Murlidhar Mohol पाच वर्षात सहकार क्षेत्राला १७ लाख प्रशिक्षित तरुणांची गरज भासणार आहे. त्याकरिता सहकार क्षेत्रातील शिक्षण, प्रशिक्षण व कौशल्य आधारित प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज भासेल. त्यासाठी त्रिभुवन सहकार विद्यापीठ सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देईल, असे प्रतिपादन केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्यसभेत केले आहे.
Read More
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या तत्परतेमुळे अपघातग्रस्त पुणेकराला तातडीने पोर्ट ब्लेअरहून पुण्यात आणण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. सर्व यंत्रणा युद्धपातळीवर राबवत त्यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले. मंत्री मोहोळ यांनी ग्रीन कॉरिडॉर करण्याच्या सूचना दिल्याने एअर एम्बुलन्सने अवघ्या १३ मिनिटांत पुणे विमानतळ ते पूना हॉस्पिटलचे अंतर कापले.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महानगरातील विकासकामांना गती कशी देता येईल, त्यादृष्टीने अनेक निर्णय घेतले आणि प्रशासनासोबत बैठका घेत, त्या कामांना गती देण्यासाठीदेखील पुढाकार घेतला. यामुळे ‘मेट्रो’ प्रकल्पाचे पुढील काम, रेल्वे कामांना गती आणि विशेषतः विमानतळ टर्मिनल आणि विमानांच्या सेवांमध्ये वाढ अशी कामे झाल्याचे अलीकडील काळात बघायला मिळाले. डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात येथून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरु झाली आहेत. शिवाय, या विमानतळाचे ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्र
‘लोकतंत्र न बहुमत का शासन हैं, न अल्पमत का; यह जनता के इच्छा का शासन हैं।’ तत्त्वचिंतक आणि अंत्योदयाचा विचार मांडणार्या पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या या उक्तीला साजेशा पद्धतीने प्रभावी प्रशासन राबविणारे देवेंद्र फडणवीस यांना अवघा महाराष्ट्र पाहतो आहे. जनतेच्या इच्छा-आकांक्षांची अचूक जाण, त्यानुसार कृती, राज्याला अव्वल स्थानावर नेण्यासाठीची दीर्घदृष्टी ही देवेंद्रजींची वैशिष्ट्ये असल्याने ते प्रभावी नेता ठरले आहेत. कर्तृत्व, नेतृत्व आणि वक्तृत्व यांचा सुयोग्य संयोग असलेल्या देवेंद्रजींच्या गळ्यात पुन्हा मु
राज्यभरात सध्या मुख्यमंत्री कोण होणार? अशा चर्चा सुरु असतानाच खासदार मुरलीधर मोहोळ यांचे नाव माध्यमांमधून पुढे आले होते. दरम्यान, मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे. माझ्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठीची चर्चा कपोलकल्पित आहे, असे म्हणत त्यांनी या चर्चेला पुर्णविराम दिला.
ठाणे : “महाराष्ट्राला देशातील पहिल्या क्रमांकांचे राज्य बनवण्याचा संकल्प भाजप महायुतीने केला आहे. तेव्हा, महाराष्ट्राच्या विकासासाठी पुन्हा महायुतीलाच कौल द्या,” असे आवाहन केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री तथा खासदार मुरलीधर मोहोळ ( Murlidhar Mohol ) यांनी केले. तसेच, “लाडकी बहीण योजने’वर आधी टीका करणारे आता लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देण्याचे खोटे आश्वासन देत आहेत,” अशी टीकाही खा. मोहोळ यांनी केली.
‘नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या प्रकल्पातील पहिल्या टप्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या विमानतळाचा पहिला टप्पा मार्च २०२५ पर्यंत प्रवाशांसाठी खुला करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना या विमानतळाच्या पाहणीदरम्यान दिली.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टी विस्तारासाठी आवश्यक असलेल्या बहुप्रतिक्षित ओएलएस सर्वेक्षणाला संरक्षण मंत्रालयाने सोमवार दि.२४ रोजी मंजुरी दिली. यामुळे पुण्यातून मोठ्या विमानांची आंतरराष्ट्रीय उड्डाणे होण्याचा मार्ग मोकळा होणार असून, पुण्याचे खासदार आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या पाठपुराव्याला पहिल्याच प्रयत्नात यश आले आहे.
मोदी सरकारचे खातेवाटप Modi Cabinet जाहीर झाले असून अनेक मंत्र्यांचे मागील खाते कायम राहिले आहेत. तर काही मंत्र्यांना नवीन खाती देण्यात आली आहेत. सोमवार, १० जून रोजी एनडीए सरकारमधील मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर झालं. दरम्यान, राज्यातील ६ मंत्र्यांचं खातेवाटपही जाहीर करण्यात आलं आहे.
तुमच्या बगलबच्च्या कंत्राटदारांना दूर ठेवा, असा खोचक टोला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंना लगावला आहे. रविवारी पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावर सुप्रिया सुळेंनी टीका केली होती. त्यानंतर आता चित्रा वाघ यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
रा.स्व.संघाचे स्वयंसेवक, भाजप कार्यकर्ता, महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष, पुणे शहराचे महापौर अशा विविध जबाबदाऱ्या लिलया पेलणारे मुरलीधर मोहोळ यांचा पुणे शहर आणि परिसरात दांडगा जनसंपर्क आहे. हेच पाहता मुरलीधर मोहोळ यांना पुणे लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले. याच पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार मुरलीधर (अण्णा) मोहोळ यांच्याशी दैनिक मुंबई तरुण भारतने केलेली बातचीत.
महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची आणि कुस्तीचा कुंभमेळा असणाऱ्या 'महाराष्ट्र केसरी' स्पर्धेचा थरार १० ते १४ जानेवारी २०२३ या कालावधीत पुण्यात रंगणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनाची संधी संस्कृती प्रतिष्ठानला मिळाली असून, कै. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी, किनारा हॉटेल जवळ, कोथरूड, पुणे येथे हा थरार अनुभवायला मिळणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस व 'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेचे मुख्य संयोजक व संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत सामर्थ्यशाली झाला आहे. पाकिस्तान भारतात दहशतवादी कारवाया करू शकत नाही तसेच भारताकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करण्याची भारताची ताकद आहे. यामुळे हताश पाकिस्तानकडून मा. मोदीजींविषयी अपमानास्पद वक्तव्य करण्यात आले, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी पुणे येथे केली.
श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवार दिनांक १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ५:०७ वाजता पुण्यात वृधाप्काळाने निधन झाले. ते १०० वर्षांचे होते. त्यांच्या अंत्यदर्शनाला, त्यांच्या पर्वती येथील पुरंदर वाडा परिसरात लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तसेच अत्यंविधीला नवी पेठेतील वैकुंठ स्म्शान भूमी परिसरामध्ये पण अनेक नागरिकांनी आणि इतिहास प्रेमींनी गर्दी केली होती.पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे शहरातर्फे बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली. काल रात्री मुरलीधर मोहोळ यांनी श्रीमंत.बाबासाहेब पुरंदर
''वाढदिवशी संकल्प रक्तदानाचा'' असा उद्देश समोर ठेवून पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच मंगळवार दिनांक ९ नोव्हेंबर २०२१ रोजी पुण्यात 'रक्तदान महासंकल्प दिवस' आयोजित केला आहे. पुण्यातील शुभारंभ लॉन्स येथे मंगळवारी ९ नोव्हेंबरला दिवसभर रक्तदान शिबिराचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
मुंबई- पुणे- सातारा अश्या तीन महत्वाच्या शहरांना जोडणारा आणि पुणे महानगरपालीकेच्या हद्दीतून जाणाऱ्या ''नवले पुलावर'' गेल्या आठवड्यात ८ अपघात होऊन १५ जणांचा जीव गेला आहे. या प्रश्नावरून पुणे महानगरपालिकेच्या मुख्यसभेत गदारोळ पाहायला मिळाला.
पुण्यातील महत्वपूर्ण मुद्द्यांवरून आज २९ जून रोजी मंत्रालयात उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक होते आहे. मात्र या बैठकीचे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना आमंत्रणच देण्यात आलेले नाही.
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना पुणे महानगरपालिका सक्षमपणे करत असून तज्ञांची मते लक्षात घेता तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आपण सज्जता ठेवण्यास प्राधान्य देत आहोत, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीत सेवा देणाऱ्या पुणे महानगरपालिका, 'स्व' रूपवर्धिनी, 'सेवा सहयोग' व 'सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्प' या संस्थांच्या कोरोनादूतांचा सन्मान
मराठी साहित्यात आणि मराठी जनतेच्या मनात अलौकिक ठसा उमटविणारे, ‘आधुनिक वाल्मिकी’ म्हणून ओळखले जाणारे ‘गदिमा’ यांचे गेली अनेक दशकं रखडलेलं स्मारक आता पुणे येथे महात्मा सोसायटी, कोथरूडला साकार होतंय. स्मारकाच्या या जागेचा भूमिपूजन सोहळा नुकताच २२ मार्चला संपन्न झाला. हा सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच लोकांच्या, गदिमांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पार पडला. याविषयी जाणून होतेच, पण नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांच्याशी बोलून स्मारकाविषयी आणखी जाणून घेतले.
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली भावना
'जम्बो'त रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांशी साधला संवाद
भाजपचे मुरलीधर मोहोळ यांना ९९ मते तर राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेनेचे प्रकाश कदम यांना ६० मते