राम मंदिर प्राण प्रतिष्ठापनेवर बीबीसीने केलेल्या नकारात्मक कव्हरेजचा निषेध करण्यात येत आहे. बीबीसी ही युनायटेड किंगडमची सरकारी मीडिया संस्था असून आता त्यांच्याच देशात बीबीसीचा विरोध करण्यात येत आहे. २२ जानेवारी रोजी झालेल्या रामलला प्राणप्रतिष्ठापणेच्या सोहळ्याचे बीबीसीने केलेले कव्हरेज हे पक्षपाती, भेदभावपूर्ण आणि प्रक्षोभक असल्याचे ब्रिटनच्या एका खासदाराने म्हटले आहे.
Read More
श्रीरामलला प्राणप्रतिष्ठेचे एबीसी, बीबीसी, सीएनएन आणि अल जझीरासह अन्य प्रसारमाध्यमांनी एकांगी वार्तांकन केले आहे. त्यामुळे त्यांनी हिंदूंची माफी मागावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद, अमेरिकेने केली आहे.
नवी दिल्ली : बीबीसी या ब्रिटीशमाध्यसुहाच्या 'इंडिया: द मोदी क्वेश्चन' या कथित माहितीपटाविरोधात गुजरातस्थित जस्टिस ऑन ट्रायल या एनजीओने दिल्ली उच्च न्यायालयात १० हजार कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला असून न्यायालयाने बीबीसीला समन्स बजावले आहे.
ब्रिटनचे राजे चार्ल्स तृतीय यांचा आलिशान राज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या भव्यदिव्य सोहळ्याचा अंदाजे १०० दशलक्ष पाऊंडांचा खर्च आर्थिकदृष्ट्या गटांगळ्या खाणार्या ब्रिटनला करावा लागला. याविरोधात आणि ‘राजेशाही नकोच’ म्हणून ‘नॉट माय किंग’ अभियानही ब्रिटनमध्ये चर्चेचा विषय ठरले. त्यानिमित्ताने ब्रिटनचा माठ रिकामा असताना केलेला राजा चार्ल्सच्या राज्याभिषेकाचा थाट, राजेशाहीचा इतिहास आणि ब्रिटनचे राजकारण यांचा आढावा घेणारा या लेखाचा पहिला भाग.
ब्रिटीश ब्रॉडकास्टींग कंपनी (बीबीसी) विरोधात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) बुधवारी खटला दाखल केला आहे. फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अॅक्ट (फेमा) या कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी ही तक्रार दाखल झाली आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात ईडीने बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांमध्ये सर्वेक्षण केले होते.
बीबीसीच्या दिल्ली मुख्यालय आणि मुंबई कार्यालयावरील बुधवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी आयकरचे सर्वेक्षण सुरूच होते. या सर्वेक्षणावेळी सर्व कर्मचाऱ्यांचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले. या संदर्भात बीबीसीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवून आयकर अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यास सांगितले आहे. सर्वेक्षणातून कमावलेला नफा परदेशी मीडिया हाऊसने परदेशात पाठवल्याचा आणि ट्रान्सफर प्राइसिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आयकर विभागाने केला आहे. यापूर्वी अधिकाऱ्यांनी बीबीसीला याबाबत अनेक नोटिसा पाठवल्या होत्या, कुणीही प्रतिस
'बीबीसी'च्या दिल्ली आणि मुंबई कार्यालयात मंगळवार, दि. १४ जानेवारी रोजी आयकर विभागाचे पथक पोहोचले. दिल्लीतील केजी मार्ग भागात एचटी टॉवरच्या पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर बीबीसी कार्यालय आहे. या कार्यालयात तब्बल २४ आयकरच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चौकशी केली. कारवाईत सर्वच कर्मचाऱ्यांचे फोन बंद करण्यात आले आहेत. सर्वांनाच एका खोलीत बसण्यास सांगितले आहे.
भारताची सर्वांगीण प्रगती, गतिमान विकास, मोदींची जागतिक नेते म्हणून निर्माण झालेली प्रतिमा ही देशात तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारतद्वेष्टयांना कदापि मंजूर नाही. म्हणूनच मग ‘बीबीसी‘चा माहितीपट आणि आता अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणावरुन मोदी सरकारवर चिखलफेक आणि जनतेच्या मनात धुळफेकीचे षड्यंत्र आखले जात आहे. भारताला कमकूवत करण्याचे हे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र प्रत्येक भारतीयाने समजून घेऊन अपप्रचाराला बळी न पडता, सरकारच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे.
अनिल अँटनी यांनी बुधवारी 25 जानेवारी 2023 रोजी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री एके अँटनी यांचे ते पुत्र आहेत. त्यांनी बीबीसीच्या प्रोपगंडा डॉक्युमेंटरीला विरोध केला. यामुळे देशाचे सार्वभौमत्व कमकुवत होईल, असे म्हटले होते. राजीनामा देताना त्यांनी हे ट्विट डिलीट करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचे सांगितले आहे.
बीबीसीच्या भारतविरोधी माहितीपटास विरोध करणारे केरळ काँग्रेसचे नेते आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री ए. के. अँटोनी यांचे पुत्र अनिल अँटोनी यांनी काँग्रेस पक्षास सोडचिठ्ठी दिली आहे. बीबीसी माहितीपटास विरोध करणारे ट्विट डिलीट करावे, या काँग्रेस नेतृत्वाच्या आदेशामुळे त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
दुसर्या महायुद्धापूर्वी, शीतयुद्धाच्या काळात आणि इंटरनेट क्रांतीच्या काळात ‘बीबीसी’सारख्या माध्यमांच्या बदललेल्या रुपाचा अभ्यास करायला हवा. पाश्चिमात्त्य देशांतील दंगे, दहशतवादी घटनांविरोधातील कारवाया, तेथील लोकशाही संस्थांचे अपयश याचा आढावा घेऊन त्यांच्याबद्दल जागतिक पटलावर व्यक्त होणेही आवश्यक आहे.
विरोधकांनी अनेकवेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल गुजरात दंगलीवरून तब्बल २० वर्ष विरोधकांनी बदनामी केली. सुप्रीम कोर्टाने त्यांना क्लीन चीट दिली. अशा अनेक घटनांमध्ये विरोध तोंडावर आपटले याबद्दल भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणी मध्ये याबाबत चर्चा करण्यात आली. आता बीबीसीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी चालवण्यात आली आहे. बीबीसी म्हणजे 'बोगस बायस कँपेन' आहे अशी टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह हिंदूविरोधी मजकूर प्रसारित करणाऱ्या बीबीसी या ब्रिटनच्या राष्ट्रीय वाहिनीस यावेळी मोदीविरोध चांगलाच महागात पडला आहे. युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी या माहितीपटाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे बीबीसीचा गुजरात दंगलविषयक माहितीपट म्हणजे वसाहतवादी मानसिकता असल्याचा सणसणीत टोला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने लगाविला आहे.
डझनभर ब्रिटिश हिंदू संघटनांनी ‘बीबीसी’च्या हिंदूविरोधी धोरण आणि ‘हिंदूफोबिक’ अजेंड्याविरोधात ब्रिटनच्या लंडनमधील ‘पोर्टलॅण्ड’ येथील ‘बीबीसी हाऊस’समोर जोरदार निदर्शने केल्याचे वृत्त आहे. या निदर्शनात सहभागी होण्यासाठी ब्रिटनमधील हिंदूंनी ट्विटरवर अभियानदेखील सुरू केले होते.
डॉ. मिलींद संपगावकर म्हणजे एक अफलातून व्यक्तीमत्त्व. यशस्वी उद्योजक आणि तितकेच समाजशील समाजहितचिंतक. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा घेतलेला मागोवा...
‘टीम मार्शल’ म्हणतोय, आजचं जग ‘युरो-अटलांटिक’ नव्हे, तर ‘इंडो-पॅसिफिक’ बनलंय. कारण, नवा जागतिक संघर्ष प्रदेश आता आशिया खंड आणि त्याच्या भोवतीचा हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागर असणार आहे. या संघर्षातले मुख्य भिडू आहेत अमेरिका, चीन आणि उत्तर कोरिया. बाकीचे भिडू आहेत रशिया, जपान, तैवान, ऑस्ट्रेलिया, भारत आणि आखाती देश. म्हणजेच ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन, पोर्तुगाल, हॉलंड हे युरोपिय प्रगत देश यात नाहीत. प्रगत आणि अण्वस्त्रसज्ज असूनही नाहीत. का नाहीत?
आयुषमान भारत - पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत कर्करोगावरील उपचारासंदर्भात संपूर्ण देशात गुहावटीतील डॉ. बी. बोरूह कर्करोग संस्था (बीबीसीआय) या संस्थेचा तिसरा क्रमांक आला आहे. आसाममध्ये आरोग्य मंथन २.० या संकल्पना लागू केल्यानंतरं दोन वर्षे झाली आहेत. बीबीसीआय ही योजना राबवणारी अग्रगण्य संस्था मानली जाते.
'प्रसार भारती'मधील पत्रकारांची भूमिका
दिल्ली हिंसाचाराचे एकांगी वार्तांकन केल्याचा आरोप
'अल-जझिरा' आणि 'बीबीसी'सारख्या आंतरराष्ट्रीय माध्यमांनी मात्र काश्मीरच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता, आगीत तेल ओतण्याचे काम केले. कारण, काश्मीर खोऱ्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असताना या माध्यमांनी मात्र 'फेक न्यूज' प्रसारित करून परिस्थिती चिघळायलाच हातभार लावला.
भारतीयांना आपली संस्कृती, इतिहास, भाषा या सगळ्याचा जेवढा अभिमान आहे, तेवढाच अभिमान भारतीय सिनेमाचाही... दादासाहेब फाळकेंनी सुरू केलेली ही ‘सिनेमा’ नामक प्रथा आजही तेवढ्याच जोमात सुरू आहे. पण, मागे वळून पाहिल्यास आपल्या सहज ध्यानात येते की, सिनेमाची परिभाषा बदलली आहे.