र्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याचा आदेश, मंगळवार दि. ६ मे रोजी दिला आहे. न्यायालयाने इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षणासंहित निवडणूका घेण्याचे निर्देश महाराष्ट्र निवडणूक आयोगाला राहुल रमेश वाघ विरुद्ध महाराष्ट्र राज्य या खटल्याच्या सुनावणी दरमान्य दिले आहेत.
Read More
विशेष प्रतिनिधी इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षणाच्या अंमलबजावणीशी संबंधित खटल्यांमुळे २०२२ पासून स्थगित असलेल्या महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. जुलै २०२२ मध्ये बांठिया आयोगाचा अहवाल सादर होण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या ओबीसी आरक्षणानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. गेल्या तीन वर्षांपासून आपण सारे याच क्षणाची वाट पाहत होतो. हा निर्णय लोकशाही व्यवस्थेला बळकट करणारा आहे, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री व नागपूर आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत केंद्रीय पॅनेलच्या सहसचिव पदावर प्रचंड विजय मिळवला. अभाविपचे उमेदवार वैभव मीणा यांनी सहसचिव पदावर विजय मिळवत डाव्या संघटनांना एकप्रकारे आव्हान दिले आहे. त्याचबरोबर १६ शाळा आणि विविध संयुक्त केंद्रांमध्ये एकूण ४२ पैकी २४ समुपदेशक पदांवर विजय मिळवून अभाविपने 'लाल किल्ल्यावर' भगवा फडकवला आणि अनेक वर्षांपासून प्रचलित असलेल्या तथाकथित डाव्या विचारसरणीचा पाडाव केल्याचे दिसून आले. ABVP in JNU Election Result
'भारतीय निवडणूक आयोग’ ही देशाच्या लोकशाही व्यवस्थेची एक अत्यंत विश्वासार्ह आणि संविधानिक संस्था आहे. जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीत निवडणूक आयोगाची भूमिका केवळ निवडणुका पार पाडण्यापुरती मर्यादित नसून, देशाच्या लोकशाही मूल्यांची रक्षण करणारी ती आधारशिला आहे. मात्र, कपिल सिब्बल यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी या संस्थेवर जे आरोप केले आहेत, ते अत्यंत घातक आहेत. कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगावर ‘अपयशी आणि निष्क्रिय’ अशी टिप्पणी करताना जे राजकारण केले, ते नेमके विरोधकांची मानसिकता दर्शवते.
विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी होणाऱ्या निवडणूकीकरिता शिवसेनेने आपला उमेदवार जाहीर केला आहे. शिवसेनेकडून संपर्क प्रमुख आणि माजी विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांना संधी देण्यात आली आहे.
विधानपरिषद पोटनिवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एक जागा आली असून त्यासाठी त्यांनी नुकाच आपला उमेदवार जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने संजय खोडके यांना विधानपरिषदेसाठी संधी दिली आहे. सोमवार, १७ मार्च रोजी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून २७ मार्च रोजी मतदान पार पडेल.
विधानपरिषदेच्या पोटनिवडणूकीसाठी एका अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केल्याची माहिती पुढे आली आहे. दौंड तालुक्यातील उमेश महादेव म्हात्रे असे या अर्जदाराचे नाव असून त्यांनी विधानपरिषेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महायुतीतच लढणार, असे महसूल मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. सोमवार, १७ फेब्रुवारी रोजी त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
'अभिव्यक्ती'च्या नावाखाली गरळ ओकायचा प्रकार रवींद्र पोखरकर यांनी आपल्या एका व्हिडिओतून केला आहे. 'अभिव्यक्ती' या युट्यूब चॅनलवर त्यांनी दि. १० फेब्रुवारी रोजी 'सुपारीबाज, पाखंडी कीर्तनकार महाराज...' या शीर्षकाखाली एक व्हिडिओ केला, ज्यामध्ये त्यांनी अध्यात्माची आणि धर्माची आजीवन सेवा करणाऱ्या कीर्तनकारांचा अश्लाघ्य भाषेत अपमान केल्याचं दिसतंय. Ravindra Pokharkar on Kirtankar
दिल्ली विधानसभा निवडणूकीत आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दारूण पराभव झाला आहे. आम आदमी पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
गेली १० वर्षे असलेले दिल्लीकरांवरचे 'आप'चे संकट दूर झाले आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. दिल्ली विधानसभा निवडणूकीत भाजप सध्या विजयाच्या मार्गावर असून आम आदमी पक्ष पिछाडीवर आहे.
दिल्ली विधानसभा निवडणूकीत आम आदमी पक्षाचा पराभव झाला आहे. त्यामुळे कृपया मला फोन करू नका, अशी पोस्ट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.
Delhi Assembly election दिल्लीत झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या (Delhi Assembly election) निकालानंतर दिल्ली सरकारच्या प्रशासन विभागाने सुरक्षेचे कारण देत दिल्ली सचिवालय कुलूप बंद करण्यात आले. राजधानीत भाजपच विजय स्पष्ट झाला. आपच्या बड्या नेत्यांना परभवाला सामोरे जावं लागलं आहे. त्यावेळी निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे.
Narendra Modi दिल्ली निवडणुकीच्या निकालानंतर आम आदमी पक्ष आणि त्यांचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आपला पराभव स्वीकारला आहे. त्याचबरोबर भाजपच्या या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील जनतेचे आभार मानले असून कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५ मध्ये आम आदमी पक्षाचा दारूण पराभव करण्यात आला. आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना बोजा बिस्तारा उचलावा लागला आहे. आपच्या सत्तेची १० वर्षे पूर्ण झाली आहेत. या निवडणुकीत मुस्तफाबाद मतदारसंघातून मुस्लिमबहुल भागामध्ये भाजपच्या उमेदवाराने पक्षाला विजय मिळवून दिला. मुस्ताफाबादमध्ये भाजपचे उमेदवार मोहन सिंग बिश्त यांनी आम आदमी पक्ष, एमआयएम आणि काँग्रेसचा पराभव केला होता.
Delhi Vidhansabha Election 2025 दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाचा संदेश स्पष्ट आहे. दिल्लीकरांनी स्वीकारलेले भाजपचे विकासाचे राजकारण, झिडकारलेले ‘आप’चे भ्रष्ट आणि विचारसरणीहीन कर्कश राजकारण आणि काँग्रेसवर दाखवलेला अविश्वास... तेव्हा, दिल्लीच्या निकालांचा अशा विविध कोनांतून अन्वयार्थ उलगडणारा हा लेख...
Rahul Gandhi राज्यात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली. महायुतीने एक हाती विजय मिळवत महाविकास आघाडीला पाणी पाजले. त्यानंतर दिल्ली विधानसभा मतदारसंघात काही एक्झिट पोलने भाजपच विजयी होणार असल्याचा दावा केला. दिल्लीतील पराभव लक्षात घेता आता राहुल गांधी यांनी राज्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेसाठी उबाठा गटाचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही पत्रकार परिषदेला संबोधित केले.
दिल्ली विधानसभेच्या निवडणूकीत काँग्रेसचा दारुण पराभव होणार असल्याने निकालाच्या दिवशी काय बोलावे यासाठी राहुल गांधींची प्रॅक्टिस सुरु आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
Delhi Assembly Election ७० जागांसाठी ५ फेब्रुवारी २०२५ रोजी मतदान झाले. त्यानंतर ८ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्याआधीच एग्झिट पोलने दिल्लीमध्ये कमळ फुलून भाजप विजयी होणार असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. भाजप २७ वर्षींनी पुन्हा एकदा दिल्लीमध्ये सत्तेत येणार असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. आम आदपी पक्षाच्या विजयाची कोणतीही शक्यता नाही. दरम्यान काँग्रेसचे मुश्कीलीने खाते खोलता येणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे.
Narendra Modi दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शेवटच्या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, दिल्लीतील दहावीच्या बोर्डाचे निकाल सुधारण्यासाठी सत्ताधारी आम आदमी पक्ष नववीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. ते दिल्लीतील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत असताना म्हणाले आहेत.
नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक ( Local Body Election ) प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता २५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. न्यायालयाने मंगळवारी तसे निर्देश दिले आहेत.
Delhi Assembly Election 2025 आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये गलगितुरा रंगला आहे. काही दिवसांआधी भाजपचे आपले आश्वासनपर पत्र जारी केले. त्यानंतर आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांनीही पत्रक जारी केले. त्या पत्रकामध्ये त्यांनी यमुना नदी साफ करण्याचे आश्वासन दिले. हे अश्वासन याआधी अनेकदा दिले होते. त्यावर अरविंद केजरीवाल यांनी हरियाणा भाजप सरकारच पाण्यात विष मिसळत असल्याने नदीचे पात्र साफ होत नसल्याचा निरर्थक तर्क लावला आहे.
Delhi Vidhansabha Election दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल परवा केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी भाजपने केलेल्या कामकाजाचा आढावा वाचून दाखवला. तसेच निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीकरांच्या समोर आपली आश्वासने मांडली आहेत. यानंतर आता दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी १५ हमीपत्रांची घोषणा केली आहे. यामध्ये सलग तिसऱ्यांदा यमुना साफ सफाईचे आश्वासन त्यांनी दिल्लीकरांना दिले आहे. यावर एका नेटकऱ्याने आता स्वत:साठी आणखी एक मोठा शीशमहल बांधा, असे म्हणत केजरीवाल यांच्यावर मिश्की
Delhi Assembly Election 2025 दिल्लीत थंड हवामानासह आता विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे. येत्या ५ फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. अशातच प्रतिस्पर्धी एकमेकांवर आरोप प्रत्योराप करत आहेत. प्रचार सुरू असून याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सभा दणाणून सोडली आहे. यावेळी त्यांनी आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला चढवला आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीला कचऱ्याचा डबा {डसेटबिन) बनवल्याचा आरोप केला आहे.
काँग्रेसचे ( Congress ) युवराज राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ’जितनी आबादी उतना हक’चा नारा दिला आहे. एके काळी जातीपातीविरोधात घोषणा देत लोकसभा निवडणूक लढवणार्या काँग्रेसची पुढची पिढी सत्तेसाठी जातींचे राजकरण करत आहे, यावरूनच काँग्रेसचे कोणतेही धोरण स्वार्थकेंद्रित असते, हे स्पष्ट होते. आज राहुल गांधी रोजगाराच्या मुद्द्याची शिडी करून जातीनिहाय आरक्षणाचा डाव मांडत आहेत. देशाच्या प्रगतीचे विभाजन करण्याचा हा डाव आहे. भारताच्या प्रगतीसाठी आसवे वाहणार्या काँग्रेसने, गेली कित्येक वर्षे देशातील शैक्षणिक धोरण बदलण्
Delhi Election दिल्लीमध्ये झालेल्या २०२० च्या हिंदूविरोधात केलेल्या दंगलीप्रकरणात असलेले आम आदमी पक्षाचे माजी नगरसेवक ताहिर हुसेन यांनी जामीनाची मागणी केली. ताहिर हुसेन आता एमआयएम पक्षामध्ये सामील झाले आहेत. एमआयएमने दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुस्तफाबाद मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. यानंतर त्यांनी निवडणूक लढवण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये अंतरिम जामीनासाठी याचिका दाखल केली. ताहिर हुसेन यांनी याचिकेत १४ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत वेळ मागितला. जेणेकरून ते निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊ शकत
दिल्ली विधानसभा निवडणूकीत अरविंद केजरीवाल जिंकतील, असा दावा काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. तसेच काँग्रेस आणि आम आदमी पक्ष दिल्ली विधानसभा स्वतंत्र लढवणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.
दिल्लीत जसे घडले तसे मुंबईत पालिका निवडणूकीत होऊ शकते, असे विधान संजय राऊतांनी केले आहे. दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या तारखांची घोषणा झाली असून दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पक्ष स्वतंत्र लढणार असल्याची माहिती आहे. यावर राऊतांनी प्रतिक्रिया देत मुंबई महापालिका निवडणूका स्वतंत्र लढण्याचे संकते दिले.
एक देश एक निवडणूकीला आमचा विरोध आहे, असे वक्तव्य उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केले आहे. बुधवार, ८ जानेवारी रोजी एक देश एक निवडणूक याबाबत संयुक्त संसदीय समितीची (जेपीसी) पहिली बैठक होणार आहे. त्याआधी संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली.
Delhi Assembly Election आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ‘इंडी’ आघाडीतील फूट ही पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. मुळात ‘इंडी’ आघाडी नामक ही राजकीय आघाडीची तडजोड केवळ लोकसभा निवडणुकीपुरतीच मर्यादित असल्याचे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे नेतृत्वहीनता, राजकीय महत्त्वाकांक्षांचे ग्रहण लागलेल्या ‘इंडी’ आघाडीचे भविष्य हे अंध:कारमय आहे, हे निश्चित!
नवी दिल्ली : भाजपने सोमवार, दि. २३ डिसेंबर रोजी राष्ट्रीय राजधानीत सत्ताधारी आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सरकारविरोधात ‘आरोपपत्र’ जारी केले. भाजपने भ्रष्टाचार आणि यमुना प्रदूषणासह ( AQI ) अनेक मुद्द्यांवरून ‘आप’ला लक्ष्य केले आहे.
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीने ( AAP Govt. ) दिल्लीतील महिला आणि वृद्धांसाठी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. महिलांना २१०० रुपये प्रति महिना आणि ६० वर्षांवरील वृद्धांना सरकारी आणि खाजगी रुग्णालयात सर्व प्रकारचे मोफत उपचार देण्याची घोषणा पक्षाने केली आहे. या दोन्ही घोषणांसाठी २३ डिसेंबरपासून नोंदणी सुरू झाली आहे. 'आप'चे राष्ट्रीय संघटक अरविंद केजरीवाल यांनी याची घोषणा केली.
नवी दिल्ली : दि. २५ नोव्हेंबर रोजी सुरू झालेले संसदेचे हिवाळी अधिवेशन ( Winter Session ) २०२४, शुक्रवार, दि. २० डिसेंबर रोजी अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आले. या अधिवेशनात २६ दिवसांत लोकसभेच्या २० आणि राज्यसभेच्या १९ बैठका झाल्या.
समाजवादी पक्षाचे नेते धर्मेंद्र यादव यांनी एक देश एक निवडणूक या विधेयकाला विरोध दर्शवत, सदर विधेयकाचा निषेध केला आहे. त्याच बरोबर काँग्रेस, त्रुणामूल काँग्रेस, समाजवादी पक्षातील नेत्यांनी सुद्धा या विधेयकाला विरोध दर्शवला आहे. कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी मंगळवार दिनांक १७ डिसेंबर रोजी एक देश एक विधेयक लोकसभेत सादर केले. सदर विधेयक संसदेसमोर आणल्या नंतर त्यावरील घटनात्मक बाबींवर चर्चा होणार आहे.
देशातील निवडणुक प्रक्रियेला गती मिळावी म्हणनू लोकसभेत एक देश एक निवडणूक विधायक सादर करण्यात आले आहे. या विधेयकवर लोकसभेत चर्चा झाल्यानंतर, ई व्होटींग घेण्यात आले, ज्यामध्ये पहिल्या फेरीत विधेयकाच्या बाजूने २३९ मते पडली, तर दुसऱ्या बाजूला विधेयकाच्या विरोधात १९८ मते पडली. यानंतर लोकसभेत विरोधी पक्षातील सदस्यांनी घोषणाबाजी देत गोंधळ सुरू केला. यानंतर लोकसभेचे कामकाज ३ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
नागपूर : मागील २ वर्षांपासून रिक्त असलेल्या विधानपरिषदेच्या ( Legislative Council ) सभापती पदाची निवडणूक दि. १९ डिसेंबर रोजी घेण्यात येणार असल्याची घोषणा विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी मंगळवार, दि. १७ डिसेंबर रोजी केली.
नवी दिल्ली : सदस्यांनी मतदान केल्यानंतर संविधान (एकशे एकविसावी सुधारणा) विधेयक, २०२४ आणि 'केंद्रशासित प्रदेश कायदे (सुधारणा) विधेयक, २०२४' औपचारिकपणे लोकसभेत सादर करण्यात आले. या विधेयकात 'एक राष्ट्र, एक निवडणूक' ( One Nation One Election ) अर्थात लोकसभा आणि राज्य विधानसभा दोन्हीच्या एकाच वेळी निवडणुकांचा प्रस्ताव आहे. हे विधेयक सविस्तर चर्चेसाठी हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे (जेपीसी) पाठविण्यात येणार आहे.
बांगलादेशात झालेल्या सत्तांतरानंतर मुहम्मद युनुस यांच्या नेतृत्वातील अंतरिम सरकार येथील सत्ता चालवत आहे. सत्तांतर झाल्यापासून अंतरिम सरकारकडे निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याची मागणी वारंवार करण्यात येत होती. त्यामुळे वाढत्या दबावामुळे, मोहम्मद युनूस यांनी २०२५ च्या उत्तरार्धात किंवा २०२६ च्या सुरुवातीला निवडणुका होतील असे म्हटले जात आहे. हिंदू अल्पसंख्याकांवर इस्लामिक कट्टरपंथींकडून हल्ले होत असताना मुहम्मद युनुस यांनी घेतलेल्या निर्णयाने चर्चाना उधाण आले आहे. Bangladesh Election News
One Nation One Election- एकाच वेळी होणार देशभर निवडणूका!
पुण्याच्या कसबा पेठेतील ( Kasaba Peth ) विधानसभेची पोटनिवडणूक राज्यभरात गाजली होती. भाजपचा गड काबीज केल्याने काँग्रेस आणि रवींद्र धंगेकर आता पुणेकर आपल्याच पाठीशी या अभिर्भावात होते. मात्र त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणूक आणि आता विधानसभा निवडणुकीत पुणेकरांनी धंगेकरांना सपशेल नाकारलं. आणि हेमंत रासने यांच्या रूपात भाजपने आपला बालेकिल्ला या विधानसभा निवडणुकीत कायम राखला. यानिमित्ताने जाणून घेऊया की पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या धंगेकरांना पुणेकरांनी का नाकारलं
मुंबई : ‘अरे आवाज कुणाचा’ अशी आरोळी कानावर पडली की, मुंबईकरांच्या मुखातून आपसूकच ‘शिवसेनेचा’ असे निघायचे. पण, उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thacheray ) बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली आणि भगव्याशी इमान राखणार्यांचा घात झाला. मुंबईकरांनी त्यांना पाठ दाखवली. लोकसभा निवडणूक ते लांगूलचालन करून जिंकले खरे. पण, विधानसभेने गणिते फिरवली. त्याचे प्रतिबिंब येणार्या मुंबई पालिका निवडणुकीत उमटणार असल्यामुळे धास्तावलेल्या माजी नगरसेवकांनी महायुतीची दारे ठोठावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मुंबई महापालिके
मुंबई : सरकार स्थापन करताना गावाला यायचे नाही? असा काही नियम आहे का? मी नेहमी गावी येत असतो. निवडणुकीत एवढे दौरे आणि प्रचार झाले. निवडणूक आम्ही महायुती मोठ्या मताधिक्यांनी जिंकलो, अशी माहिती राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील दरेगावी गेल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती. त्याला शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. ते पुढे म्हणाले की, मी नेहमी सांगायचो की, जनता आम्हाला कामाची पावती देईल. महाविकास आघाडीने अडीच वर्षाच्या कार्यकाळात कामे थांबवल
काँग्रेस नेते भाई जगताप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोगाविषयी अवमानकारक वक्तव्य केले आहे. दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भाई जगताप यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून कारवाईची मागणी केली आहे.
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतदारांची नोंद आणि मतदानाच्या टक्केवारीबाबत काँग्रेसच्या ( Congress ) भीतीचे निराकरण करण्यासाठी, निवडणूक आयोगाने त्यांच्या शिष्टमंडळाला ३ डिसेंबरला भेटण्यासाठी आमंत्रित केले आहे. निवडणूक आयोगाने म्हटले आहे की ते काँग्रेसच्या सर्व न्याय्य चिंतांचा आढावा घेईल आणि पक्षाच्या शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून लेखी उत्तर देईल.
महाराष्ट्रामध्ये महायुतीला मिळालेला कौल विरोधकांच्या पचनी पडल्याचे दिसत नाही. हा निकाल स्विकारणार नसल्याची भूमिका काही जणांनी मांडली असून ईव्हीएम वर आपल्या अपयशाचे खापर फोडले जात आहे. अशातच आता यूट्यूबर अभिसार शर्मा खोट्या आकडेवारीचा आधार घेत जाणीवपूर्वक लोकांची दिशाभूल करीत आहेत.
kolhapur : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील १० मतदारसंघात महायुतीने धमाकेदार विजय मिळवला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झालीय तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाची अवस्थादेखील काही वेगळी नाही. करवीर निवासिनी अंबाबाई जिथे वास्तव्य करते अशा कोल्हापूरच्या छत्रपतींच्या सुनेचा अपमान कोल्हापूरवासियांच्या चांगलाच जिव्हारी लागला आणि थेट मतपेटीतूनच अद्दल घडवत मतदारांनी महाविकास आघडीला कोल्हापुरातून हद्दपार केलंय.
विधानसभा निवडणूक निकालातून स्पष्ट झाले की शिंदेच्या शिवसेनेलाच जनतेची पसंती आहे. मात्र विशिष्ट समाजाचे लांगुलचालन करूनही उद्धव ठाकरेंना ( Uddhav Thackeray ) इतक्या मोठ्या पराभवाचा सामना नेमका का करावा लागला ? जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून
विधानसभा निवडणूकीच्या आधीपासूनच महाविकास आघाडीची सत्ता येणार, निकाल लागताच मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आणि सत्तेत बसणार, अशी अनेक स्वप्ने मविआतील नेत्यांनी बघितली होती. मात्र, प्रत्यक्षात मुख्यमंत्री सोडाच पण विरोधी पक्षनेतेपदी बसण्याचीही संधी त्यांना जनतेने दिली नाही. महाविकास आघाडीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष. मात्र, जागावाटपापासून तर प्रत्यक्ष मतदानापर्यंत त्यांना कायमच मित्रपक्षांसमोर आपण मोठं असल्याचं वारंवार सिद्ध करावं लागलं. लोकसभेच्या निकालानंतर अगदी आकाशात असलेली काँग्रेस विधानसभेनंतर पार जमि
ठाणे जिल्ह्यात ‘मोठा भाऊ’ असलेल्या भारतीय जनता पक्षाने एकूण 18 पैकी नऊ जागा जिंकून ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा ‘भाजपच मोठा भाऊ’ असल्याचे सिद्ध केले. 2019 सालच्या तुलनेत भाजपने एक अतिरिक्त जागा जिंकली, तर जिल्ह्यात उबाठा, मनसे सोबतच काँग्रेसचाही सुपडा साफ झाला आहे.