Australia मध्ये नुकतेच ‘सेंटर फॉर लँग्वेज एक्सचेंज अॅण्ड को-ऑपरेशन’ केंद्राच्या अनेक शाखांना टाळे ठोकण्यात आले आहे. या केंद्रांच्या शाखा जगभरातल्या 160 देशांमध्ये आहेत आणि यामध्ये दहा दशलक्ष विद्यार्थी चिनी भाषा आणि संस्कृती शिकत आहेत. अशा या केंद्रांना बंद करण्याचे पाऊल ऑस्ट्रेलियाने का उचलले? ‘सेंटर फॉर लँग्वेज एक्सचेंज अॅण्ड को-ऑपरेशन’ केंद्र नक्की काय आहे?
Read More
Steve Smith Retired टीम इंडिया विरूद्ध ऑस्ट्रिलेया दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी सेमीफायनल दुबईमध्ये दि : ४ मार्च २०२५ रोजी पार पडली. या सेमी फयनलमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवत वनडे विश्वचषकाचा बदला घेतला आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाचा पराभव हा चांगलाच जिव्हारी लागला आहे. मात्र, या सामन्यानंतर आता ऑस्ट्रेलियाचा अनुभवी खेळाडू आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथने वनडे क्रिकेटला अखेरचा राम राम केला आहे.
भारताच्या कृषी निर्यातीसाठी एका महत्त्वपूर्ण टप्प्याअंतर्गत कृषी व प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण अर्थात(अपेडा) अॅग्रोस्टार व के. बी. एक्सपोर्ट्सच्या सहकार्याने प्रीमियम सांगोला तसेच भगवा या डाळिंबाची भारतातील पहिली व्यावसायिक चाचणी शिपमेंट समुद्रमार्गे ऑस्ट्रेलियाला यशस्वीरित्या पाठवण्यात आली. भारतातील ताज्या उत्पादनांसाठी बाजारपेठ उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने हे एक मोठे यश आहे.
प्रयागराज येथे महाकुंभात सहभागी होण्यासाठी देश-विदेशातून मोठ्यासंख्येने भाविक आले आहेत. महाकुंभाच्या पहिल्या दिवशी सकाळी ११ वाजेपर्यंत साधारण ८० लाख हून अधिक भाविकांनी स्नान केले. विदेशी पर्यटकही याठिकाणी सहभागी झाले होते. महाकुंभाच्या दृष्टिकोनातून मकर संक्रांती हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असून विविध आखाड्यातील साधूसंत या दिवशी पहिले अमृतस्नान करतील. तरी काही विदेशी पर्यटकांमध्ये पहिल्या दिवसापासूनच उत्साह निर्माण झाल्याचे दिसते आहे. mahakumbh mela devotees from Other Countries
प्रयागराज येथे होणारा महाकुंभ हा अध्यात्म आणि नवनिर्मितीचा अनोखा संगम असणार आहे. कारण सनातन धर्माच्या पवित्र परंपरांसह अत्याधुनिक डिजिटल प्रगती महाकुंभात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे देश-विदेशातील प्रसारमाध्यमेही महाकुंभाच्या कव्हरेजसाठी उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे. महाकुंभाच्या कव्हरेजसाठी आतापर्यंत ८२ देशांतील माध्यमांनी अर्ज केले आहेत. Mahakumbh International coverage
समोर आलेल्या परिस्थितीचे रुपांतर संधीमध्ये करत, कष्ट, जिद्द आणि सचोटी यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियामध्ये सर्जंट ( Surgent in Australia ) पदावर कार्यरत असलेल्या अशोक घुगे यांच्याविषयी....
Virat Kohli and Sam Constas आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने भारताचा रन मशिन विराट कोहलीवर एका सामन्यात गैरवर्तन केल्याप्रकरणी एकूण मानधनांपैकी २० टक्के कपातीची दंडात्मक कारवाई ठोठावण्यात आली. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशीच घडलेल्या घटनेप्रसंगी आयसीसीने कारवाईचे आदेश दिले. ही घटना गुरूवारी २६ डिसेंबर २०२४ रोजी घडली.
ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स विद्यापीठाने नुकत्याच केलेल्या अभ्यासात, भारतातील समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर देशाच्या जीडीपीमध्ये १६,००० कोटी रुपयांनी वाढ करण्याचा अंदाज आहे. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कार्यान्वित झाल्यामुळे मालवाहतूक खर्च आणि प्रवासाच्या वेळेत लक्षणीय घट झाली आहे, ज्यामुळे वस्तूंच्या किंमती ०.५ टक्क्यांपर्यंत कमी झाल्या आहेत, असे या अहवालात म्हणण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या कॅनबेरा शहरात असलेल्या दोन हिंदू मंदिरांवर हल्ला झाल्याची घटना निदर्शनास आली आहे. शनिवारी दुपारी मुखवटा घातलेल्या काही हल्लेखोरांनी मंदिरे फोडून चोरी केल्याची माहिती आहे. द ऑस्ट्रेलिया टुडेच्या वृत्तानुसार, एकूण ४ जणांनी मिळून मंदिरातील ४ दानपेट्या चोरल्या ज्यात साधारण हजारो डॉलर्स असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. Hindu temple attacked in Australia
बांगलादेशात हिंदूंविरुद्ध सुरु असलेला नरसंहार पाहता येथील परिस्थिती अत्यंत गंभीर असून तत्काळ आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाची मागणी जगभरातून होत आहे. बांगलादेशात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात नव्याने स्थापन झालेल्या अंतरिम सरकारकडे हिंदूंच्या रक्षणाची मागणी सर्वत्र होत आहे. बांगलादेशी हिंदूंकरीता आणि इस्लामिक कट्टरतावाद्यांविरोधात विश्वसमुदायाने संघटित होण्याचे आवाहन विविध हिंदुत्ववादी संघटनांनी केले होते. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही बांगलादेशातील हिंदू अत्याचाराविरोधात हिंदू समाज रस्त्यावर उतरला असून तीव्र
कोकणचा राजा अर्थात हापूस आंब्याची नाशिक व्हाया अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात निर्यात झाली आहे. चालू हंगामात आतापर्यंत एक हजार टन आंबा निर्यात करण्यात आला आहे.नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील भाभा अणु संशोधन केंद्राच्या कृषक विकिरण केंद्रातून आंब्यावर विकिरण प्रक्रिया होऊन दि.1 एप्रिलपासून आंबा निर्यातीला सुरुवात झाली. पहिल्याच महिन्यात 7 हजार, 500 बॉक्समधून 28 टन आंबा अमेरिकेला निर्यात झाला.
भारताने घेतलेल्या अलीकडच्या पुढाकारांचा छोट्या द्वीपराष्ट्रांच्या विकसनशील प्रादेशिक भूराजनीतीवर महत्त्वपूर्ण परिणाम होत आहे. भारताचे कौशल्य आणि अनुभव ‘ग्लोबल साऊथ’मधील इतर देशांना नक्कीच लाभदायी ठरणार आहेत.
ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रीय संकटगेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियातील एका शॉपिंग सेंटरमध्ये जोएल कोची याने चाकूहल्ला करत सहा महिलांचा खून केला. यावर त्याच्या वडिलांचे म्हणणे होते की, त्याने हे भयानक कृत्य केले. पण, तो दु:खी होता. त्याला एकही ‘गर्लफ्रेंड’ नव्हती, म्हणून त्याने महिलांवरच हल्ला केला असावा. त्याच ऑस्टे्रलियामध्ये आता महिलांवर होणारे हिंसाचार ‘राष्ट्रीय आपत्ती’ म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
अयोध्येत रामनवमी (Ram Navami) मोठ्या उत्साहात पार पडली. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात राम जन्मोत्सव साजरा केला जात होता. अमेरिकेच्या 'ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ राम मंदिर’ (ओएफआरएम) संस्थेने अयोध्येतून अमेरिकेत आणलेले १०१ किलोहून अधिक ‘रघुपती लाडू’(Raghupati Ladoo) रामनवमीनिमित्त ‘प्रसाद’ म्हणून जगभरातील भाविकांमध्ये वितरित केले गेले. ओएफआरएमचे संस्थापक प्रेम भंडारी यांनी एएनआय वृत्तसंस्थेला यासंदर्भात सविस्तर माहिती दिली.
ऑस्ट्रेलियातील सिडनीत सोमवार दि. १५ एप्रिल २०२४ रोजी एका चर्चमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एकूण चार जणांचा मृत्यू झाला. ज्यात एका पादरीचाही सामावेश आहे. हा पादरी लोकप्रिय असून जगभरात त्याचे अनुयायी आहेत. घटनेनंतर स्थानिक आणि पोलीस भिडले. Allah hu Akbar म्हणत त्यांनी हा हल्ला केला. सिडनीतील डाऊनटाऊनपासून ३० किमी पश्चिमेकडे सबअर्ब वेकलेमध्ये हा हल्ला झाला. यात एका अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला एका चर्चमध्ये लपवण्यात आले. स्थानिकांचा रोष इतका वाढला की त्याला बाहेर काढण्याची मागणी केली जाऊ लाग
ऑस्ट्रेलियाने रविवारी भारताविरुद्ध विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकून वर्ल्डकप ट्रॉफी पटकावली. मात्र, ऑस्ट्रेलियन खेळाडूंना या ट्रॉफीची काहीच किंमत नसल्याचे सिद्ध झाले आहे. ऑस्ट्रेलियन कांगारू वर्ल्ड कप ट्रॉफीवर पाय ठेवतानाचे फोटो व्हायरल झाले आहे. त्यामुळे नेटकऱ्यांकडून कागांरुंवर संताप व्यक्त करण्यात येत आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात क्रिकेट विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना पार पडणार आहे. १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. दरम्यान, भारताला विश्वचषक मिळावे यासाठी देशभरातील जनता प्रार्थना करत आहे. यासाठी पुजा, हवन, उपवास करण्यात येत आहे.
दुर्लक्षित असणार्या आणि अनेकांना माहीतही नसणार्या पापुआ न्यू गिनी या ऑस्ट्रेलिया जवळील बेट देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच भेट दिली. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन आणि त्यांच्याबरोबर असणार्या शिष्टमंडळाने ही नुकतीच पापुआ न्यू गिनीला भेट दिली. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली भेट लक्षवेधी ठरली.
नवी दिल्ली : आव्हानांनाच आव्हान देणे हा माझा स्वभाव आहे. संपूर्ण जग आज भारताकडे आशेने पाहत आहे. त्यामुळे त्यांचा आशा पूर्ण करण्याचे आव्हान भारताने स्विकारले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले. जपान, पापुआ न्यूगिनी आणि ऑस्ट्रेलिया दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरुवारी मायदेशी आगमन झाले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी भाजपतर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियातील हिंदू मंदिरांवर होणारे हल्ले कोणत्याही परिस्थितीत स्विकारार्ह नाहीत. त्याद्वारे भारत – ऑस्ट्रेलियाच्या संबंधांमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या फुटीरतावाद्यांविरोधात कारवाई करण्यात येण्याचे आश्वासन ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी दिला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी २० हजार अनिवासी भारतीयांसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘मोदी इज द बॉस’ असे जाहीरपणे संबोधले आणि त्याला टाळ्यांचा कडकडाट करून दाद देण्यात आली. दक्षिण आशियाई राष्ट्रांचा समतोल राखण्याचे काम केवळ भारतच करू शकतो, हे ऑस्ट्रेलिया दौर्यात अधोरेखित झाले.
नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया हे परस्परांचे बळकट भागिदार आहेत. दोन्ही देशांचे संबंध हे सन्मान आणि विश्वासावर आधारित आहेत. त्याचप्रमाणे भारत संपूर्ण जगाला आपले कुटूंब मानतो आणि संकटाच्या वेळी धावून जातो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सिडनी येथे केले.
चतुर्भुज सुरक्षा संवाद’ म्हणजेच ’क्वाड’ हा ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि युनायटेड स्टेट्स या चार राष्ट्रांतील धोरणात्मक सुरक्षा संवाद आहे, जो सदस्य देशांतील चर्चेद्वारे राखला जातो. या क्वाडची स्थापना २००७ मध्ये करण्यात आली. व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी करीन जीन-पियरे यांनी आपल्या एका दैनंदिन पत्रकार परिषदेत क्वाडमध्ये नवीन सदस्य जोडण्याची कोणतीही योजना झाली नसल्याचे सांगितले.
एकविसाव्या शतकात बरेचदा प्रत्यक्ष युद्धापेक्षा अप्रत्यक्ष युद्धावरच भर अधिक दिसतो. एकापेक्षा एक सरस अण्वस्त्रे जरी भात्यात असली तरी, एकतर अर्थव्यवस्थेद्वारे स्थानिक बाजारपेठ संपवली जाते अन् दुसरे म्हणजे समोरील देशातील तरुण पिढीला नशेद्वारे बरबाद तरी केले जाते. जगाच्या पाठीवर चालणारी नशेच्या पदार्थांची तस्करी आणि महासत्तेकडे वाटचाल करणार्या भारतावर याचा होणारादूरगामी परिणाम याची त्यानिमित्ताने चिकित्सा होणे महत्त्वाचे आहे.
अमेरिकेतील टेक्सासमध्ये नुकताच एका डेअरी फार्ममध्ये भीषण स्फोट होऊन लागलेल्या आगीत तब्बल १८ हजार गायींचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मानवी जीवनात अमूल्य असे योगदान देणार्या जनावरांचा अशाप्रकारे होणारा मृत्यू हा नक्कीच क्लेषदायक आहे. तसेच वैश्विकीकरणाच्या युगात जग एकमेकांच्या जवळ आले असताना, गाईंच्या अशा मृत्यूने जगही हादरले आहे.
क्रिकेट विश्वात बॉल टेम्परिंग प्रकरणी वाद काही नवा नाही. १९७७ मध्ये इंग्लंडचा संघ भारताविरुद्ध चेन्नईतील तिसर्या कसोटीत गोलदांज जॉन लिव्हरने चेंडूला व्हॅसोलिन लावून स्विंग गोलदांजी करुन भारताची दाणादाण उडविली होती. त्याचा सहकारी बॉब विलिसने चेंडू अधिक स्वींग व्हावा यासाठी हा प्रयत्न केल्याचा आरोप होता. पण या प्रकरणी कोणावरही कारवाई झाली नाही.
खलिस्तानवाद्यांचा भारतविरोध ही काही आजची गोष्ट नाही. पाकिस्तान सातत्याने खलिस्तानी चळवळीला प्रोत्साहन देऊन ती आणखी भडकवण्याचा प्रयत्न करत आला आहे. ही चळवळ कॅनडामध्ये मोठ्या प्रमाणावर फोफावली असून भारतविरोधी अनेक गोष्टी या खलिस्तानवाद्यांकडून केल्या जातात. मात्र, आता हे लोण कॅनडानंतर ऑस्ट्रेलियातदेखील पोहोचले आहे. खलिस्तानी समर्थकांनी ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये एका हिंदू मंदिराला लक्ष्य करत मंदिराची तोडफोड केल्याने हिंदू समाजाकडून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहे.
जागतिक स्तरावर विचार करता इ. स. २०२२ या वर्षाचा समारोप फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा आनंद घेत आपण साजरा केला, तर आता २०२३ या वर्षाचा जागतिक क्रीडारंभ भारतीय राष्ट्रीय खेळाच्या विश्वचषक स्पर्धेने जानेवारी १३ ते २९ दरम्यान भारतात होत आहे. त्यानिमित्ताने आपल्या राष्ट्रीय खेळाच्या संघाला शुभेच्छा देत त्याबद्दलचे हे विचार...
लोखंडापासून निघणार्या टाकाऊ मळीपासुन टिकाऊ रस्ते बांधणीचे तंत्रज्ञान विकसित करून ऑस्ट्रेलियात खड्डेमुक्त रस्ते उभारणारे डॉ. विजय जोशी या मूळ ठाणेकर अभियंत्याविषयी...
'कांतारा'ने जगभर आपला ठसा उमटवला असून, हा चित्रपट आता भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील आपले वर्चस्व गाजवताना दिसत आहे. अशातच, 'कांतारा'आता ऑस्ट्रेलियात आपले तुलू व्हर्जन प्रीमियर करण्यासाठी सज्ज झाला असून हा चित्रपट भारतीय संस्कृती एका नवीन ठिकाणी प्रदर्शित करेल. आधुनिक काळात चित्रपटाच्या यशाची पातळी खऱ्या अर्थाने पुन्हा परिभाषित केली आहे.
T20 World Cup Final 2022 ; इंग्लंडने १९९२ च्या विश्वचषकात पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचा चांगलाच वचपा काढला आहे. १९९२च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर इंग्लंडचा पराभव केला. आता ३० वर्षांनंतर इंग्लंडने मेलबर्नमध्येच पाकिस्तानचा पराभव करून हिशेब चुकता केला आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकांत ८ गडी गमावून १३७ धावा केल्या. पाकिस्तानची फलंदाजी फ्लॉप ठरली. सहा फलंदाजांना दुहेरी आकडाही स्पर्श करता आला नाही.
T20WC2022 ;ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर भारत विरुद्ध झिम्बाब्वे सामन्यात टीम इंडियाने विजय संपादन करून उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. नाणेफेक जिंकून भारतीय संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेत, विजयासाठी झिम्बाब्वे समोर १८६ धावांचा डोंगर रचला आहे.सूर्यकुमार यादवची झंझावती खेळी आणि लोकेश राहुलच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने तगडे लक्ष्य उभे केले. त्यानंतर गोलंदाजांनी त्यांची जबाबदारी चोख पार पाडली. भारताने या विजयासह ग्रुप २ मध्ये ८ गुणांसह अव्वल स्थान कायम राखले. उपांत्य फेरीत त्यांच्
(भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला): ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला झाल्याची बातमी पुन्हा एकदा समोर येत आहे. स्थानिक वृत्तानुसार, पैशांची मागणी करणाऱ्या एका व्यक्तीने २८ वर्षीय भारतीय विद्यार्थी शुभम गर्ग याच्या चेहऱ्यावर, छातीवर आणि पोटावर चाकूने अनेक वार केले आणि त्याला गंभीर दुखापत केली. आयआयटी चेन्नईमधून शिक्षण घेतल्यानंतर शुभम गर्ग इंजिनीअरिंगमध्ये पीएचडी शिकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेला आहे.
खरे म्हणजे, रशियावर प्रश्न विचारुन भारताला कोंडीत पकडावे, असे पाश्चात्यांना वाटत असते. त्या वाटण्यातूनच असे प्रश्न उपस्थित होत असतात, पण भारत त्यात अडकत नाही. उलट पाश्चात्यांनाच तोंडावर पाडत असतो, जसे आता झाले.
ऑस्ट्रेलिया-भारत-इंडोनेशिया या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक संयुक्त राष्ट्र महासभेच्या 77व्या सत्रादरम्यान पार पडली. अशी बैठक व्हावी, यासाठी बर्याच काळापासून प्रयत्न सुरू होते. अखेर त्यात न्यूयॉर्कमध्ये यश आले आहे. यापूर्वी सप्टेंबर 2020 मध्ये तिन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आभासी बैठक होणार होती, त्यानंतर तिन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांची बैठकही होणार होती. न्यूयॉर्कमध्ये, परराष्ट्र मंत्र्यांनी ‘इंडियन ओशन रिम असोसिएशन’ (आयओआरए), हिंद-प्रशांत महासागर, ‘जी 20’ आणि ‘ब्लू इकॉनॉमी’च्या संदर्
जगभरात कोरोना महामारीच्या काळात ऑनलाईन बाललैंगिक शोषण आणि शोषणाच्या (ओसीएसएई) प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. युरोपियन युनियन, अमेरिका आदी देशांनी 2020 आणि 2021 सालामध्ये बाललैंगिक शोषण सामग्री (सीएसएएम) आणि ऑनलाईन कृत्यांमध्ये नाट्यमय पद्धतीने वाढ झाल्याचे सिद्ध झाले आहे
बर्मिंगहॅममध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्यांदा महिला टी-२० क्रिकेट सामना ठेवण्यात आला आहे. या क्रिकेट सामन्यात देखील भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
शिंजो आबे यांच्या पुढाकाराने भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्या गटाला ‘क्वाड’ असे नाव दिले गेले असल्यामुळे अनेक तज्ज्ञांनी पश्चिम आशियात उभ्या राहाणार्या चार देशांच्या या गटाला ‘पश्चिमी क्वाड’ म्हटले जाईल, असा अंदाज व्यक्त केला होता. पण, हा गट चीनला केंद्रस्थानी ठेवून तयार झालेला नाही. आखातातील बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संधी हे त्यामागचे प्रमुख कारण आहे.
चीनने संपूर्ण नियोजनातून सोलोमन बेटांवर लष्करी तळ उभारला आहे. आफ्रिकेतील जिबुतीमध्ये चीनचा अधिकृत लष्करी तळ आहे. हे 2017 मध्ये नौदल सुविधा म्हणून बांधले गेले होते. चीन, आशिया आणि अमेरिकेतील लष्करी वर्चस्वाला आव्हान देत आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे नुकतेच गुरुद्वारावरील दहशतवादी हल्ल्यांमध्ये एका शीख बांधवाचा मृत्यू झाला. त्यामुळे तेथील हिंदू आणि शिखांची सुरक्षा पुन्हा एकदा अत्यंत धोक्यात आली आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षणमंत्री रिचर्ड मार्लेस यांच्यात दोन्ही मंत्र्यांनी सध्या अस्तित्वात असलेल्या संरक्षण सहकार्याचा आढावा घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जपानमधील टोकियो येथे दुसर्या ’क्वाड’ सदस्य राष्ट्रनेत्यांच्या शिखर परिषदेत जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासह भाग घेतला.
जपानमधील शिखर परिषदेत अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाने कोरोना महामारीच्या काळात केलेल्या लसीकरण कार्याचे कौतुक केले आहे.
उद्या, दि. २४ मे रोजी टोकियोमध्ये होणारी ‘क्वाड’ बैठक महत्त्वाची ठरणार आहे. जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या तीनही राष्ट्रांनी रशिया विरोधात उघड भूमिका घेतली आहे, याउलट भारताची भूमिका वेगळी आहे. परंतु, याही भेटीत भारत आपली भूमिका पुन्हा एकदा मांडेल. युरोपात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आशियाई राष्ट्रांवरदेखील होत आहे. चीन-तैवानच्या संघर्षाचा मुद्दा पुन्हा नव्याने जागतिक व्यासपीठांवर चर्चेस येत आहे.
‘इंटरनॅशनल आर्टिस्ट मॅगझिन’, ‘बोल्ड ब्रश फाईन आर्ट इंटरनॅशनल कॉम्पिटीशन’ ‘रे-मार-आर्ट इंटरनॅशनल कॉम्पिटीशन’ या अमेरिका, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांतील आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करणार्या संयोजकांनी ज्या भारतीय विशेषत: महाराष्ट्रीय तरुण चित्रकाराच्या कलाशैलीचा सन्मान केला, त्या खोपोली जि. रायगड येथील प्रयोगशील चित्रकार प्रा. दीपक रमेश पाटील यांच्या कलेबद्दल, त्यांच्या कला योगदानाबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न या लेखात आपण करीत आहोत.
माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आणि सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक अँड्र्यू सायमंड्स यांचे शनिवारी (१४ मे) रोजी कार अपघातात निधन झाले.
काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियात झालेल्या मतदानपूर्व सर्वेक्षणातही पंतप्रधान मॉरिसन यांची लोकप्रियता घसरल्याचे स्पष्ट झाले होते. मतदानपूर्व चाचणीमध्ये मजूर पक्षाचे अँथोनी अल्बानीज हे सध्याचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यापुढे होते. पण, अंतिम दिवशी स्कॉट मॉरिसन हे या निवडणुकीमध्ये बाजी मारतात का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
ऑस्ट्रेलियातील क्रेगीबर्न गुरुद्वारात खलिस्तान समर्थनाचे पोस्टर लागले असल्याची घटना समोर आली आहे. खलिस्तानी दहशतवादी भिंद्रनवाले याचेही पोस्टर्स या गुरुद्वारात लावले गेले होते
चीनकडून जर सॉलोमन बेटांवर नाविक तळ उभारण्यात आला, तर फक्त ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांना चीनची लष्करी भीतीच नाही, तर या सामुद्रधुनीतून मालाची ये-जा करणार्या मालवाहू जहाजांवरही चीनची बारीक नजर आणि नियंत्रण असेल, याची काळजी वाटत असणे स्वाभाविक आहे. ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ मंत्र्यांनी या देशाला भेट देऊन चीनबरोबर करण्यात आलेला हा करार नाकारण्याचे आवाहन केले होते
आर्थिक बाजू सक्षम करण्यात व्यापार व उदीम क्षेत्राचा सहभाग कायमच मोठा ठरलेला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकताच एप्रिल महिन्यात आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार करण्यात आला. या करारानुसार आता या दोन्ही देशांदरम्यान वस्तू आणि सेवांमध्ये मुक्त व्यापाराचे धोरण अंगीकारण्यात आले आहे
भारत आता चीनच्या डोळ्याला डोळा भिडवून प्रत्येक क्षेत्रात पावले उचलत असतानाच त्या देशाला धोबीपछाड देण्याच्याही तयारीत आहे. नुकताच भारताने ऑस्ट्रेलियाबरोबर केलेला मुक्त व्यापार करार त्याचाच दाखला म्हटला पाहिजे