‘नेटवर्क एन3 सत्यमेव न्यूज’ यांच्यावतीने देण्यात येणारा ‘पुरनराव स्मृती सन्मान : इंडियन मीडिया वॉरियर’ हा पुरस्कार दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादक योगिता साळवी यांना जाहीर झाला आहे. सोमवार, दि. 17 जून रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत राजस्थान, जयपूरमधील नारायण सिंह सर्कल येथील पिंक सिटी प्रेस क्लब येथे हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. पत्रकारिता क्षेत्रात अमूल्य कार्य करणार्या देशातील 20 पत्रकारांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. त्यांपैकी महाराष्ट्रातून उपसंपादक योगिता साळवी यांना हा पुरस्कार जाहीर
Read More
“धर्म आणि संस्कृतीला सर्वात जास्त धोका हा जातीनिहाय जनगणना, ‘लव्ह जिहाद’, ’लॅण्ड जिहाद’ यांचा आहे. पण, ज्या देशात धर्म आणि संस्कृती टिकून आहे, तिथे या कोणत्याही समस्या नसतात,” असे मत दै. ‘मुंबई तरूण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांनी व्यक्त केले. उज्ज्वला मंडळ, कल्याणतर्फे शारदोत्सवअंतर्गत ‘धर्म, संस्कृती आणि समस्या’ या विषयावर बुधवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी व्याख्यान आयोजित केले होते, यावेळी साळवी बोलत होत्या. अभिनव विद्यामंदिर, कल्याण येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी निलेश लिमये, डॉ. रत्नाकर फाटक, दी
मुंबई : अवघ्या महाराष्ट्राला ‘लव्ह जिहाद’विरोधात जागृत करणार्या दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादक योगिता साळवी यांना स्वा. सावरकर वीरता पुरस्कार जाहीर झाला आहे. साळवी यांनी ‘लव्ह जिहाद’ विरोधात जनजागृती केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
एक चित्रपट समीक्षक, चित्रपट परिनिरीक्षण मंडळाची सदस्य म्हणून गेल्या ५३ वर्षांच्या पत्रकारितेत अक्षरश: शेकडो-हजारो देशीविदेशी चित्रपट पाहून झालेत अन् काल ‘द केरला स्टोरी’ चित्रपट मुंबईतील चेंबूरच्या थिएटरच्या पडद्यावर पाहिला तेव्हा अवाक् व्हायला झालं.
येत्या काळात ‘लव्ह जिहाद’ टाळणे काळाची गरज असल्याचा इशारा दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका आणि ‘लव्ह जिहाद’विरोधात प्रखर मत मांडणार्या योगिता साळवी यांनी दिला आहे. जनकल्याण समिती वस्ती परिवर्तन योजनेंतर्गत कार्य करणार्या कार्यकर्त्यांशी त्यांनी रविवार, दि. 12 फेबुवारी रोजी ‘लव्ह जिहाद समजून घेताना’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांना दि. 28 जानेवारीपासून अज्ञात दूरध्वनी क्रमांकावरून तसेच व्हॉटसअॅप संदेशावरूनही धमकी देण्यात येत होती. त्यानंतर फोन आणि व्हॉटसअॅपवरून संदेश पाठवणार्या चार व्यक्तींविरोधात शनिवार, दि. 4 फेब्रुवारी रोजी वडाळा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. यावेळी योगिता साळवी यांच्यासोबत त्यांना कायदेशीर सहकार्य करणारे अॅड. मदन गुप्ता उपस्थित होते. दै. ‘मुंबई तरुण भारत’चे ‘माणसं’ हे एक लोकप्रिय सदर आहे. या सदरामध्ये दि. 17 जानेवारी रोजी वारली समाजबांधव नरेश म
पेणमध्ये दि. १९ जानेवारी रोजी ‘पेण एज्युकेशन सोसायटी’ आणि ‘अहिल्या महिला मंडळ येथे दै. ‘मुंबई तरुण भारत’चे ‘माझं शहर लव्ह जिहादमुक्त शहर’ अभियान सभेचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही ठिकाणी सभेला अभुतपूर्व प्रतिसाद लाभला. यावेळी दै. ‘मुंबई तरूण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी या प्रमुख वक्ता होत्या.
दि. ७ जानेवारी रोजी ‘जिओ रोटी घर’ संस्थेतर्फे वनवासी कल्याण आश्रमाच्या जांभिवली येथील वसतिगृह व ४५ कुटुंबं असलेल्या एका पाड्यावर सोलापुरी चादरींचेवाटप केले. या सेवा उपक्रमाला वनवासी कल्याण आश्रमाची कार्यकर्ती म्हणून मी उपस्थितहोते. या सेवा उपक्रमाबद्दल माहिती...
’संस्कारक्षम पिढी घडण्याच्या काळातच अनेक युवती ’लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अलगदपणे अडकतात. भूलथापांना बळी पडून स्वतःसह पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत असून, या अदृश्य ‘लव्ह जिहाद’विरोधी लढ्यासाठी आता सज्ज व्हा,” असे आवाहन दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांनी केले.
जेष्ठ पत्रकार योगिता साळवी यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या आहेत. त्याप्रकरणी चेंबूर परिसरातील टिळक नगर पोलीस चौकी येथे साळवी यांनी एफआयआर दाखल केली आहे. गेल्या काही दिवसांपासून साळवी या रुपाली चंदनशिवे हत्याप्रकरणी सत्य उजेडात यावे यादृष्टीने वार्तांकन करत होत्या. याप्रकरणात गप्प राहण्यासाठी साळवी यांच्यावर दबाव टाकण्यात येत आहे.
आम्हाला त्रास झाला तर सोडणार नाही! धर्मांधांच्या पत्रकार योगिता साळवी यांना धमक्या रुपाली चंदनशिवे या तरुणीच्या हत्या प्रकरणाचे वार्तांकन करत असल्याच्या कारणावरून दै. मुंबई तरुण भारतच्या ज्येष्ठ पत्रकार योगिता साळवी यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या आहेत. त्या प्रकरणी चेंबूर परिसरातील टिळकनगर पोलीस ठाण्यात साळवी यांनी एफआयआर दाखल केली आहे. रुपाली चंदनशिवे हत्याप्रकरणात पहिल्या दिवसापासून साळवी आढावा घेत आहेत. याच कारणास्तव रुपालीच्या घरी कुटुंबियांच्या भेटीसाठी गेल्या असता गप्प राहण्यासाठी त्यांच्
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून स्वत:चे अस्तित्व निर्माण करणार्या, द्रौपदी मुर्मू देशाच्या सर्वोच्च नागरिक राष्ट्रपती होतात. स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षानिमित्तच्या प्रगतीचा हा अत्यंत उत्स्फूर्त आलेख म्हणावा लागेल. या अनुषंगाने स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षांतील महिलाशक्तीची वाटचाल आणि त्यांनी गाठलेली यशोशिखरे यांचा मागोवा घेणारा हा लेख...
१२ मे, २०२१ रोजी पोप फ्रान्सिस यांनी ‘प्रार्थनेची जादू’ यावर प्रवचन केले होते.
देश आणि समाजाने आपल्याला सर्वच दिले आहे. त्यांचे ऋण फेडायलाच हवे. या विचारांनी संपर्कात येणार्या प्रत्येक समाजघटकाच्या उत्कर्षासाठी कार्य करणार्या गीता मोघे. त्यांच्या जीवनपटाचा घेतलेला आढावा.
११ मे रोजी नाना पालकर स्मृती समितीच्या इमारतीमध्ये अवयवदान क्षेत्रातील तज्ज्ञ समाजसेवक अनिरूद्ध कुलकर्णी यांचे ‘अवयवदान’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अवयवदान हा विषय तसा गंभीरच. या व्याख्यानामध्ये काय असेल बरं... असा अंदाज घेत असताना वाटले की, मृत्यू, त्यानंतरची नातेवाईकांची होरपळ, अवयवदान म्हणजे काय? किंवा मृत्यू आणि कायद्याची जड गंभीरता या व्याख्यानामध्ये नक्की असेल असे वाटले. पण हे व्याख्यान म्हणजे मानवाच्या मृत्यूनंतरही त्याला लाभलेल्या जीवदानाच्या अद्भुत शक्तीविषयीचे सकारा
महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी नवी दिल्ली येथे ‘मूकनायक सामाजिक पत्रकारिता’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांना हा पुरस्कार केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
दै. मुंबई तरूण भारतच्या उपसंपादक योगिता साळवी यांना काव्यामित्र संस्थेतर्फे देण्यात येणारा राष्ट्रीय गुणवंत पत्रकार पुरस्कार जाहीर झाला आहे.
मिस वर्ल्ड’ या ‘ब्युटी पेजंट’मध्ये आता तृतीयपंथीही अधिकृतपणे सहभागी होऊ शकतात, असा निर्णय ‘मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशन’च्या अध्यक्षा ज्युलिया मोर्ले यांनी घेतला. स्पेनची अँजेला पॉन्स ही ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेत सहभागी होणारी पहिली तृतीयपंथी होती. त्यापूर्वी २०१२ मध्ये कॅनडाच्या जेना तालाकोवाने ‘मिस वर्ल्ड’मध्ये भाग घेतला होता, पण तिला अपात्र ठरवले गेले.