वावलंबी भारत अभियान’ आणि अभियानाच्या नाशिक जिल्हा उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत सुरू असलेल्या कार्याबाबत...
ठाणे : ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्दोजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे व डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि सिध्दार्थ ओवळेकर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ०८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता न्यु हॉरिझन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अॅन्ड मॅनेजमेंट, आनंद नगर, ठाणे (प.) येथे सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांकरिता रोजगार मेळावा ( Employment Fair in Thane ) आयोजित करण्यात आला आहे.
मुंबई : रोजगार हमी योजना ही ग्रामीण विकासासाठी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यात ग्रामीण विकासाचा एक नवा आदर्श तयार करण्यासाठी काम करणार असल्याचे प्रतिपादन रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले ( Bharat Gogavle ) यांनी शुक्रवार, दि. ३ जानेवारी रोजी केले.
काँग्रेसी दहा वर्षांच्या तुलनेत भाजपच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात देशात पाचपट अधिक रोजगारनिर्मिती झाली, असे भारताच्या मध्यवर्ती बँकेने नमूद केले आहे. त्यामुळे मोदी सरकारवर बेरोजगारी वाढविण्याचे बेछूट आरोप करणार्या विरोधकांना एक सणसणीत चपराक लगावली आहे.
देशातील उत्पादन क्षेत्राचा अर्थव्यवस्थेतील वाटा पुढील १० वर्षात तब्बल ५० टक्क्यांनी वाढणार आहे. २०३२ पर्यंत या क्षेत्राचा अर्थव्यवस्थेतील वाटा १४ टक्क्यांवरून २१ टक्क्यांवर जाणार आहे
भारतीय उद्योग क्षेत्रात एआय म्हणजेच कृत्रीम बुध्दीमत्ता जवळपास सर्वच क्षेत्र व्यापणार असल्याचा अंदाज व्यक्त होतोय. २०२५ हे वर्ष त्या दृष्टीने खूप महत्वाचे ठरणार आहे
येत्या ५ वर्षात टाटा समुहाच्या सर्व कंपन्यांकडून ५ लाख रोजगार निर्माण केले जातील असा विश्वास टाटा समुहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखर यांनी व्यक्त केला आहे. सरत्या २०२४ या वर्षाच्या पूर्वसंध्येला चंद्रशेखर यांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना लिहीलेल्या पत्रात त्यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ डिसेंबरच्या सकाळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये नवीन भरती झालेल्या ७१ हजार नेमणूक पत्रांचे वितरण केले. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी रोजगाराच्या नवीन संधीबद्दल तरूणांशी संवाद साधला. रोजगार मेळा हे रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.
सद्यस्थितीत भारतातील वाढता रोजगार आणि उपभोगाचे वाढते प्रमाण या दोन्ही घटकांमध्ये ज्या स्वरुपाचा सकारात्मक परस्परसंबंध दिसून येतो आहे, त्यावरून अलीकडच्या काळात भारताने साधलेल्या विकासामुळे रोजगार निर्मिती झाली असल्याचे निश्चितच म्हणता येईल. खरे तर या स्तुस्थितीने देशात रोजगारशून्य विकास (jobless growth) सुरू असल्याचे जे मिथक रुजवण्याचा प्रयत्न केला जातो आहे, त्या मिथकालाच आव्हान मिळाले असल्याचेही निश्चितच म्हणता येईल.
देशात अधिकाधिक रोजगार निर्मिती करायची असेल, तर तरुणांमधील कौशल्य विकासाला चालना देणे क्रमप्राप्त. त्यादृष्टीने केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पताही विशेषत्वाने तरतूद केली आहे. तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरणातही कौशल्य विकासाला चालना देण्यात आली आहे. त्यानिमित्ताने...
संदीप नाईक प्रतिष्ठानच्या सौजन्याने नवी मुंबईतील सीबीडी-बेलापूर येथे दहावा महारोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. शुक्रवार, ३० ऑगस्ट रोजी हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून याठिकाणी विविध क्षेत्रांतील तरुणांना ५ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दि. २३ जुलै २०२४, मंगळवार सकाळी ११ वाजता अर्थसंकल्पीय भाषणाचे वाचन सुरू केले. या अर्थसंकल्पात देशात वाढत्या बेरोजगारीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करेल, असा अंदाज बांधण्यात आला होता. सरकारने सुद्धा या अर्थसंकल्पात रोजगारासाठी अनेक योजनांची घोषणा केली आहे.
आपल्या देशात सहकाराची चर्चा गेली कित्येक दशके सुरु आहे. पण, सहकाराच्या माध्यमातून देशातील गावपातळीवरील उत्पादकाला देखील आंतराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात करता यावी, यासाठी मोदी सरकारने कृतिशील प्रयत्न केले. आज त्याची फलनिष्पत्ती स्पष्टपणे दिसून येते. ‘एक्स्पोर्ट को-ऑपरेटिव्ह सोसायटी’च्या माध्यमातून झालेल्या या बदलांचा आढावा घेणारा हा लेख...
रोजगार हा तरुणांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी महत्त्वाचा विषय असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. बुधवारी ठाणे येथे आयोजित नमो महारोजगार मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. तसेच आज जवळपास ३० हजारापेक्षा जास्त तरुण याठिकाणी येऊन गेले आहेत आणि ५ ते ६ हजार उमेदवारांची त्यामधून निवड झाली असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे. Namo Maharojgar Melawa
आम्ही राजकारणातले कंत्राटी कामगार, चांगलं काम केलं तरच लोकं आम्हाला पुन्हा संधी देतात. नाहीतर घरी बसवतात, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. शनिवारी बारामती येथे नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
अहमदनगर येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऑनलाईन उपस्थितीत या मेळाव्याचे उद्धाटन पार पडले.
नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या युवक आणि युवतींकरिता लवकरच ठाणे येथे नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याबाबत माहिती दिली. तसेच या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहनही केले.
राज्यातील प्रत्येक महसुली विभागात नमो महारोजगार मेळावा घेण्यास सोमवार, दि. ५ जानेवारी रोजी मंत्रिमंडळाने मान्यता दिली. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची ही संकल्पना असून, या माध्यमातून राज्यात २ लाख रोजगार, स्वयंरोजगार निर्माण होणार आहेत.
तरुणांसाठी रोजगार हा जिव्हाळ्याचा विषय आहे. एका तरुणाला रोजगार म्हणजे, त्याच्या कुटुंबाचा आनंद, समाधान. त्यामुळे नमो रोजगार अभियानांतर्गात होणारा 'नमो महारोजगार मेळावा' यशस्वी करण्यासाठी सर्वच विभागांनी मेहनत घ्यावी. त्यासाठी मुख्यमंत्री सचिवालायतूनच संनियंत्रण केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवार, दि. २९ जानेवारी रोजी केली. तसेच 'शासन आपल्या दारी' प्रमाणेच नमो महारोजगार मेळावे यशस्वी करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने आणि शिवसेना कल्याण शहर शाखेच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या 'रोजगार आपल्या दारी' उपक्रमामध्ये तब्बल 1 हजार 100 जणांना नोकऱ्या प्राप्त झाल्या. ज्यामध्ये काही शासकीय विभागातील पदांचाही समावेश असून निवड झालेल्या उमेदवारांना याठिकाणी लगेचच नियुक्ती पत्रंही देण्यात आली.
कल्याणात येत्या शुक्रवारी 26 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत साई हॉल, वायले नगर, कल्याण पश्चिम येथे रोजगार आपल्या दारी या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने हा मेळावा होत आहे. या मेळाव्यात विविध क्षेत्रातील तब्बल 4 हजार संधी उपलब्ध होणार आहेत. ज्यामध्ये खासगी क्षेत्रासोबतच शासकीय विभागातीलही निवडक पदांसाठी इंटरव्ह्यू घेतले जाणार आहेत.
स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये सुरु असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत दोन दिवसांत महाराष्ट्राने ३ लाख १० हजार ८५० कोटीचे सामंजस्य करार केले असून गुरुवारी ४२ हजार ८२५ कोटींचे करार होत आहेत. एकुण ३ लाख ५३ हजार ६७५ लाख कोटींचे विक्रमी सामंजस्य करार करीत असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
नमो महारोजगार मेळावा हा खऱ्या अर्थाने नवभारताची संकल्पना साकार करणारा मेळावा आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. नागपूर येथे आयोजित नमो महारोजगार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा हेदेखील उपस्थित होते.
युवक-युवतींना बेरोजगारीतून मुक्त करुन त्यांना आत्मनिर्भर करण्याची सर्वात मोठी लढाई महाराष्ट्रासमोर असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे. नागपूर येथे आयोजित नमो महारोजगार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते.
आंबा महोत्सवातून आंबा उत्पादकांना मदतीचा हात देणार्या आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात सात ठिकाणी दिवाळी फराळ विक्री केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. या उपक्रमातून सुमारे २०० महिलांना रोजगार मिळणार असल्याची माहिती देण्यात आली. महिलांना या उपक्रमातून रोजगार मिळणार असल्याने त्यांच्यात समाधान व्यक्त होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून राष्ट्रीय रोजगार मेळाव्याला संबोधित केले आणि विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भरती झालेल्या उमेदवारांना ५१,००० पेक्षा जास्त नियुक्ती पत्रे वितरित केली. देशभरातून निवडण्यात आलेले हे उमेदवार रेल्वे मंत्रालय, टपाल विभाग, गृह मंत्रालय, महसूल विभाग, उच्च शिक्षण विभाग, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यासह विविध मंत्रालये/विभागांमध्ये रुजू होतील. पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान देशभरातील ३७ ठिकाणे मेळाव्या
कंत्राटी भरतीचा अध्यादेश रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतल्यामुळे सरकारी नोकरीतही युवा वर्गावरील कंत्राटी नोकरीचे `जोखड' दूर होईल, अशी प्रतिक्रिया कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी आज येथे व्यक्त केली.
देशातील तरुणांनी स्वत:मधील कौशल्य विकसित करावे. तसेच स्वयंरोजगार करताना अन्य तरुणांना रोजगार उपलब्ध करून देत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी येथे केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून ५१,००० हून अधिक नव्याने भरती झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले. ही नियुक्तीपत्रे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिली गेली आहेत.
आता कंपन्या उमेदवारांची निवड करताना त्यांची शैक्षणिक पात्रता व संबंधित कामाचा प्रत्यक्ष अनुभव याच्याच जोडीला त्याची मानसिकता व कार्यशैलीवर अधिक भर देत आहेत. यासंदर्भात ’लिंक्डइन’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार, लहान-मोठ्या अशा विविध कंपन्या कर्मचार्यांची निवड करताना आता त्यांची मानसिकता व कार्यशैली यावर कटाक्षाने भर देत आहेत.
मुंबई : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कांदे साठवण करण्याचे गोदाम म्हणून कांदाचाळ उभारण्यासाठी १ लाख ६० हजार ३६७ अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिली. यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. रांगडा हंगामातील कांदा सुकवून साठविला जाऊ शकतो. परंतु कांदा साठविण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून तयार केलेले गोदाम उपलब्ध नसल्याने खरीप हंगामातील कांदा काढला की लगेच विकावालागतो.
शिक्षण पूर्ण झालेल्या अगदी पहिल्या टप्प्यात म्हणजेच पदवी-पदव्युत्तर असणार्या नव्या विद्यार्थ्यांमध्ये वेगळी इच्छा-आकांक्षा असते. मोठी स्वप्ने असतात. त्यांच्यामध्ये नवे व मोठे काही करण्याचा आत्मविश्वास असतो. मात्र, त्याचवेळी त्यांना मोठ्या स्पर्धेसह आव्हानांना तोंड द्यावे लागते. स्पर्धेत केवळ टिकाव धरणेच पुरेसे नसते, तर स्पर्धेमध्ये इतर अनेकांना मात देत आपले अव्वलपण सिद्ध करावे लागते. हे करणे शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या पलीकडचे असते. अशावेळी संबंधित विद्यार्थ्यांची इच्छा व प्रयत्नांना त्यांचे पालक, मार्गदर्शक
राज्याच्या, जिल्ह्याच्या प्रगतीत उद्योग-व्यवसायांचा मोठा वाटा असतो. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात लघु उद्योग व कुटीरोद्योगाचा विकास व्हावा, शहरातून ग्रामीण भागात उद्योगाचे जाळे तयार करणे व जिल्ह्यातून त्याचे सनियंत्रण होणे, या मुख्य उद्देशाने उद्योगविषयक अनेक शासकीय योजना आहेत. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा विकास करणे आणि त्याद्वारे रोजगार-स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी या योजना फायदेशीर ठरतात. या लेखात काही महत्त्वाच्या योजनांचा आढावा घेण्यात आला आहे.
नवी दिल्ली : केंद्रसरकारने गेल्या ९ वर्षांमध्ये देशातील तरुण वर्गास संधी उपलब्ध करून देणे आणि रोजगार निर्मितीचे धोरण ठेवले आहे. त्याचप्रमाणे नोकरी भर्तीप्रक्रियेतील घराणेशाहीसारख्या अनिष्ट प्रथांचेही उच्चाटन केले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून राष्ट्रीय रोजगार मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध सरकारी विभाग आणि संघटनांमध्ये नव्याने भरती झालेल्या सुमारे ७१ हजार जणांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले.
‘प्रधानमंत्री मुद्रा योजने’ला दि. ८ एप्रिल रोजी आठ वर्षे पूर्ण झाली. २०१४-१५ या आर्थिक वर्षी देशातील बँकांशी बुडित कर्जे फार मोठ्या प्रमाणावर वाढली होती. देशातील स्वयंरोजगार वाढावेत म्हणून केंद्र सरकारने ही महत्त्वपूर्ण योजना अमलात आणली. छोट्या उद्योगांवर मात करणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश होता. त्यानिमित्ताने या योजनेच्या यशस्वितेचा आढावा घेणारा हा लेख...
मुंबई : केंद्र व राज्य शासन, विविध आस्थापना व त्यांचे अंगिकृत उद्योग, व्यवसाय, महामंडळे, महापालिका, तसेच खासगी क्षेत्रातील आस्थापनांनी त्यांच्याकडील मनुष्यबळाचे तिमाही विवरणपत्र येत्या ३० एप्रिलपर्यंत सादर करावे, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत करण्यात आले आहे.
नवी दिल्ली : भारताने २०१४ नंतर सकारात्मक दृष्टीकोन स्विकारला आहे. त्यामुळे भारतात याआधी अशक्य वाटणाऱ्या रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी 21 व्या शतकातील तिसऱ्या दशकात शक्य झाल्या आहेत तरुणांना अशी क्षेत्रे गवसत आहेत जी दहा वर्षांपूर्वी अस्तित्वातही नव्हती, असे प्रतपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
भ्रष्टाचार ही कुठल्याही देशाला, अंतर्गत व्यवस्थांना लागलेली कीड. मोदी सरकारच्या स्थापनेनंतर केंद्रीय पातळीवर हा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात मोडीत निघाला. राज्य, स्थानिक स्वराज्य संस्था स्तरावरही त्यासाठी प्रयत्न सुरु आहेतच. त्यामुळे मोदी सरकारचे भ्रष्टाचारमुक्तीतून राष्ट्रविकासाच्या उद्दिष्टपूर्तीचे हे पॅटर्न समजून घ्यायला हवे.
महिलांनी आता खुल्या पार्कमधील रेस्तराँमध्ये जाणेही गुन्हा. कारण काय तर म्हणे लोकांनी आणि मुख्य म्हणजे धार्मिक गुरूंनी प्रशासनाकडे तक्रार केली आहे की, महिला या रेस्तराँमध्ये डोकं आणि चेहरा झाकलेला पोशाख घालत नाहीत. आपला चेहरा किंवा केस इतरांना दिसू नयेत, यासाठी विशेष लक्ष देत नाहीत. इतकेच नव्हे, तर पुरूषांना त्या दिसू शकतात तरीसुद्धा त्या तिथे बसतात, नाश्ता करतात किंवा जेवतात. भयंकर पाप आहे. या पापाचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी मग अफगाणिस्तानातील हेरात प्रांतामध्ये महिलांना खुल्या रेस्तराँमध्ये प्रवेश करण्यास
नाशिक : अल निनोमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईच्या अनुषंगाने नियोजन करताना पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य देण्यात यावे. तसेच त्याबाबत गावपातळीवर देखील सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित विभाग प्रमुखांना दिल्या आहेत.
मुंबई : उद्योग विभागाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या माध्यमातून बारा हजाराहून अधिक उद्योजकांना कर्ज मंजूर झाले असून यामधून सुमारे एक लाखाहून अधिक युवकांच्या हातांना काम मिळणार आहे. या योजनेअंतर्गत राज्याने मागील वर्षापेक्षा अडीचशे टक्के अधिक काम करून शासनाने भरीव कामगिरी केली आहे. चालू आर्थिक वर्षात राज्याने एकूण 12 हजार 326 कर्ज प्रकरणे मंजूर केली असून यात रुपये 276 कोटी रुपये इतक्या अनुदान रकमेचा समावेश आहे. राज्याची ही कामगिरी मागील वर्षाच्या 250% पेक्षा अधिक आहे. यात
राज्याला प्रगतीपथावर नेणाऱ्या फडणवीस-शिंदे सरकारने बेरोजगारांसाठी रोजगारासह स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अंतर्गत असलेल्या ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत पंडित दिनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते ४ वा. या कालावधीत कल्याणमधील बापसई येथील इंडाला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन येथे आयोजित करण्यात आला आहे,अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रा
राज्याच्या ग्रामीण भागातील अत्यल्प उत्पन्न असलेल्या तरूण-तरुणींना रोजगारासह कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी राज्य शासन आणि लाईटहाऊस कम्युनिटीज फाऊंडेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार करण्यात आला. मंत्रालयात झालेल्या या कराराप्रसंगी आयुक्त डॅा. रामास्वामी एन, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी, लाईटहाऊस कम्यूनिटीज फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश नटराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी रूची
‘महात्मा गांधी रोजगार हमी योजना’ (मनरेगा) अंतर्गत सार्वजनिक कामावर असणार्या मजुरांची उपस्थिती आता ऑनलाईन पद्धतीने नोंदविली जात आहे. त्याकरिता मोबाईल उपयोजन (अॅप) तयार करण्यात आले असून, त्याचा पायलट प्रोजेक्ट पुणे जिल्ह्यातील एका गावात यशस्वी झाला आहे. त्यामुळे हा पथदर्शी प्रकल्प आता केंद्र सरकारने १ जानेवारीपासून संपूर्ण राज्यात लागू केला आहे. सरकारच्या या नव्या नियमामुळे मजुरांऐवजी यंत्राद्वारे सुरू असलेली रोजगार हमीची कामे ठप्प झाल्याचे चित्र असून, ठेकेदारांचे धाबे दणाणले आहे.
महाराष्ट्र शासन कौशल्य विकास उद्योजकता विभाग मुंबई उपनगर व पंडित दिनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे कांदिवली पश्चिम गोरसवाडी मैदान येथे आमदार योगेश सागर यांच्या विशेष प्रयत्नांतुन आयोजन करण्यात आले, या मेळाव्याचे उद्घाटन मा खासदार गोपाळ शेट्टी आमदार योगेश सागर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले, यावेळी शासनाच्या वतीने रोजगार विभागाचे, सहायक आयुक्त खंदारे, उपस्थित होते, गणेश खणकर, निखिल व्यास, माजी नगरसेवक दिपक बाळा तावडे, कमलेश यादव, नगरसेविका लिनाबेन दहेरकर, नगरसेविका प्रियंका मोरे, नगरसेविका प्रतिभा गिरकर,