नवी दिल्ली : पश्चिम बंगाल सरकारने ( Mamta Govt. ) ‘मनरेगा’ योजनेचा लाभ अपात्रांना दिल्याचा घणाघात केंद्रीय कृषी आणि ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंगळवारी लोकसभेत केला आहे.
Read More
अमरावती : उन्हाळा, तसेच अल निनो प्रभावाचा विचार करता भविष्यात टंचाईसदृश्य स्थिती निर्माण होवू नये यासाठी परिपूर्ण नियोजन करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय यांनी येथे दिले. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक दुरदृश्य प्रणालीद्वारे विभागीय आयुक्तांनी घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
केंद्र सरकारच्या 'मनरेगा' योजनेची उपयुक्तता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. कोरोना काळात याच योजेनच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना रोजगार पुरवणे शक्य झाले आहे. अझीम प्रेमजी इन्स्टिट्यूटच्या गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. कोरोना काळात खेड्यांमध्ये राहणाऱ्या जवळपास ८० टक्के कुटुंबांना मनरेगाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य देणे शक्य झाले आहे. महाराष्ट्र, बिहार, मध्यप्रदेश, कर्नाटक या चार राज्यांमध्ये अझीम प्रेमजी इन्स्टिट्यूटच्या आणि नॅशनल कॉन्सोर्टियम ऑफ सिव्हील सोसायटी ऑर्गनायझेशन्स ऑन न
‘मनरेगा’ ही योजना म्हणजे काँग्रेसच्या अपयशाचे जीवंत स्मारक आहे. पण, ही योजना आमचे सरकार बंद करणार नाही, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याविषयी लोकसभेत बोलताना मांडली होती. त्यामुळे अशा या बहुचर्चित योजनेचा शहरी असंघटित कामगारांच्या दृष्टीनेही अधिक व्यापक विचार करण्याची गरज आहे. त्याविषयी...
शहरांतील स्थलांतरीतांना रोजगार देण्याची मोहिम विश्वेषकांच्या मते, शहरांमध्ये जर मनरेगा सुरू झाली तर अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळण्याची शक्यता आहे. बेरोजगारांना रोजगार मिळून त्यांचे आयुष्य सुधारण्यासाठी मोठी मदत होईल. अद्यापही कोरोनामुळे देशातील संपूर्ण अर्थचक्रे सुरळीत सुरू झालेली नाहीत. गावाकडे परतलेले आणि रोजगाराच्या शोधात असलेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळेल, अशीही अपेक्षा आहे.
मनरेगाचे काम आधारशी संलग्न करून लाभार्त्यांना त्यांची मजुरी थेट त्यांच्या खात्यात जमा केल्यामुळे ही वाढ झाल्याचा अंदाज या सर्वेक्षणात मांडण्यात आला.
बेरोजगारीचा प्रश्न देशात नवीन नाही. वाढत्या लोकसंख्येबरोबर रोजगाराचे प्रश्न निर्माण होत होते. त्यात अकुशल कामगारांचा प्रश्न सरकारसमोर दत्त म्हणून उभा होता.
स्थानिक स्तरावरुन पुरेसे पाणी मुबलक स्वरुपात मिळू लागल्याने झाबुआतील इतर गावांप्रमाणेच पखालिया आणि परिसरात सर्वच शेतकर्यांना बारमाही शेतीत अधिक उत्पादन घेता येऊ लागले.