Ram Navami प. बंगाल राज्यातील कोलकातामध्ये रामनवमी (Ram Navami) शोभायात्रेत काही जिहाद्यांनी रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी दगडफेक केल्याचा दावा भाजपने केला. भाजपने दावा केला की, ते शोभायात्रेतून परतत असताना दगडफेक करण्यात आल्याचा दावा भाजप नेत्याने केला आहे. संबंधित परिस्थिती लक्षात घेऊनही पोलिसांनी दावा फेटाळला आहे.
Read More
Ram Navami केवळ देशातच नाहीतर जगभरात साजरी करण्यात आली. याच उत्सवादरम्यान काही ठिकाणी कट्टरपंथी जिहाद्यांनी दगडफेक रत शोभायात्रेला गालबोट लागले आहे. गुजरात राज्यातील अहमदाबादमध्ये काही जिहाद्यांनी रामनवमी दिवशीच भाजपचा झेंडा फाडला आहे. त्यानंतर हिंदूंच्या आस्थेवर बोच दाखवत शिवीगाळ केली आहे. ही घटना ६ एप्रिल २०२५ रोजी घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवीगाळ करणाऱ्या कट्टरपंथी मुस्लिमाचे नाव वाजिद शहंशाह असे आहे. त्यानेच शहरातील शांतता भंग केल्याचा आरोप आहे.
Ramnavami 2025 वाल्मिकी ऋषींची गेली हजारो वर्षे मानवी मनाला शांत करणारी रसाळ मधुकथा म्हणजेच रामकथा. राम आणि सीतेची ही सुंदर कथा खूप प्राचीन. काळाची पाऊले जशी पुढे पडायला लागली, तशी ही कथा केवळ भारताची राहिली नाही, तर ती देशांच्या सीमा ओलांडून हिमालयापारही गेली. देशोदेशीचे राजकीय संबंध बदलत राहिले, नवीन सामाजिक परिस्थिती आकाराला आली आणि माणसाच्या एकूणच राहणीमान, जीवनमानातील स्थित्यंतरांनी प्रगतीचा आलेख गाठला. पण, या सगळ्या बदलांना तोंड देत, ही मधुर कथा देशविदेशातील विद्वानांच्या आणि रसिकांच्याही मुखात रुळली.
Ram Navami 2025 मालदीव... भारताच्या नैऋत्येकडील द्वीपराष्ट्र. ज्याप्रमाणे आग्नेय आशियात रामकथेचा सुगंध तेथील कणाकणांत दरवळलेला दिसतो, तसे चित्र इस्लामिक मालदीवमध्ये नाही. पण, अगदी रामाचे गुरु असलेल्या अगस्ती ऋषींनी मालदीव पादाक्रांत केले होते. एवढेच नाही, तर रामायणातील लंका ही आजची श्रीलंका नसून, श्रीलंकेच्या दक्षिणेला मूळात मालदीवजवळचेच एक द्वीप असल्याचाही दावा केले जातात. त्याचबरोबर मालदीवच्या लोककथांमध्ये राम आणि सीतेशी साधर्म्य साधणारी धोन हियाल आणि अली फुल्हूची कथा आजही गायली जाते. त्याचाचा मागोवा घेण
Ram Navami : प. बंगालची राजधानी कोलकातामधील जाधवपूर विद्यापीठातील रामनवमी साजरी करण्यास नकार देण्यात आला आहे. विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना विद्यापिठाच्या आवारात राम नवमी साजरी करण्यास विरोध दर्शवला आहे. विद्यापीठाच्या प्रशासनाने राम नवमी साजरी करण्यास परवानगी दिली नाही. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, आधी रमजानदरम्यान इफ्तार पार्टी करण्यास विद्यार्थ्यांना मुभा देण्यात आली होती. मात्र, राम नवमी साजरी करण्यास नकार देण्यात येत आहे. त्यामुळे राम नवमी उत्सव साजरा का करू दिला जात नाही? असा विद्यार्थ्यांनी प्रश्न
रामनवमीनिमित्त शिर्डीतील साई मंदीर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साई मंदीर संस्थानच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे २४ तास भाविक साईबाबांचे दर्शन घेऊ शकतात.
रामनवमीचे औचित्य साधून ईशान्य मुंबई दैवज्ञ चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून, मुंबई शहरांतील शालेय शिक्षक तसेच महाविद्यालयीन शिक्षकांसाठी खास प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने दि. ६ एप्रिल रोजी येणाऱ्या रामनवमीबाबत मोठी घोषणा केली आहे. प्रभू श्रीरामांची जयंती रामजन्मभूमीवर मोठ्या थाटामाटात साजरी केली जाणार असल्याचे मंदिर ट्रस्टने सांगितले. सोमवारी यासंदर्भात कार्यक्रमाची रूपरेषा प्रसिद्ध करण्यात आली. Ramnavami in Ayodhya
रामनवमीच्या मुहूर्तावर सुमारे दोन हजार रॅलीमध्ये एक कोटी हिंदू सहभागी होतील, अशी मोठी घोषणा पश्चिम बंगालमधील भाजपचे ज्येष्ठ नेते सुवेंदू अधिकारी यांनी शुक्रवारी केली. इतकेच नव्हे तर ममता सरकारविरोधात निशाणा साधत रॅली काढणाऱ्यांनी प्रशासनाची परवानगी घेऊ नये, असे स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केले आहे. Suvendu Adhikari on Ramnavami
अयोध्येत रामनवमी (Ram Navami) मोठ्या उत्साहात पार पडली. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात राम जन्मोत्सव साजरा केला जात होता. अमेरिकेच्या 'ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ राम मंदिर’ (ओएफआरएम) संस्थेने अयोध्येतून अमेरिकेत आणलेले १०१ किलोहून अधिक ‘रघुपती लाडू’(Raghupati Ladoo) रामनवमीनिमित्त ‘प्रसाद’ म्हणून जगभरातील भाविकांमध्ये वितरित केले गेले. ओएफआरएमचे संस्थापक प्रेम भंडारी यांनी एएनआय वृत्तसंस्थेला यासंदर्भात सविस्तर माहिती दिली.
देशभरात श्रीरामनवमीनिमित्त विविध ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या. काही ठिकाणी या शोभायात्रांवर दगडफेक झाल्याच्या घटना समोर आल्या. विशेषतः पश्चिम बंगालमध्ये तर याचे प्रमाण अधिक होते. ममतांची कोणतीही ममता नसलेले पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेत राहिले. भारतासोबत शेजारी देश नेपाळमध्येही मोठ्या उत्साहात श्रीरामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, नेपाळमध्ये श्रीरामनवमीच्या दिवशी शोभायात्रेवर दगडफेक झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी रामनवमीनिमित्त मुंबईतील विविध मंडळांना भेटी दिल्या आणि विविध कार्यक्रमात सहभाग नोंदवला. वरळीमधील जिजामाता नगर, वरळी पोलीस ग्राउंड, वरळी पोलीस कंपाउंड येथील विविध मंडळे, परेलमधील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, परळ पोस्ट गल्ली सार्वजनिक उत्सव मंडळ, भोईवाडामधील श्रीराम स्पोर्ट्स मंडळ, काळाचौकी येथील अजंठा क्रीडा मंडळ, डोंगरीमधील श्रीराम मित्र मंडळ यासह इतर अनेक मंडळांना मंत्री लोढा यांनी भेट दिली.
अयोध्येत श्रीरामनवमीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. जन्मभूमीवर असलेल्या भव्य राम मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सकाळी सर्वप्रथम रामललास पंचामृताचा अभिषेक (Panchamrut Abhishek) करण्यात आला. त्यानंतर अत्तर लेपन करण्यात आले. यादरम्यान झालेल्या मंत्रोपचारांमुळे संपूर्ण गर्भगृहात प्रसन्न वातावरण तयार झाले होते. त्यानंतर घंटानाद आणि शंखनादात श्रीरामललाची आरती करण्यात आली.
स्वतंत्र भारतात प्रभू श्रीरामांच्या अस्तित्वालाच नाकारण्याचं काम काही पक्षांकडून घडलं, असे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केले आहे. बुधवारी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत त्यांनी सर्व भाविकांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी काही पक्षांवर नाव न घेता निशाणाही साधला.
पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येत भव्य श्रीरामाचे (Shri Ram) मंदिर उभे राहते आहे. श्रीरामललांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर आता रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहे. मंदिरसुद्धा अतुलनीय अशा सजावटीने तयार झाले आहे. रामनवमीला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना 'धनिया पंजीरी' प्रसाद म्हणून देण्यात येणार असून रामललासाठी एका अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली छप्पन भोग तयार होत असल्याची माहिती श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र न्यासचे महामंत्री चंपत राय यांनी माहिती दिली.
अयोध्येतील राममंदिरामध्ये दलित-वंचितांना प्रवेश नसल्याचा धादांत अपप्रचार विरोधक करताना दिसतात. त्यांच्या या दाव्यामध्ये तसूभरही तथ्य नाहीच. कारण, प्रभू श्रीरामांनी कधीही जातीभेद, वर्णभेदाला थारा दिला नाही. शबरीची उष्टी बोरे खाण्यापासून ते केवट राजाला मिठी मारण्यापर्यंत अशा कित्येक प्रसंगांतून श्रीरामांच्या जीवनातील समरसता प्रतिबिंबित होते. विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांच्या ‘समरसतेचे प्रतिबिंब प्रभू श्रीराम’ या विषयावरील भाषणाचे शब्दबद्ध केलेले हे विचार...
राम नवमीच्या निमित्ताने जनमनाचा वेध घेताना प्रभू रामचंद्र आणि शीख संप्रदाय यांचे अतूट नाते समोर आले. शीख संप्रदायासाठी प्रभू रामचंद्र हे सतगुरू स्थानी असल्याने, परमपूजनीय आहेत. या लेखातून या नात्यांचा वेध घेऊया...
येत्या हिंदू सणानिमित्त कुठल्याही प्रकारे अफवा पसरवणे, समाजकंटकांमार्फत कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रसंग घटना तर संबंधित आरोपी कठोर कारवाईस पात्र राहिल, अशा कडक सूचना रांची पोलीसांनी दिल्या आहेत. यानिमित्त मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीसांनी १७ एप्रिल रोजी साजरी केल्या जाणाऱ्या रामनवमीसाठी Ram Navami Drone Footage घेतली आहे. २०२३ मध्ये रामनवमीच्या निमित्त देशात काही ठिकाणी समाजकंटकांनी शोभायात्रांवर दगडफेकीसारखे प्रकार केले होते. याला आळा घालण्यासाठी पोलीसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे.
भारतीयांचा श्वास असणार्या प्रभू रामचंद्रांविषयी प्रत्येकाच्या मनात एक भक्तीची तसेच आपले पणाची भावना आहे. रामरायाची जीवनगाथा प्रत्येकाला स्वत:च्या जीवनाशी सुसंगत वाटते. आणि म्हणूनच प्रत्येक जण रामरायांना जाणून घेण्याचा आणि अधिकाधिक त्यांच्या जवळ जात राममय होण्याचा प्रयत्न विविध मार्गांनी करत असतो. आणि असा प्रयत्न देशाबरोबर विदेशातले रामभक्त देखील करतात.. अशा भक्तांबद्दल आणि त्यांच्या रामभक्तीबद्दल या लेखात जाणून घेऊया!
अयोध्येत रामनवमीनिमित्त खास श्रीरामललांचा सूर्यकिरणांसह महामस्तकाभिषेक (Suryatilak) करण्यात येणार आहे. यासाठी लागणारी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मंदिर व्यवस्थेशी संबंधित लोक याला विज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वय म्हणून याकडे पाहत आहेत.
भारताची वैज्ञानिक प्रगती हा भारतात तसेच जगातदेखील कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. अनेकांना रामायण आणि महाभारत हा इतिहास तर काहींना तो फक्त एक साहित्याचा प्रकार वाटतो. पण, या मंथनातून कायमच सकारात्मक बाबी पुढे येत आहेत. पण, वाल्मिकी महर्षी यांनी लिहिलेले रामायण हा आपला प्राचीन इतिहास आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. संपूर्ण रामायणात विविध घटना घडताना दिसतात. त्याचा सखोल अभ्यास केला असता, त्या काळात भारताची प्रत्येक क्षेत्रात असलेली प्रगती पाहून मन थक्क होते. रामायणातील अनेक प्रसंगांत आपल्याला रामकथेबरोबरच अनेक वै
रामायण आणि महाभारत या महान ऐतिहासिक ग्रंथांचे भारतीय समाजाशी अतूट नाते आहे. महर्षी वाल्मिकी आणि महर्षी व्यास यांच्या या ग्रंथांनी भारतीय जीवनात हजारो वर्षे आदर्श निर्माण केले आहेत. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या अलौकिक व्यक्तिमत्त्वाने भारतीयांचे जीवन व्यापून टाकले आहे. या दोन्ही ग्रंथांमध्ये खगोलशास्त्रीय घटनांचे जे दाखले दिले गेले आहेत, ते आश्चर्यकारकच आहेत. अनेक संशोधकांना या खगोलशास्त्रीय दाखल्यांनी भुरळ पाडली आहे. घटनांचा काळ ठरविताना, संशोधकांना खगोलशास्त्रीय संदर्भ उपयोगी पडले आहेत. आज आपण वाल्मिकी रा
अयोध्येत यंदाची रामनवमी (Ram Navami Ayodhya) मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. यानिमित्ताने येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासतर्फे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. रामनवमीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर पहाटे ३.३० वाजल्यापासून भाविकांसाठी रांगेत उभे राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. पहाटे ५:३० वाजता शृंगार आरती होईल, श्री रामललाचे दर्शन व सर्व पूजाविधी एकाच वेळी सुरू राहतील.
श्री तुलसीदासांची ‘रामकथा’ प्रासादिक आहे, म्हणून ती एवढ्या वर्षांनंतर देखील जनमानसांत तरली आहे, त्यांना आनंद देते आहे. अशा रचनांना आता आपण ‘क्लासिक’ म्हणतो. भारत हा श्रद्धावानांचा देश आहे. येथील जनमानस कोणी कितीही कलुषित करण्याचा प्रयत्न केला, तरी ते निष्फळ झाले आहेत. या रचनेला पूर्वग्रह बाजूला सारून विमल मनाने वाचण्याची आवश्यकता आहे. यातला अंशभर तरी प्रसाद आपल्या रचनेत उतरला, तरी मोठमोठ्या साहित्यिकांनी स्वतःला भाग्यवान मानले पाहिजे. येत्या रामनवमीनिमित्त श्रीमद्गोस्वामी तुलसीदासविरचित ‘श्रीरामचरितमानस’चे
कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी रामनवमी उत्सवाच्या परवानगी संदर्भात शुक्रवारी राम नवमी उत्सव आयोजक मंडळांसह पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेतली. मुंबईत विविध मंडळाद्वारे राम नवमीच्या आधी येणाऱ्या शनिवार किंवा रविवारी ठिकठिकाणी उत्सवाचे आयोजन करण्यात येते. परंतु यावर्षी रविवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि इतर काही तांत्रिक कारणांमुळे राम नवमी उत्सव साजरा करण्यास पोलिसांनी मुंबईतील काही भागात परवानगी नाकारली होती.
अयोध्येत श्रीरामललाच्या जन्मोत्सवाची तयारी सुरु झाली असून यंदाची रामनवमी जोरदार असणार आहे. विशेषतः श्री रामलल्लाच्या कपाळावरील 'सूर्य टिळक' (Surya Tilak) हे खास आकर्षण असणार आहे. रामनवमीनिमित्त चार मिनिटे प्रभू श्री रामलल्लाच्या कपाळी हे सूर्य टिळक असेल. याच्या तयारीसाठी वैज्ञानिक रविवारी रात्रभर या कामात व्यस्त होते.
अयोध्येत श्रीराम जन्मोत्सवाच्या (Ayodhya Ram Navami) तयारीला सुरुवात झाली आहे. मणिराम दास छावणी येथे श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासची बैठक शुक्रवार, दि. ०५ एप्रिल रोजी न्यासचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास जी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत प्रामुख्याने रामनवमीच्या तयारीवर चर्चा करण्यात आल्याचे न्यासचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले.
रामनवमीच्या रथयात्रेवेळी महाराष्ट्र, गुजरातनंतर आता पश्चिम बंगालच्या हावडा भागात हिंसाचार झाला आहे. प्रशासानातर्फे हिंसाचार शमवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, पुन्हा एकदा पुन्हा हिंसा उफाळून आली होती. शिवपूर पोलीस ठाण्यानजीक गुरुवारी हिंसाचार उफाळून आला होता.
रामनवमी, हनुमान जयंती या सणानिमित्त मिरवणूकांवर दगडफेक केल्याने हिंसाचार उफाळून आला. त्यानंतर हिंसाचारात सहभागी झालेल्यांच्या बेकायदा बांधकामांवर बुलडोझर फिरवण्यात आला. याच पार्श्वभूमीवर आता माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाणने टीका केली आहे.
रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या दिवशी देशभरात हिंसाचार आणि दंगली झाल्याच्या बातम्या समोर येत असून दिल्लीमधील जहांगीरपुरीत हनुमान जयंतीच्या दिवशी मोठा हिंसाचार झाला. या हिंसाचारात ८ पोलिसांसह ९ जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत २५ आरोपींना अटक केली असून अशा दंगली रोखण्यासाठी माजी आयपीएस आणि पुद्दुचेरीच्या माजी एलजी किरण बेदी काही सूचना केल्या आहेत. दंगली रोखण्यासाठी किरण बेदी यांनी पुढील ७ उपाय सुचवले आहेत.
श्रीराम नवमी हिंसाचारामागे परदेशांतून कट-कारस्थान रचण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. गुजरात पोलिसांच्या तपासातून ही खळबळजनक माहिती उघड झाली असून याबाबत काही महत्त्वाचे पुरावेदेखील सापडल्याचे समजते
धर्मांध मुस्लीम हिंसेला तयार होता, त्याची तयारी त्याने आधीपासूनच करुन ठेवली होती, त्यासाठी आपापल्या घरांत मोठ्या प्रमाणावर दगड साठवून ठेवले होते. फक्त श्रीराम नवमीची शोभायात्रा समोर येण्याचा अवकाश होता अन् शोभायात्रा येताच आपल्या भावना दुखावतील व आपण दगडफेक करू, असे ठिकठिकाणच्या धर्मांध मुस्लिमांनी आधीच ठरवले होते.
उत्तर प्रदेशातील विधान परिषदेच्या २७ जागांचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. त्यापैकी भाजपने २४ जागांवर दणदणीत विजय मिळवला, तर एका जागी जनतांत्रिक लोकसत्ता दल आणि दोन ठिकाणी अपक्षांनी बाजी मारली
रामनवमी उत्सवानिमित्त जेएनयू मध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमावर डाव्या संघटनांकडून झालेल्या हल्ल्याच्या घटनेवर शिक्षण मंत्रालयाने जेएनयू प्रशासनाकडे सविस्तर अहवाल मागवला आहे
विद्यापीठामध्ये श्रीराम नवमी आणि इफ्तार हे दोन्ही शांततापूर्ण वातावरणात पार पडले जात असल्याचे डाव्या संघटनांना ते सहन न झाल्याने त्यांनी हा संघर्ष घडवून आणल्याचे सांगण्यात येते. ‘जेएनयु’मधील हा संघर्ष एक हजार एकर एवढ्या विस्तीर्ण क्षेत्रात पसरलेल्या या विद्यापीठाच्या कावेरी मेसपुरताच मर्यादित राहिला. श्रीराम नवमीच्या दिवशी हा संघर्ष विद्यापीठाच्या अन्य भागात पसरला नाही
जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये (जेएनयु) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे (अभाविप) आयोजित श्रीराम नवमी कार्यक्रमावर डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांनी हल्ला केल्याचा आरोप अभाविपतर्फे सोमवारी करण्यात आला. यामध्ये अभाविपचे कार्यकर्ते जखमी झाले.
पश्चिम बंगालसह देशातील अनेक भागात रामनवमी साजरी करणाऱ्या हिंदूंच्या मिरवणुकांवर हल्ले झाले आहेत. हावडा येथील रामनवमीच्या मिरवणुकांवर झालेले हल्ले हे पश्चिम बंगाल पोलिसांचे कारस्थान असल्याचा दावा सुवेंदू अधिकारी यांनी केला आहे.
"श्रीराम हेच आमचे पूर्वज असून त्यांच्याशिवाय आमचे अस्तित्व काहीच नाही" अशा शब्दांत भावना व्यक्त करत वाराणसीत मुस्लिम महिलांनी रामनवमी उत्सव साजरा करत सामाजिक, धार्मिक ऐक्याचे दर्शन घडवले
भारतीयांचे आराध्य दैवत भगवान श्रीराम यांचा जन्मोत्सव संपूर्ण देशभरात उत्साहाने साजरी होत आहे
१४ वर्षांच्या वनवासामध्ये रामाच्या सहवासात येणारे बहुतेक सगळेच सहकारी आजच्या आधुनिक जगातले बहुजन समाजाशी वारसा सांगणारे पूर्वज आहेत. राम प्रत्येक क्षणी या समाजघटकांशी जोडले गेले आहेत. त्यामुळेच ‘आम्ही रामवंशी आहोत’ असे महाराष्ट्रातील रामोशी समाज म्हणतो; नव्हे देशातील कोणताही समाज हा आपली समाजमिथक कथा सांगताना रामाशी नाते जोडल्याशिवाय पुढे जात नाही. त्यामुळेच सर्व समाजघटकांचा प्रतिनिधी असलेले राम संविधानाच्या पुस्तकातही चित्रीत झाले. किन्नर एक शोषित वंचित घटक. स्त्री-पुरूष, किन्नर, पशू-पक्षी, वृक्षवेलींना आप
रामायण म्हटले की, आम्हासमोर उभ्या राहतात, त्या अनेक दिव्योत्तम, तपस्वी, त्यागी व कर्तव्यनिष्ठ अशा अनेकविध आदर्श प्रतिमा. रामायण (राम + अयन) म्हणजेच श्रीरामाचा समुज्ज्वल जीवनप्रवास. एक प्रकारची ही कर्तव्यनिष्ठेची वाटचाल. पवित्र उद्देशाचे हे मार्गगमन म्हणजेच अयन (यात्रा)! याच अयनात श्रीरामांना अनेक प्रवासी भेटतात. त्यातीलच एक महत्त्वपूर्ण प्रतिमा आम्हा सर्वांसमोर उभी राहते, ती म्हणजे बालब्रह्मचारी व शक्तिशाली अशा वीर हनुमंताची! वानर जातीमध्ये जन्मलेले, पण विविध ज्ञानसंपदेने व शौर्यगुणांनी परिपूर्ण असलेले हनुम
“स्वतः भारतभ्रमण करा, समस्या जाणून घ्या. त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमचे कार्य हीच राष्ट्रसेवा आहे, समाजसेवा आहे आणि हीच श्रीरामाची, समर्थांची सेवा आहे,” असे विचार समर्थ रामदासस्वामींचे अभ्यासक, ज्येष्ठ व्याख्याते सुहास जावडेकर यांनी खास श्रीराम नवमीनिमित्त दै. ‘मुंबई तरुण भारत’ला दिलेल्या मुलाखतीत मांडले.
रामायण आपल्याला नेतृत्व, शासन आणि व्यवस्थापनाचे धडे केवळ पुस्तकांमध्येच नाही, तर काही प्रतिष्ठित व्यवस्थापन संस्थांमध्येदेखील शिकवते. प्रभू राम हे दया, करुणा आणि प्रेमाचे प्रतीक आहेत. त्याच्या शहाणपणाने आणि सहनशीलतेमुळे त्याला विलास आणि राजेपणाच्या नुकसानाची चिंता न करता, आपल्या आंतरिक चांगल्या गोष्टींचे अनुसरण करणे शक्य झाले. रामायणामधून आपल्याला अनेक गोष्टी घेण्यासारख्या आहेत.
प्रत्येक हक्काबरोबर कर्तव्ये येत असतात. कर्तव्यविना हक्क म्हणजे शून्यता आहे. म्हणून हक्काची भाषा नंतर करा, कर्तव्यचरण अगोदर करा. दुसर्या भाषेत रामाचे अनुसरण करा, म्हणजे रामराज्य येईल. रामराज्य म्हणजे कुठल्या एका उपासनापंथाचे राज्य नव्हे अथवा रामाची देवळे बांधून रामरक्षेचे पठन करण्याचे राज्य नव्हे. हे राज्य, राज्यातील प्रत्येेकाने आपल्या कर्तव्यधर्माचे आचरण करण्याचे राज्य, असे समजले पाहिजे.
आज भव्य राममंदिराची होणारी स्वप्नमूर्ती तमाम रामभक्तांना सुखावणारी असली तरी तो रामजन्मभूमी आंदोलनाचा, कारसेवकांच्या बलिदानाचा परिपाक म्हणावा लागेल. जनमनात वसलेल्या रामासाठी धर्माचा, सत्याचा लढा प्रदीर्घ काळ चालला असला तरी न्यायालयीन आदेशांनुसार, कुठलाही हिंसाचार, कुठलाही तणाव निर्माण न होता अखेर रामजन्मभूमी स्थळीच राममंदिराचा पाया रचला गेला. गेल्या दीड वर्षात राममंदिराचे 30 टक्के काम पूर्ण झाले आहे. 2023च्या अखेरपर्यंत मंदिर पूर्ण व्हावे, असा प्रयत्न न्यासाच्यावतीने करण्यात येत आहे. तेव्हा, रामजन्मभूमी आंदो
भृगु वंशातील प्रचेताऋषींचे पुत्र वाल्मिकी वेदज्ञ होते. ‘सामान्य लोकांना वेदातील गहन अर्थ समजणे अशक्य असते’ या विचाराने धर्मतत्त्वांचे ज्याच्या जीवनात प्रगटीकरण झालेले आहे, ज्याचे अनुसरण समाजाने करावे, अशा आदर्श व्यक्तीच्या शोधात वाल्मिकी होते. नारदऋषींशी या विषयावर चर्चा करताना नारदांनी त्यांना ‘इक्ष्वाकु’ कुळातील रामाविषयी, रामकथा थोडक्यात सांगितली. वाल्मिकींनी आपल्या ‘ऋतंभरा प्रज्ञे’द्वारा रामाविषयीच्या सर्व गोष्टी जाणल्या. वाल्मिकींनी कथा लिहिली. हेच ते ‘वाल्मिकी रामायण.’ तेव्हा राम अयोध्येत राज्य करीत ह
भारतीय संस्कृतीचे मापदंड समजून घेणे म्हणजेच रामायण. रामायण व राम विश्वाचे असाधारण केंद्र आहे. नीति, न्याय आणि नेतृत्व जाणून घ्यायचे, तर ते रामायणातूनच! मानवीय मूल्यांचे प्रतिनिधित्व राम करतो. रामायणाची शेकडो संस्करणे आहेत. पण, त्या सर्व संस्करणांत राम हा मानव म्हणूनच वर्णिला आहे. जगावे कसे, तर रामासारखे मर्यादापुरुषोत्तम! योगी-महंतांनी श्वासात रामाला गोवले. अशा या रामाचे रामायण आदी कवी वाल्मिकींनी रचिले. परंतु, विश्वव्यापी रामायणाची आणखीही भाषात संस्करणे आहेत. त्यांची माहिती जाणून घेऊया.
दि. १३ सप्टेंबर २००७. संपुआ सरकारने सर्वोच्च न्यायालयात ‘अॅफिडेव्हिट’ सादर केले. त्याचा आशय होता - श्रीराम ही काल्पनिक व्यक्तिरेखा आहे, ऐतिहासिक नाही. श्रीराम कधीच जन्मले नव्हते. अर्वाचीन काळात जन्म झाल्याचा पुरावा म्हणजे जन्मदाखला. या दाखल्यावर काय काय माहिती येते? तर - बाळाचे नाव, आई-वडिलांचे नाव, कुळाचे नाव, पूर्वजांचे नाव, जन्म तिथी, जन्म वेळ, जन्म वर्ष आणि जन्मस्थान. श्रीरामांच्या बाबतीत यातील कोणती माहिती ‘वाल्मिकी रामायणा’तून उपलब्ध होते. आज रामनवमीनिमित्त त्यावर टाकलेला हा प्रकाश...
चैत्र मासात येणार्या ‘मत्स्यजयंती’च्या दिवशी भगवंतांनी समुद्रात लोप पावणार्या वेदांचे रक्षण करून मानवी सृष्टीच्या पैलतीराला ते नेऊन पोहोचविले. भगवान वेदव्यासांचा ‘पैल’ नावाचा शिष्य होता. व्यासांची माता मत्स्योदरी हीसुद्धा मत्स्याचाच अवतार. याच मत्स्योदरीच्या पोटी वेदव्यासांनी जन्म घेतला. त्यांचे पिता पराशर-परासृष्टीला शर मारून वेध घेणारे ते पराशर. सात वर्षांच्या लहानशा मत्स्योदरीवर ते भाळले होते. सप्तचक्रांकित मानवी देहपिंडावरच तर साधकाची सारी मदार असते.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यंदाचा ब्रम्ह रथोत्सव रद्द