Anti-constitution Congress गरज पडली, तर भविष्यात मुस्लिमांना आरक्षण देण्यासाठी संविधानात बदल करू,” असे वादग्रस्त वक्तव्य कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी नुकतेच केले. त्यांच्या या विधानाचा अनुसूचित जाती-जमातींसाठी कार्यरत सामाजिक संस्था, राजकीय पुढारी यांनी साधा निषेधही नोंदवला नाही, हे दुःखदच. काँग्रेस पक्षाची सद्यस्थिती पाहता, तो किमान पुढील 20 ते 25 वर्षे तरी सत्तेत नसेल. खंबीर नेतृत्व नसल्यामुळे वर्तमानात सत्ता असलेल्या अनेक राज्यांतूनही काँग्रेस हद्दपार झालेली असेल. पण, अशा परिस्थितीतही क
Read More
Altakia मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. या देशाच्या संविधानाने मला तो हक्क दिला आहे. मला तुरुंगात टाकले, याचाच अर्थ संविधानाचा अपमान झाला आहे. संविधानाचा हा अपमान होताना देश गप्प का?” ही वाक्ये वाचून वाटले असेल की, आपल्या देशातल्या ‘भारत तोडो गँग’मधले कुणाचे तरी वाक्य असेल ना? पण, तसे नाही. हे वाक्य आहे, अमेरिकेच्या मोहम्मद खलीलचे. अमेरिका असो की भारत, समाजविघातक, देशविघातक कृत्ये करून त्यावर पडदा टाकण्यासाठी संविधानाचे नाव घ्यायचे, हे जगभर सुरू आहे, असेच दिसते.
'भारतीय निवडणूक आयोग’ ही देशाच्या लोकशाही व्यवस्थेची एक अत्यंत विश्वासार्ह आणि संविधानिक संस्था आहे. जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीत निवडणूक आयोगाची भूमिका केवळ निवडणुका पार पाडण्यापुरती मर्यादित नसून, देशाच्या लोकशाही मूल्यांची रक्षण करणारी ती आधारशिला आहे. मात्र, कपिल सिब्बल यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी या संस्थेवर जे आरोप केले आहेत, ते अत्यंत घातक आहेत. कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगावर ‘अपयशी आणि निष्क्रिय’ अशी टिप्पणी करताना जे राजकारण केले, ते नेमके विरोधकांची मानसिकता दर्शवते.
सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना ४ टक्के आरक्षण देण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयावर विश्व हिंदू परिषदेने जोरदार टीका केली आहे. त्याचबरोबर या निर्णयाला असंविधानिक, तुष्टीकरणाची उंची आणि पूर्णपणे अस्वीकारार्ह असल्याचे म्हटले आहे. VHP on Muslim Reservation in Karnataka
संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने लेखक प्रसाद थोरवे आणि अभिराम भडकमकर यांनी ‘आर्टिस्टिक ह्यूमन्स’ या दर्शन महाजन यांच्या निर्मिती संस्थेच्यावतीने कुमार सोहोनी दिग्दर्शित ‘राष्ट्रग्रंथ नामक भारतीय संविधान’ या अत्यंत संवेदनशील व महत्त्वाच्या विषयावरील नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग मुंबईत प्रजासत्ताक दिनी पार पडला. या नाटकात संविधान निर्मितीची आवश्यकता, निर्मितीची प्रक्रिया, त्यामध्ये घडलेल्या चर्चा या सर्वांचा उहापोह केला आहे. त्यानिमित्ताने नाटकाविषयी...
अमृतसर सुवर्ण मंदिरापासून जेमतेम चार ते पाच मिनिटांवर असलेल्या ‘हेरिटेज स्ट्रीट’वर 30 फूट उंचीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची एका नराधमाने विटंबना केली. संविधानाची प्रतही जाळली. तेही नेमके प्रजासत्ताक दिनी! या घटनेचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांत प्रसारित झाला. ही घटना अत्यंत निंदनीय आणि भयंकरच.
भारतीय राज्यघटनेच्या ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक पर्वानिमित्त राज्यातील सहा हजारांहून अधिक महाविद्यालयांमध्ये संपूर्ण फेब्रुवारी महिनाभर 'संविधान गौरव महोत्सव' राबवण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवार, २७ जानेवारी रोजी दिली.
‘आम्ही भारताचे लोक’ या वाक्याने आपल्या संविधानाच्या प्रास्ताविकाची सुरुवात होते. त्यामुळे परंपरा असो वा संविधान ‘लोक’ हा घटक पूर्वापार आपल्या देशात सर्वच दृष्टींनी केंद्रस्थानी आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि सर्वाधिक सांस्कृतिक विविधतेने संपन्न असलेल्या आपल्या देशात ‘लोक’ या घटकाचा विचार करताना फक्त ‘माणसं’ या संकुचित दृष्टिकोनातून विचार करून चालत नाही. या लोकांशी जोडलेल्या विविध संस्कृती, कला, परंपरा अशा सगळ्याच गोष्टींचा समग्र विचार करावा लागतो. मग त्यात लोककला ( Folk Artist of India ) आणि लोकसंस्कृत
भारतीय संविधानाचा अंमल दि. 26 जानेवारी 1950 रोजीपासून सुरू झाला. या घटनेला आता 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. भारतीय प्रजासत्ताकाची 75 वर्षे आणि राज्यघटनेची 75 वर्षे असा याचा अर्थ होतो. लोकशाही देशांच्या संविधानांचा इतिहास पाहता, अमेरिकेचे संविधान 1789 सालापासून अमलात आले. त्याला आता 235 हून अधिक वर्षे लोटली आहेत. जगातील सर्वाधिक काळ अस्तित्वात असलेले लिखित संविधान म्हणून अमेरिकन संविधानाचा गौरव करावा लागतो. ब्रिटनचे संविधान अलिखित आहे. म्हणजे त्यांच्या संविधानाचा ग्रंथ नाही. ब्रिटिशांच्या संविधान निर्मितीचा इति
Republic Day संविधानाच्या पहिल्या पानावरील पहिले वाक्य, ‘आम्ही भारताचे लोक.’ ही भारताचे लोक असल्याची भावना भारतीयांमध्ये खर्या अर्थाने जागृत होताना आज दिसते. वरवर सामान्य वाटणार्या घटना, पण त्या घटनातून भारतीय माणूस संविधान जगतो. हक्कासोबतच संविधानाने दिलेली मार्गदर्शक तत्त्वेही कसोशीने पाळतो, हे दिसून येते. त्या अनेक घटनांपैकी काही लक्षवेधी घटनांचा मागोवा या लेखात घेतला आहे. आज, दि. 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिनानिमित्त अभिमान वाटतो की, ‘मेरा देश बदल रहा हैं।’
"राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा काही राजकीय पक्ष नव्हे, संविधान दुरुस्ती करायची असेल तर ते काम राजकीय पक्षाचे आहे. पूर्णपणे संविधान बदलून टाकता येत नाही. मग संघ कसा काय संविधान बदलणार? असा आरोप करणे म्हणजे सर्वात मोठा विनोद आहे.", असे प्रतिपादन ‘हिंदुस्तान प्रकाशन संस्थे’चे अध्यक्ष पद्मश्री रमेश पतंगे यांनी केले. छत्रपती संभाजीनगर गुरुवार, दि. १७ जानेवारी रोजी समर्पण कार्यालयात 'आम्ही संघात का आहोत...' हे रमेश पतंगे लिखित पुस्तक प्रकाशित करण्यात आले. त्यावेळी झालेल्या एका मुलाखतीमध्ये बोलत होते. Ramesh Paran
Bangladesh लोकशाहीमुळे निवडून आलेल्या बांगलादेशातील पंतप्रधान शेख हसीना यांना पायउतार व्हावे लागले. यानंतर नोबेल पुरस्कार विजेते असणारे मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशातील अंतरिम सरकार म्हणून कारभार स्वीकारला. देशाच्या कारभाराची व्यवस्था सुधारण्यासाठी आयोगाची स्थापना करण्यात आली. याप्रकरणी मोहम्मद युनूस यांनी १४ जानेवारी रोजी सल्लागार म्हणून शिफारसी सादर केल्या आहेत.
भाजप महाराष्ट्र प्रदेश संविधान अभियान समितीच्या संयोजकपदी अमित गोरखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महसूल मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही नियुक्ती केली.
भारतीय संविधानाचा ‘अमृत महोत्सव’ आपण साजरा करत असताना परभणीत ( Parbhani ) मात्र संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान होण्याची निंदनीय घटना नुकतीच घडली आणि राज्यभर त्याचे पडसाद उमटले. या एकूण घटनेचा घटनाक्रम अतिशय वेदनादायक आहे.
सध्याच्या राजकीय वातावरणात सत्ताधारी पक्ष संविधान बदलणार आहे अशी भीती विरोधी पक्ष सातत्याने व्यक्त करतो आहे. आणि आजच्या विरोधी पक्षाने पूर्वी सत्तेत असतांना कितीतरी वेळा संविधानात बदल केले हे आजचा सत्ताधारी पक्ष इतिहासातील दाखले देऊन सांगतो आहे. या उलट सुलट आरोप प्रत्यारोपांच्या फैरींच्या धुमश्चक्रीत सामान्य माणूस मात्र संभ्रमित होतो आहे. Politics anarchy संविधान सभेने संविधानाच्या मसुद्याला मान्यता देण्याला नुकतीच ७५ वर्ष पूर्ण झाली, पुढच्या महिन्यात भारतीय प्रजासत्ताक व्यवस्थेला ७५ वर्ष पूर्ण होतील. भारत
परभणी : “गांधी घराण्याने आणि काँग्रसने नेहेमीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दुस्वास केला आहे. आजही काँग्रेसचे नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) हे परभणीत आले. ते सोमनाथ सूर्यवंशी तसेच जेष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या घरी गेले. मात्र, जिथे संविधानाच्या प्रतिकृतीचा अपमान झाला, तिथे ते गेले नाहीत. हा एक प्रकारे समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. त्यांचा दौरा हा आमच्या मागास समाजाच्या न्यायहक्कांसाठी नव्हता, तर परभणी प्रकरण दडपण्यासाठी आणि राजकारण करण्यासाठी आहे,” असा घणाघाती आरोप समाज अभ्यासक आणि दलित चळवळी
नवी दिल्ली : “देशात समान नागरी कायदा लागू असावा, असे स्पष्ट मत घटनाकारांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे देशात ‘धर्मनिरपेक्ष समान नागरी कायदा’ लागू करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत,” अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी शनिवार, दि. १४ डिसेंबर रोजी लोकसभेत दिली.
नवी दिल्ली : भारतीय राज्यघटनेवरील नियोजित चर्चेदरम्यान दि. १३ डिसेंबर आणि दि. १४ डिसेंबर रोजी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी भाजप आणि काँग्रेस पक्षाने त्यांच्या सर्व लोकसभा ( Loksabha ) सदस्यांना तीन ओळींचा ‘व्हिप’ जारी केला आहे.
नवी दिल्ली : भारतीय संविधान हे एका विशिष्ट पक्षाची देणगी असल्याचे ठसविण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र, भारतीय संविधान ( Constitution ) हे नागरिकांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब असून सरदार भगतसिंग, पं. मदनमोहन मालवीय आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांनी संविधानाची भावना बळकट होते, असे प्रतिपादन देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत शुक्रवारी केले.
भारतीय राज्यघटनेवरील नियोजित चर्चेदरम्यान १३ आणि १४ डिसेंबर रोजी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी भाजप आणि काँग्रेस पक्षाने त्यांच्या सर्व लोकसभा सदस्यांना 'तीन ओळींचा व्हीप' जारी केली आहे.
मुंबई : परभणीत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या ( Constitution ) प्रतिकृतीचा झालेला अवमान निषेधार्ह असुन संविधानचा अवमान आम्ही खपवून घेणार नाही. संविधानाचा अवमान करण्याऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली आहे.
मुंबई : "विरोधी पक्षातील नेत्यांनी संवैधानिक संस्थांवर बिनबुडाचे आरोप करणे, हे संसदीय लोकशाहीसाठी घातक आहे. त्यामुळे माझी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींना विनंती आहे, संवैधानिक संस्थांवर असे आरोप करून त्यांचा सन्मान कमी करू नका", असे प्रतिपादन आमदार अॅड. राहुल नार्वेकर ( Rahul Narvekar ) यांनी रविवार, दि. ८ डिसेंबर रोजी केले.
नवी दिल्ली : केंद्र सरकार मंगळवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी विशेष पद्धतीने संविधान दिन साजरा करणार आहे. संविधान दिनानिमित्त संसदेचे संयुक्त अधिवेशन ( Joint Session ) आयोजित करण्यात येणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, “हा केवळ भारतीय संसदेचा उत्सव नाही. केंद्र सरकार भारतीय राज्यघटनेचा आदर करत असून त्याची मूल्ये देशातील जनतेसमोर आणत आहे. संविधान निर्मात्यांना आदरांजली अर्पण केली जाणार आहे. त्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांची विशेष स
मुंबई : भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी काढलेल्या ‘बहुजन समाज संवाद यात्रे’मुळे विधानसभा निवडणुकीत संविधानविरोधी ( Constitution ) ‘फेक नॅरेटिव्ह’चा धुव्वा उडाला. ही यात्रा महाराष्ट्रातील ७० पेक्षा जास्त विधानसभा क्षेत्रांत पोहोचली. त्यांच्या प्रत्येक सभेला अनुसूचित जातीतील तीन ते पाच हजारांहून अधिक लोकांची उपस्थिती होती.
मुंबई : भारतीय संविधान दिनानिमित्त आयोजित 'संविधान सन्मान रॅली २०२४' मध्ये मलबार हिलचे आमदार मंगल प्रभात लोढा ( Mangal Prabhat Lodha ) यांनी सक्रीय सहभाग घेतला. संविधानाच्या मूल्यांची जनजागृती करण्यासाठी डॉ. आंबेडकर मेडिकोस असोसिएशन आणि सामाजिक समरसता मंचाद्वारे आयोजित हा उपक्रम प्रशंसनीय असल्याचे त्यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले. तसेच संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले!
देशात हिंदू बहुसंख्य असतील तरच संविधान सुरक्षित राहील. त्यामुळे भारताचे संविधान सुरक्षित ठेवण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन शंभर टक्के मतदान करणे किती आवश्यक आहे? याबाबत अॅड. अश्विनी कुमार उपाध्याय ( Ashwini Kumar Upadhyay ) यांनी साधलेला संवाद #AshwiniKumarUpadhyay #hindu #Hindutva #Election #Maharashtra #Election2024 #ConstitutionofIndia #News #MahaMTB #Samvidhan #संविधान #Congress #Shivsena #BJP #SupremeCourt
‘लाल संविधान’ कम्युनिस्ट देशांचे असते आणि त्याच्या प्रत्येक पानावर मानवी रक्ताचे भरपूर डाग असतात. या ‘लाल संविधाना’शी आपला काहीही संबंध नाही. ज्याप्रमाणे जेम्स मॅडिसन यांना ‘अमेरिकन संविधानाचे पितामह’ म्हणतात, त्याप्रमाणे पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘भारतीय संविधानाचे पितामह’ म्हणतात. अंतर्गत गोंधळ घालणार्या वेगवेगळ्या समूहांविषयी संविधान सभेत त्यांनी खूप इशारे दिलेले आहेत.
पुणे : लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांनी केब्रिज येथे भाषण देताना भारत हे राष्ट्र नाही तर एक युनियन स्टेट आहे असे सांगितले. पण भारताच्या संविधानाच्या सरनाम्यातच राष्ट्र असा स्पष्ट उल्लेख आहे. राहुल गांधींना संविधान शिकविले पाहिजे, असे परखड मत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी ( Avinash Dharmadhikari ) यांनी पुणे येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
नाशिक : ( Pravin Darekar ) “लोकसभा निवडणुकीत जसा देशात काँग्रेसने आणि राज्यात महाविकास आघाडीने संविधानाचा अपप्रचार केला, तसाच आता विधानसभेलाही अपप्रचार करुन जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. लोकसभा निवडणुकीत संविधानाचा खोटा ‘नॅरेटिव्ह’ सेट करून राहुल गांधी यांनी जनतेला भ्रमित करण्याचे काम केले. आताही ते हातात संविधानाची प्रत घेऊन त्याचा अपमान करत आहेत. संविधान भाजपसाठी सर्वोच्च पवित्र राष्ट्रीय धर्मग्रंथ आहे,” असे प्रतिपादन विधान परिषदेतील भाजपचे गटनेते प्रविण दरेकर यांनी केले. विधानसभा निवडणुकीच्या प्
( Pravin Darekar )लोकसभा निवडणुकीत संविधानाचा खोटा नरेटिव्ह सेट करून दिशाभूल करणारा अपप्रचार केला. आता पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीत अशाच प्रकारे अपप्रचार करून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करत मतदान मिळवता येईल या उद्देशाने राहुल गांधी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे काम सुरू आहे. हातातील संविधानाच्या पुस्तिकेचा आपल्या राजकीय स्वार्थासाठी ते वापर करत असून पवित्र अशा संविधानाचा वापर करण्यास निवडणूक आयोगाने त्यांच्यावर बंदी घालावी, अशी मागणी भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केली. ते नाशिक येथे पत्रकार
लाल संविधान दाखवून तुम्ही कुणाला इशारा देत आहात? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेस नेते राहूल गांधींना केला आहे. तसेच राहूल गांधी हे समाजात अराजकता तयार करण्याचे काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यांनी बुधवारी कोल्हापूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
संविधानाच्या मारतात बाता, काँग्रेसचा एकूण विषयच खोटा, अशी टीका भाजपने काँग्रेसवर केली आहे. बुधवार, ६ नोव्हेंबर रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी नागपूर येथे संविधान सन्मान संमेलनात उपस्थित झाले होते. यावेळी त्यांच्या हातात नेहमीप्रमाणे लाल रंगाचे संविधानाचे पुस्तकही होते. मात्र, या पुस्तकाचा एक व्हिडीओ भाजपने शेअर केला असून यात हे पुस्तक आतून कोरेच असल्याचे दिसून आले आहे.
Praveen Darekar अभिव्यक्ती स्वातंत्र आणि प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्याच्या कायम बाता मारणारे काँग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नागपुरातील कार्यक्रमादरम्यान प्रसार माध्यमांना प्रवेश नाकारण्यात आला असल्याचा खळबळजनक आरोप भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केला आहे. राहूल गांधींकडून कायम संविधानाची हत्त्या केली जात असल्याचेही दरेकर म्हणाले.
भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित 'संविधान जागर समिती महाराष्ट्र' यांच्या वतीने राज्यभरात 'घर घर संविधान' अभियान राबविण्यात येत आहे. दि. २६ ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबर या कालावधीत सदर अभियान पार पडेल. त्या पार्श्वभूमीवर मंगळवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. Ghar Ghar Samvidhan
Indian constitution ‘युपीए’च्या काळात ‘राष्ट्रीय सल्लागार परिषदे’च्या माध्यमातून काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधींकडेच सरकारचा रिमोट कंट्रोल होता, हे सर्वश्रूत. आता त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील पुरोगामी आणि डाव्या टोळीने मविआच्या प्रचारासाठी काँग्रेससमोर काही अटी ठेवल्या आहेत. त्यापैकीच एक अट म्हणजे, मविआचे महाराष्ट्रात सरकार आल्यास ‘राज्य सल्लागार परिषदे’ची स्थापना करावी. ही मागणी म्हणजे संविधानालाच नख लावण्याचा प्रकार. म्हणूनच ही मंडळी संविधानरक्षक नव्हे, तर संविधानमारकच!
सर्वोच्च न्यायालयातील न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी काढण्यात आली असून हातातील तलवारीची जागाही भारतीय संविधानाने घेतली आहे. नवी प्रतिमा भारताच्या न्यायव्यवसथेच्या नव्या युगाकडे निर्देश करत आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त राज्यभरात घर घर संविधानअभियान राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबद्दलचा शासन आदेशदेखील जारी करण्यात आला आहे.
“आजवर आपल्या संविधानात ज्या सुधारणा झाल्या आहेत, त्या काळानुरूप झालेल्या आहेत. नागरिकत्वाचा कायदा, ‘कलम ३७०’ रद्द करण्याचा कायदा, तिहेरी तलाकबंदीचा कायदा ही आताची उदाहरणे आहेत. यापूर्वी समान न्याय, विनामूल्य कायदेशीर मदत, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गाचा विकास, मूलभूत कर्तव्याविषयीचा स्वतंत्र अध्याय, मतदानाची मर्यादा २१ वर्षांहून १८ वर्षांवर आणण्याचा कायदा, पक्षांतरबंदी विरोधी घटना सुधारणा, महिलांना राजकीय आरक्षण इत्यादी सर्व विषय काळाच्या संदर्भात आवश्यक त्या सुधारणा करण्याचे विषय ठरलेले आहेत.”
Constitution राष्ट्रनिष्ठ म्हणजे सार्वत्रिक बंधुभावना, सामाजिक ऐक्य, धार्मिक सलोखा बिघडेल, असे कोणतेही काम न करणे. या वृत्तीपासून शेकडो हात दूर राहणे, याचे दुसरे नाव राज्यघटनेशी एकनिष्ठ राहणे होय.
निवडणुका जाहीर झाल्या की, संविधान बदलाची आरोळी ठोकली जाते. २०१४, २०१९ आणि आता २०२४च्या निवडणुकांदरम्यानही तीच परिस्थिती. मोदी सरकार सत्तेत आले की संविधान बदल हा अटळ आहे, अशा आशयाचा अपप्रचार शिगेला पोहोचतो. यंदाही परिस्थिती काही वेगळी नाही. काँग्रेसचे युवराज राहुल गांधी आणि अख्ख्या पक्षाकडूनच संविधान बदलाचा बागुलबुवा उभा केलेला दिसतो.
भारतीय संविधान कधीच बदलू शकत नाही व खरे तर ते जबरदस्तीने व हुकूमशाहीच्या माध्यमातून कोणी आणि कसे मोडून तोडून टाकले होते व भारतीय लोकशाही कोणी नष्ट केली होती आणि संविधान नेमके कोणी वाचविले, हे मायबाप समाजापुढे व्यवस्थित मांडणे आणि काँग्रेसवाल्यांच्या तथा खोट्या पुरोगामी लोकांची पोलखोल करणे, हे संविधानाचा अभ्यासक, कट्टर समर्थक आणि संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा कट्टर पाईक व अनुयायी या नात्याने माझे परमकर्तव्य आहे. म्हणूनच केलेला हा लेखप्रपंच...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, “काँग्रेस जळके घर आहे.” खरेच काँग्रसचे तत्कालीन काही लोक एकप्रकारे बाबासाहेबांवर जळतच असत. मात्र, आताही काँग्रेसी नेत्यांचा स्वभाव बदललेला नाही. संविधानाचा योग्य अर्थ लावून देशाला खरे अमूल्य संविधान दिले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी. मात्र, आता राहुल गांधींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे कर्तृत्व नाकारले आहे. नुकतेच कर्नाटकमध्ये राहुल गांधी म्हणाले की, “काँग्रेसने देशाला संविधान आणि लोकशाही दिली.” बाबासाहेबांचा आजन्म दुस्वास करणार्या काँग्रेसचा वारसा राहुल गांधी चालवत
भारताचं संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधान आहे, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे. त्यांनी रविवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दीक्षाभूमी येथे त्यांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आपल्याला एका विषयाचा विचार करायचा आहे, तो विषय म्हणजे संविधानात बदल केव्हा होतो? तसेच न बदल झालेले संविधान जगात आहे का? ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, जपान आणि म्यानमार (ब्रह्मदेश) या निवडक देशांच्या संविधानांच्या वाटचालींचा अगदी थोडक्यात आपण विचार करुया.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय दलांना दहशतवादाचा सामना करणारे सर्वोत्कृष्ट दल बनविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यासाठी पोलिस तंत्रज्ञान मिशनची स्थापना करण्यात आली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी केले.
मुंबई : आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाविकास आघाडीने वज्रमूठ सभेचे आयोजन केले आहे. वांद्रे कुर्ला संकुलात वज्रमुठ सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना ठाकरे गट प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटले, आजची वज्रमुठ सभा ही संविधान आणि महाराष्ट्र संरक्षणासाठी आयोजित केली आहे. तसेच, पंतप्रधान आणि गृहमंत्री यांचे देशाच्या संविधानावर नव्हे, तर ' मन की बात' वर प्रेमवर असल्याचे राऊतांनी म्हटले आहे.
२०व्या शतकात भारताला राजकीय व सामाजिक परिप्रेक्ष्यात ज्या दोन महापुरुषांनी प्रभावित केले, ते महापुरुष म्हणजे महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर. या दोन्ही महापुरुषांचे योगदान शब्दातीत आहे. आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या सशक्त, समरस राष्ट्राच्या निर्माणातील त्यांच्या अमूल्य योगदानाचा आढावा घेणारा हा लेख...
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 132वी जयंती. दि. 14 एप्रिल हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती दिन आमच्यासाठी प्रेरणा देणारा दिवस आहे. डॉ. आंबेडकरांच्या स्वप्नांची पूर्तता करण्याची शक्ती देणारा दिवस आहे. एप्रिल म्हटले की, पहिली आठवण येते ती दि. 14 एप्रिलची, भीमजयंतीची. डॉ. आंबेडकर जयंतीची वर्षभर आंबेडकरी जनता वाट बघते आणि भीमजयंती दिवाळीसारखी साजरी करते. डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढली जाते.
संमेलन स्थळी एकूण 286 पुस्तकांची व इतर वस्तूंची दुकाने थाटली होती. दिवसभर सर्वच दुकानांतून खरेदी करणाऱ्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. पुस्तकांसोबतच इतरही वस्तूंची विक्री होत आहे. स्टोरीटेल मराठी, मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठीची मराठी मंडळे आपले म्हणणे सरकारपर्यंत पोहोचावे म्हणून वैशिष्ट्यपूर्ण रीतीने धरणे धरून बसली होती. ३ दिवसांच्या संमेलनात २ कोटी ८९ लक्ष रुपयांची एकूण पुस्तके विक्रीला गेल्याचे आयोजक प्रदीप दाते यांच्याकडून समजते.