राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक दीपक मानकर यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे आपला राजीनामा पाठवला असून अजितदादांना हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
Read More
पाकिस्तान शांत बसणार नसेल ,आणि शब्द देऊनही पाळणार नसेल तर त्यांना एक कडक संदेश देण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली. रविवार, ११ मे रोजी रत्नागिरी येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राष्ट्रवादीमध्ये असलेली फूट ही कौटुंबिक फूट मानली जाते. त्यामुळे ते उद्या एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. राज्यभरात सध्या अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असून यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
जळगावमधील दोन माजी मंत्री आणि तीन माजी आमदारांनी शनिवार, दि. ३ मे रोजी अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासह जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील शरद पवार गटाच्या असंख्य पदाधिकार्यांनी के. सी. कॉलेज सभागृहात झालेल्या कार्यक्रमात जाहीर प्रवेश केला.
उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा दावा केल्याने सध्या चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महाराष्ट्र गौरव रथयात्रेचा शुभारंभ प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते शुक्रवार, दि. २५ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. संयुक्त महाराष्ट्र स्थापनेला ६५ वर्ष पूर्ण होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून संपूर्ण राज्यात महाराष्ट्र महोत्सव साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्ताने महाराष्ट्र गौरव रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
Anna Bansode महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष पदाची निवडणूक बुधवार, दि. २६ मार्च रोजी होणार असून, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे.
विधानपरिषद पोटनिवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एक जागा आली असून त्यासाठी त्यांनी नुकाच आपला उमेदवार जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने संजय खोडके यांना विधानपरिषदेसाठी संधी दिली आहे. सोमवार, १७ मार्च रोजी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून २७ मार्च रोजी मतदान पार पडेल.
नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मोहन हंबर्डे यांनी शुक्रवार, २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
(Sunil Tatkare) मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने दि. २६ फेब्रुवारी रोजी 'मराठी पाऊल पडते पुढे' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली.
कुणीही कुणाला खंडणी मागितल्याचे कानावर आल्यास त्याच्यावर मकोका लावण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा सज्जड दम उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.
Dhananjay Munde मी वेगवेगळी आंदोलने, यात्रा आदींच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. मात्र आता बीड जिल्ह्यातील एका दुर्दैवी हत्या प्रकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून अजितदादांच्या प्रत्येक निर्णयात ठामपणे सोबत उभा राहिलो. पक्षाच्या वाईट काळात णामागे मला जाणीवपूर्वक ठरवून टार्गेट केले जात आहे. महायुतीतील नेत्यांकडूनच मला लक्ष्य केले जात आहे, याचेच जास्त वाईट वाटत आहे. पक्षातील काही लोक देखील दादांच्या कानाला लागून चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत आहेत. मात्र तरीही माझी भूमिका व वस्तु
दिल्ली विधानसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात अजित पवार, पार्थ पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. दिल्ली विधानसभेच्या निवडणूकीसाठी पक्षाचे ११ उमेदवार रिंगणात आहेत.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण राज्यात खळबळ माजली असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हा निर्णय घेतला आहे.
पक्षफुटीनंतर विधानसभेत मिळालेला धक्का पचवत नाहीत, तोवर सुप्रिया सुळे आणि त्यांच्या वडिलांना ( NCP ) पुन्हा दणका देण्याची तयारी अजित पवारांनी केलेली दिसते. काकांकडे आठ खासदारांचे बळ असले, तरी सत्तेवाचून त्यांचे अस्तित्व जवळपास शून्य, हे अजितदादा जाणतात. त्यामुळेच बहुदा आपले विश्वासू सुनील तटकरे यांच्या खांद्यावर या मोहिमेची जबाबदारी दिली असावी. तटकरेंनी म्हणे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात ‘सावज’ टप्प्यात गाठले. सुप्रिया सुळे वगळता शरद पवारांकडील सात खासदारांना संपर्क साधण्यात आला. प्रदेशाध्यक्ष स्वतः त्यांना खा
बाप-लेकींची साथ सोडून अजितदादांसोबत चला, अशी ऑफर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी शरद पवार गटाच्या खासदारांना दिल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत पुन्हा फूट पडणार का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात आली आहे.
मुंबई : “बीडचे पालकमंत्रिपद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असून कोणाला पालकमंत्री करायचे याचा निर्णय त्या पक्षाने घ्यायचा आहे,” अशी स्पष्टोक्ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांनी शुक्रवार, दि. ३ जानेवारी रोजी दिली.
Sharad Pawar यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटातील नेत्यांनी पवारांची भेट घेतली दिल्लीत झालेल्या या भेटीमुळे नव्या राजकीय समीकरणांच्या चर्चांना उधाण आले आहे.
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीला चांगलाच धक्का बसला आहे. हा पराभवाचा धक्का पचवता न आल्यामुळे आता ईव्हीएमवर शंका घेणे, महायुतीला बदनाम करण्याचा काम सध्या सुरू आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या ५०जागा मिळाल्या तर दुसरीकडे महायुतीने २३१ जागा जिंकल्या. अशातच शरद पवार यांनी मतदानाच्या आकडेवारीवर शंका घेतली आहे. यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिउत्तर दिले आहे.
अगदी काही महिन्यांपूर्वीच गुलाल उधळणाऱ्या शरदचंद्र पवार गटाच्या निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके पारनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. मात्र निलेश लंके यांचा लोकसभेचा विजयी गुलाल उतरलाही नसताना मतदारांनी निवडणूक रिंगणात उतरलेल्या निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना सपशेल नाकारले. लंके यांच्याविरोधात अजित पवार गटाचे काशिनाथ दाते निवडणूक लढवत होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी जोरदार पीआर केल्याने आणि महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसच्या जोरावर विजयी झालेल्या खासदार नील
खरी शिवसेना आणि खऱ्या राष्ट्रवादीचा निकाल ( Result ) स्पष्ट!
'म्हातारं जिथं जातंय तिथं चांगभलं व्हतयं' राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे कौतुक करण्यासाठी काढलेले हे उद्गार.
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी ( Baba Siddiqui ) यांच्या हत्येप्रकरणी सुमित दिनकर वाघ या २६ वर्षांच्या आरोपीला अकोला येथून गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. पुढील चौकशीसाठी त्याला मुंबईत आणले जात असून, त्याला नंतर किल्ला न्यायालयात हजर केले जाणार आहे. सुमितच्या अटकेने या गुन्ह्यांतील अटक आरोपींची संख्या आता २६ झाली आहे.
: महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकींचे निकाल जाहीर झाले आणि जनतेने महायुतीला कौल दिला. भाजप सहीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला बहुमत मिळालेले आहेत. महाविकास आघाडीला जनतेने नापसंती दर्शवली असून, मविआचा साफ पराभव झाला आहे. अशातच आता जनतेचा हा कौल आम्हाला मान्य असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात मोठ्या पवारांची एकाधिकारशाही महायुतीने मोडीत काढली आहे. पुणे जिल्ह्यातील निकाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा नेते शरद पवार यांच्या वर्चस्वाला धक्का देणारे ठरले आहेत. मविआच्या जागावाटपात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक जागा घेऊनदेखील पवारांचा बहुतांश जागांवरील पराभव हा खूप मोठा संदेश देऊन जातो.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते रोहित पवार ( Rohit Pawar ) यांच्याकडून कर्जत-जामखेड मतदारसंघात पैशांचे वाटप सुरु असल्याचा आरोप भाजपने केला आहे. बारामती अॅग्रोच्या अधिकार्यांकडून कर्जत-जामखेडमध्ये हे पैशांचे वाटप सुरु असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे. या अधिकार्यांकडे दारूसाठी किती पैसे आणि कुणाला द्यायचे किती याचा तपशील आहे. मतदारांची यादी आणि पैशांचे घबाडही सापडले आहे.
ठाणे : “मुंब्रा-कळव्यातून एकाला १५ वर्षे संधी दिलीत, त्याने वीज चोरी केली. आता राष्ट्रवादी-महायुतीच्या नजीब मुल्ला यांना निवडून द्या. मुंब्रा-कळव्याच्या विकासासाठी तीन हजार कोटी देईन, हा माझा वादा आहे,” असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार ( Ajit Pawar ) यांनी मतदारांना केला.
ठाणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून गलिच्छ राजकारण सुरू झाले आहे. जितेंद्र आव्हाड समर्थक शमीम खान यांनी मुंब्रा-कळवाचे राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला ( Najeeb Mulla ) यांच्या विरोधात केलेल्या बदनामीकारक, खोट्या आणि तथ्यहीन आरोप केले होते. याची चौकशी करण्याची मागणी नजीब मुल्ला यांनी परिमंडळ-१ चे ठाणे पोलीस उपायुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ठाणे : कळवा मुंब्र्यातील विधानसभा निवडणुकीतील ही लढाई गुरु शिष्याची लढाई नाही तर योग्य-अयोग्यची लढाई आहे, सत्य-असत्याची लढाई आहे, धर्म-अधर्माची लढाई आहे, नजीबभाईंची लढाई लढण्यासाठी मी अर्जुन बनून आलो आहे. असा हल्लाबोल करीत राज्याचे कृषीमंत्री व राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांनी मुंब्रा कळव्याच्या विकासासाठी नजीबभाईला निवडून आणण्याची ही योग्य वेळ असल्याचे सांगितले. येत्या २० तारखेला घड्याळासमोरील बटन दाबण्याचे आवाहनही त्यांनी मतदारांना केले.
ठाणे : कळवा - मुंब्रा विधानसभा क्षेत्रात गेले तीन टर्म आमदारकी भुषविणाऱ्या जितेंद्र आव्हाडांना टोरन्ट पॉवरचा झटका बसण्याची चिन्हे आहेत. गेल्या चार वर्षापासुन कळवा - मुंब्रावासियांचा विरोध असलेल्या टोरन्ट पॉवर कंपनीला बंद करण्याचे आश्वासन महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी (अजितदादा गट) काँग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला ( Najeeb Mulla ) यांनी दिले आहे. शुक्रवारी मुंब्य्रात मुल्ला यांची प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी मतदारांनी फटाक्यांची आतिषबाजी करुन नजीब मुल्ला यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी बोलताना त्यांनी मु
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यात बारामतीच्या प्रगतीसाठी विविध कामांचा समावेश करण्यात आला आहे.
मुंबई : ( Sharad Pawar ) “मी जातीयवाद केल्याचे एक उदाहरण दाखवा,” असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि मविआचे शिल्पकार शरद पवार यांनी नुकतेच दिले होते. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शरद पवारांनी जातीयवादी राजकारणाने महाराष्ट्राचे समाजमन कलुषित केल्याची टीका एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना, शरद पवारांनी दि. २ नोव्हेंबर रोजी बारामती येथे पत्रकार परिषदेत मी जातीयवादी राजकारण केल्याची उदाहरणे देण्याचे आव्हान दिले होते. त्यामुळे दै. ‘म
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खानं यांचं ३ नोव्हेंबर रोजी निधन झालं आहे. समीर खान यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातामध्ये ते गंभीकर जखमी झाल्याची माहिती माध्यमांना मिळाली. त्यांच्यावर कोहीनूर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. नवाब मलिक हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे शिवाजीनगर-माणकूर विधानसभेचे उमेदवार आहेत.
मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात वोट जिहाद आणि आतंकवादाच्या समर्थकांचा पराभव होणार, असा विश्वास भाजप नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला. मंगळवार, २९ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवाब मलिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. याठिकाणी शिवसेनेचे सुरेश पाटील आणि समाजवादी पक्षाचे अबु आझमी हे रिंगणात आहेत.
NCP Ajit pawar Second List जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत एकूण ३८ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. आता एकूण ४५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार निवडणूक लढवणार असल्याचे आता सिद्ध झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते बाबा सिद्दिकी यांचे सुपुत्र आणि काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तसेच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून वांद्रे पूर्व विधानसभेचे तिकीट देण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात उबाठा गटाचे वरुण सरदेसाई मैदानात असतील.
निवडणूका जवळ आल्याने राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, विधानसभेच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसकडून नुकतीच ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीतूनच लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नवी मुंबईतील बहुचर्चित बेलापूर विधानसभेसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि मनसे अशी तिरंगी लढत पाहायला मिळेल. पाहूया काय आहे या मतदारसंघाचा इतिहास
भाजप नेते आणि माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे आदी उपस्थित होते.
विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर राज्यात अनेक पक्षप्रवेश सुरु आहेत. अशातच उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी काँग्रेसला मोठा धक्का गिला आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आरल्याची घटना वांद्रे येथे घडली. झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाबाहेर दसऱ्या दिवशी शनिवारी १२ ऑक्टोबर रोजी गोळीबार करण्यात आला होता.
जेष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते सयाजी शिंदे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भूजबळ, मंत्री सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या प्रमुख उपस्थित हा पक्षप्रवेश पार पडला.
पवार इंदापूरच्या जनतेला भावनिक साद घालत होते. पण, दुसरा गणंग मराठी माणसाच्या लाडक्या गणपती बाप्पाबद्दल जे बोलला, ते तर या इसमाचा पायातले खेटर काढून समाचार घेण्यासारखे होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला दुसरं चिन्ह द्या, अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे. शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणूकीपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नवीन चिन्ह मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
येनकेन प्रकारे नेहमीच बरळणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनीही पतीचा कित्ता गिरवत भयंकर मुक्ताफळे उधळली आहेत.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर कार्यकर्त्यांनी ‘अजितदादा जिंदाबाद’च्या घोषणा दिल्यामुळे गुरुवार, दिनांक २६ सप्टेंबर रोजी ते चांगलेच भडकले.
फोडाफोडीचं राजकारण आणि जातीयवादाला केवळ शरद पवार जबाबदार आहेत, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली आहे. राज ठाकरे यावेळी स्वबळावर विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असून यासाठी त्यांनी महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. ते सध्या विदर्भ दौऱ्यावर आहे. त्यांनी शनिवारी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
गुरुवारी रात्री उशीरा राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली असून यात बारामतीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी विधानसभा निवडणूकीत बारामतीतून कोणता उमेदवार असणार? असा संभ्रम निर्माण झाला असताना आता अजित पवार हेच बारामतीतून लढणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसन्मान यात्रा आयोजित करण्यात आली असून गुरुवारी नाशिकच्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून या यात्रेचा शुभारंभ झाला. या यात्रेद्वारे जास्तीत जास्त मतदारसंघात पोहोचून महायूती सरकारमधील महत्वाच्या योजनांची माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांच्यासमोर सुनावणी पार पडली. दरम्यान, न्यायालयाने अजित पवारांसह त्यांच्या ४१ आमदारांना नोटीस बजावली आहे. तसेच हे दोन्ही प्रकरण सारखे असल्याने यावर एकाचदिवशी पण स्वतंत्र सुनावणी होणार आहे.