ब्रिटिशकाळात बांधण्यात आलेल्या या रुग्णालयामुळे ठाण्यात राहतो, असे म्हटल्यावर लागलीच संशयी नजरेने पाहत जणू ठाणे म्हणजे वेड्यांचे शहर, असेही गंमतीने म्हटले जात असे. कोरोनामुळे लागू केलेल्या ‘लॉकडाऊन’काळात या मनोरुग्णालयात मनोरुग्ण वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Read More
मनोरुग्णांसाठी आरोग्य विमा (मेडिक्लेम) पॉलिसीतून आतापर्यंत संरक्षण मिळत नसे. पण १६ ऑगस्ट, २०१८ रोजी विमा कंपन्यांची नियंत्रक यंत्रणा असलेल्या इन्शुरन्स रेग्युलेटरी अॅक्ट डेव्हलपमेंट ऑथोरिटी ऑफ इंडिया (आयआरडीएआय) ने एक पत्रक काढून मनोरुग्णांसाठी विमा संरक्षण द्यावे, अशा सूचना सर्व सर्वसाधारण विमा कंपन्यांना दिल्या आहेत.
आतापर्यंत भारतात मनोविकारांचा, मानसिक आजारांचा किंवा त्या संबंधित विमा उतरवला जात नसे, पण देशात मानसिक आरोग्य कायदा, २०१७ यावर्षीच्या २९ मे पासून लागू झाला आणि मनोविकारांनाही विम्याच्या कक्षेत आणण्याचे निश्चित करण्यात आले.