गुजरात विधानसभेत दि. २१ ऑगस्टपासून तीन दिवसीय पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. गुजरात सरकारने नरबळी, अंधश्रद्धा आणि जादूटोण्यावर बंदी घालण्यासाठी या अधिवेशनात विधेयकही मांडले आहे. राज्यातील अंधश्रद्धा आणि जादूटोण्याच्या वाढत्या घटना पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या नरबळी आणि अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाला आता संत-महंतांनीही पाठिंबा दर्शविला आहे. गुजरातमधील नामवंत कथाकार आणि महंतांनी सरकारचे कौतुक करतानाच जादूटोणाविरोधी विधेयकाचे स्वागत केले आहे. राज्यात अशा कायद्याची नितांत गरज होती. नरबळीच्या गुन्हे
Read More
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आता उ. बा. ठा. गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गुजरातमध्ये आमचा खऱ्या अर्थाने विजय आणि भाजपाची हार, अशी प्रतिक्रिया दिली आहे. "गुजरातच्या जनतेला महाराष्ट्राने एवढे सगळे उद्योग गिफ्ट दिलेले आहेत. महाराष्ट्राचे उद्योग गुजरातच्या जनतेला खुश करण्यासाठी उपयोगी पडले असतील, तर चांगली गोष्ट आहे. आजही गुजरातला निवडणुका जिंकण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडिओ वापरावा लागतो." असे त्या म्हणाल्या.
गुजरात विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचा सुफडा साफ झाल्याने वैतागलेल्या कार्यकर्त्यांने स्वतःच्याच पक्षाचे कार्यालय फोडले आहे. "माझं संपूर्ण आयुष्य सगळ्यात निघून गेलं. पण कुठलही पक्षातील नेतृत्व गुजरातकडे लक्ष देत नाही. कुठलंही परिवर्तन आजतागायत झालेलं नाही. आतल्या आत तिकीटांसाठी राजकारण खेळलं जात आहे. निवडणूक निकालात काँग्रेसची परिस्थिती सुधारावी यासाठी आम्ही दिवसरात्र एक केलं होतं. पण काँग्रेसी नेते थंड बसून आहेत. एकटे राहुल गांधीच फक्त ग्राऊंडवर दिसत आहेत.", अशी टीका या संतप्त कार्यकर्त्यांने स्वतःच्याच पक्ष
गुजरात विधानसभा निवडणूकीत भाजपने काँग्रेसचा सुफडा साफ केल्यानंतर मविआचे नेते आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रीया दिली आहे. "गुजरात, हिमाचलच्या निवडणूका झाल्या आता महाराष्ट्रातील मुंबई महापालिकेसह उर्वरित सर्वच निवडणूका जाहीर कराव्यात", अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे. निवडणूक निकालांवर प्रतिक्रीया देताना ते बोलत होते. मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाण्यासह सर्वच महापालिकांच्या निवडणूका प्रलंबित आहेत. त्या वेळेत घेतल्या जाव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे.
गरिबी निर्मूलनासाठी केरळ सरकार राबवत असलेली ’कुटुंबश्री’ योजना आता वादात सापडली आहे. या योजनेंतर्गत स्वयंसेवक मदत गटाने आपल्या स्वयंसेवकांना मुलगा आणि मुलीला समान अधिकार देण्याची शपथ घेण्यास सांगितले होते. परंतु, मौलवींनी या शपथेला ‘शरिया’ विरुद्ध असल्याचे सांगत विरोध केला. यानंतर आता राज्य सरकारने या शपथेवर बंदी घातली आहे. केरळमधील मुस्लिमांच्या समस्त केरळ ‘जाम-इयुथुल कुतबा कमिटी’ने ’कुटुंबश्री योजनें’तर्गत काम करणार्या महिलांच्या शपथविधीला विरोध केला आहे.
गुजरात विधानसभा निवडणूकांच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानाला सोमवारी सकाळी ९ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान सुरू राहिल. राज्यातील १४ जिल्ह्यांच्या ९३ विधानसभा जागांसाठी हे मतदान होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सोमवारीच मतदान केले. मोठ्या संख्येने मतदानासाठी उतरा, असे आवाहनही त्यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक फोटो ट्विट करुन मतदान केल्याबद्दलची माहिती दिली.
Stones pelted at Kejariwala's rally ; गुजरातमधील सुरतमध्ये आम आदमी पार्टीचे (आप) अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्या रोड शोमध्ये हल्ला झाल्याचे वृत्त आहे. केजरीवाल यांच्या प्रचाराची रॅली शहरातील एक गल्ली पार करत असताना त्यांच्यावर अचानक दगडफेक झाली. या हल्यासाठी केजरीवाल यांनी भाजपला जबाबदार ठरवले आहे. परंतु निवडणुकीच्या तोंडावर केजरीवाल यांच्यावर हल्ले करून भाजप स्वतःची छबी खराब करण्यासारखा मूर्खपणा निश्चितच करणार नाही, असा दावा पक्षातील समर्थकांकडून करण्यात येत आहे.
himanta biswa sarma rahul gandhi ; भाजपचे फायरब्रँड नेता आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी खा. राहुल गांधी यांच्या नव्या लुकवर नाराजी व्यक्त केली आहे. सध्या राहुल गांधी इराकी हुकुमशहा सद्दाम हुसेन यांच्या सारखे दिसत आहेत, अशी घणाघाती टीका सरमा यांनी गुजरात विधानसभा प्रचारसभेत केली. राहुल यांनी आपला लुक माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, पोलादी पुरुष वल्लभभाई पटेल किंवा महात्मा गांधी यांच्यासारखा का नाही ठेवला? असा प्रश्न सरमा यांनी उपस्थित केला आहे.
Narendra Modi ; पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरात दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते रविवारी (20 नोव्हेंबर 2022) 4 निवडणूक रॅलींना संबोधित करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी सोमनाथ मंदिराला भेट दिली. तेथे त्यांनी भगवान शंकराची पूजा करून पंचामृत अभिषेक केला. त्यानंतर त्यांनी सोमनाथ जिल्ह्यातील वेरावळ शहरात भाजपच्या सभेला संबोधित केले.
गुजरात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा भाजपच सत्तेत येणार असा अंदाज भारतातील प्रसिद्ध वृत्तवाहिनी ABP सर्व्हेमध्ये व्यक्त केला गेला आहे. या निवडणुकीत १८२ जागांपैकी तब्बल १३१ ते १३९ जागांवर भाजप विजय मिळवेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे यंदाही भाजपच सत्ता मिळवणार असेच चित्र आहे. गेली दोन दशके गुजरातमध्ये भाजप सलग सत्ता मिळवत आला आहे. राष्ट्रीय पातळीवर दुबळ्या असलेल्या काँग्रेसचा तसेच आपल्या नेहमीच्या रेवडी तंत्राने निवडणूक लढणाऱ्या अरविंद केजरीवाल यांचा आम आदम
गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने नुकतेच हिमाचल प्रदेशातील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. तर गुजरातचा निवडणूक कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष आता निवडणूक आयोग गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर करणार याकडे आहे.
सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्लीचा कारभार वाऱ्यावर सोडून गुजरात दौर्यावर आहेत. दौरा करायला कुणाची ना नाही. परंतु, तिथे जाऊन शांत बसतील ते केजरीवाल कसले. केजरीवाल म्हटलं की, गडबड, गोंधळ होणारच. नुकतेच ते आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या प्रचारासाठी अहमदाबादमध्ये आले होते. त्यावेळी स्थानिकांशी झालेल्या भेटीदरम्यान, त्यांनी अगदी पंजाब विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणेच घरी जेवायला येण्यासाठी एका रिक्षा चालकाने दिलेले आमंत्रण स्वीकारले.