आपण मागील काही लेखांपासून स्वास्थ्यासाठी योगासनांचा अभ्यास सुरू केला आहे. शरीराच्या प्रमुख चार संस्था - श्वसन, रक्ताभिसरण, पचन आणि मलनिस्सारण व्यवस्थित ठेवण्यासाठी चार आसने रोज शरीराचे तप, दुःख स्वीकार म्हणून करावयाची. त्या अर्ध आणि पूर्ण स्थिती आसनांचा अभ्यास आपण केला. त्यासाठी सकाळचा वेळ हा केव्हाही उत्तम. स्वास्थ्यरक्षणासाठी काही विशिष्ट आसनांचा सायंकाळी अभ्यास करावयाचा असतो. सायंकाळी आपण शरीराने आणि मनाने थकलेलो असतो. दिवसभरात केलेल्या कामाचा ताण शरीर व मनावर असतो. आपण घरी येतो, हात धुतो आणि जेवतो. शरीर
Read More
बदलापुरात योगासने करणारा गणपती असा देखावा असणारा लक्ष वेधून घेतो आहे. सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करणाऱ्या नरेकर कुटुंबीयांनी यंदा योगाचे महत्त्व सांगणारा देखावा सादर केला आहे. योगाचे महत्व सांगताना गणपती स्वतः पद्मासन घालून बसलेला आहे. तर गणेशाचे वाहन असलेले पाच उंदीर वेगवेगळे आसन करत आहेत.
महाराष्ट्रातील प्रत्येक उच्च संत अतिकठीण योगसाधना करीत असत. कुंभक प्राणायाम, योगनिद्रा व शवासन साधना पूर्ण झाल्यावर साधक श्वास विरहित अवस्थेत अनेक तास राहू शकतो. त्यामुळे आपल्या जड शरीराबाहेर येऊन स्वतःचे शव स्वतःच पाहू शकतो. ज्याप्रमाणे बर्फ विरघळल्यावर त्याचे रुपांतर पाण्यात होते. पाणी तापवल्यास त्याचे रुपांतर वाफ तयार होते. त्यात पुन्हा अणु-रेणू असतात. या पाण्याच्याच एकापेक्षा एक सूक्ष्म अवस्था आहेत. त्याचप्रकारे शास्त्रात आपली चार शरीरे सांगितली आहेत.
विद्या या विमुक्तये’ अशी विद्येची परिभाषा आहे. ज्यामुळे मुक्ती मिळेल ती विद्या होय. आसने, असल्या मुक्तीकरिताच असल्यामुळे त्याचे नाव वैदिक ऋषिमुनींनी ‘आसन’ असे ठेवले आहे. आसने अनेक प्रकारची आहेत. त्यापैकी कुंडलिनी जागृतीकरिता खालील आसने उपयोगाची आहेत.
सामूहिक सूर्यनमस्कार प्रात्यक्षिकाद्वारे हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढ याचा संदेश देण्याचाही प्रयत्न असेल. आजच्या जगात जेथे हवामानविषयक जाणीव असणे अत्यावश्यक आहे, दैनंदिन जीवनात सौर ई-ऊर्जा (हरित ऊर्जा) मिळाल्याने पृथ्वीला धोका निर्माण करणारे कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणात कमी होईल. याशिवाय, हा कार्यक्रम आपल्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेत मकर संक्रांतीचे असलेले महत्त्व अधोरेखित करेल. सूर्यनमस्कार हा आठ आसनांचा एक संच आहे जो शरीर आणि मनाच्या समन्वयाने १२ चरणांमध्ये केला जातो. हे शक्यतो पहाटे केले जा
भारताला योगाची मोठी परंपरा असून त्याबाबत गेल्या काही वर्षांत मोठी जनजागृतीही झाली. आज आपण जाणून घेऊया योगक्षेत्रातच जागतिक विक्रमाची नोंद करणार्या सातवीतील श्रेया शिंदेबद्दल...
क्रीडा मंत्रालयातर्फे सहा महिन्यांत मान्यता प्राप्त नॅशनल योगासन स्पोर्टस फेडरेशनचे काम गतीने सुरू आहे. मध्य प्रदेशमध्ये ४ मार्च ते १९ मार्च दरम्यान राज्यस्तरीय ऑनलाईन योगासन चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले आहेत. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी अटी कोणत्या आहेत तसेच पात्रतेचे निकष काय याची माहिती जाणून घेऊयात.
वर्षानुवर्षे शारिरीक व्याधींशी निगडीत दुखणे असणाऱ्यांसाठी एक दिलासादायक वार्ता आहे. नुकत्याच एका अभ्यासातून मिळालेल्या माहितीनुसार ध्यान आणि योगासनांच्या मदतीने रुग्णांचे दीर्घकालीन दुखणे आणि तणाव नाहीसा होण्यास मदत होईल, असा दावा करण्यात आला आहे. २०१८ मध्ये 'आय इंडियन जर्नल ऑफ पॅलिएटिव्ह केयर' या संस्थेच्या अहवालानुसार भारतातील १९.३ टक्के लोकसंख्या दीर्घकालीन दुखणे, तीव्र वेदनेशी संबंधित त्रासाने पीडित आहेत. देशाच्या लोकसंख्येचा विचार केला असता ही संख्या १८ ते २० कोटींपर्यंत असू शकते.
या सृष्टीचक्रात कलियुग संपल्यानंतर सत्ययुगाचे येणे हे अटळ आहे. परंतु, ते सत्ययुग काय आहे, कसे आहे, ते येते कसे, हे काही आपण जाणत नाही. या सत्ययुगाचे वर्णन सनातन ज्ञान मिळवणार्यांना कळते. तसेच ते अरविंदांसारख्या योग्याला साक्षात्कारातून कळले आहे. सविस्तर, मागच्या पुढच्या सार्या गोष्टींसह नाही, इतिहास-भूगोलासह नाही. परंतु, त्याची क्षणिक झलकसुद्धा या योग्याच्या दृष्टीला किती सुखावून गेली आहे. त्यांच्या बुद्धीने, दिव्य दृष्टीने त्याचे मर्म पकडले आहे. प्रतिभेने ते शब्दांत मांडले आहे.
तेरणा स्पेशालिटी रुग्णालयात स्तुत्य उपक्रम
आपल्या राज्यातील संदीप जाधव या योगगुरूने कझाकिस्तानमध्ये सुरू केलेल्या प्रज्ञा योगधामच्या माध्यमातून तेथे आजमितीस मोठ्या प्रमाणावर योगसाधनेचा विकास होण्यास मदत झाली आहे. नुकतेच तेथे योगविद्याधामचे विश्वास मंडलिक यांच्या योगविषयक वर्गाला लाभलेली उपस्थिती ही तेथील योगसाधनेच्या लोकप्रियतेची साक्ष देते.