पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभास 'मृत्युकुंभ' म्हणत आक्षेपार्ह विधान केलंय. सोबतच त्यांनी महाकुंभात व्हीआयपींना विशेष सुविधा आणि गरिबांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप केलाय. हा सर्वप्रकार नुकताच पश्चिम बंगालच्या विधानसभेत घडला. यापूर्वी महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरी आणि त्यात मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारी जाहीर करण्याबाबत अखिलेश यादव यांनी लोकसभेमध्ये अकलेचे तारे तोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आपल्याच पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीदरम्य
Read More
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येत असून भाजप २७ वर्षांनंतर पुन्हा सत्तेत येताना दिसत आहे. भाजप ४८ जागांनी आघाडीवर असून आपची गाडी सध्या २२ जागांवरच अडकून आहे. यंदाच्या निवडणुकीत 'आप'ची अवस्था फारच बिकट होणार असल्याचे यातून दिसते आहे. २०१३ पासून सातत्याने आपले वर्चस्व असलेल्या मुस्लिम भागातही 'आप'ला मते मिळत नसून, चांगलाच धक्का बसल्याचे पाहायला मिळते आहे. AAP Result in Muslim Area
“दिल्लीत यंदा भाजपलाच बहुमत मिळेल,” असा अंदाज अॅक्सिस माय इंडिया च्या आणि ‘टुडेज चाणक्य’ या दोन मतदानोत्तर कल चाचण्यांमध्ये (एक्झिट पोल) गुरुवार, दि. ६ फेब्रुवारी रोजी समोर आला आहे.दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दुसर्या दिवशी गुरुवारी ‘अॅक्सिस माय इंडिया’ आणि ‘टुडेज चाणक्य’ या संस्थांचे ‘एक्झिट पोल’ प्रसिद्ध झाले आहेत. या ‘एक्झिट पोल’मध्ये भाजपलाच बहुमत दाखविण्यात आले आहे, तर आपला सत्ता गमावावी लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
देशात दिल्लीमध्ये विधानसभेच्या निवडणुका ( Delhi Elections ) जवळ येऊन ठेपल्या असून, उद्या यासाठी मतदान होणार आहे. निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असतो. हा उत्सव नीट साजरा व्हावा यासाठी अनेक यंत्रणांनी कंबर कसली असून, त्यांनी निवडणूक काळामध्ये रेवडी वाटपांना चाप लावण्याचे कार्य उत्तमपणे पार पाडले आहे.
Delhi Assembly election दिल्लीच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाला खिंडार पडले आहे असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही. कारण आपच्या सात नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत अखेरचा राम राम केला आहे. राजीनाम्यात त्रिलोकपुरीचे आमदार रोहित मेहरौलिया, कस्तुरबा नगरचे आमदार मदनलाल, जनकपुरीचे आमदार राजेश ऋषी आणि पालममधील भावना गौर यांचाही यामध्ये समावेश आहे.
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला धडा शिकवला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते पददेखील त्यांना मिळू नये, अशी तजवीज केली. तरीदेखील हे पद पदरात पाडून घेण्यासाठी त्यांची विशेषतः उबाठा गटाची धडपड सुरू असल्याचे दिसते. मुळात या पदासाठी अपेक्षित संख्याबळ नसताना, असे धाडस करणे मूर्खपणाचेच. पण, देवेंद्र फडणवीस दया दाखवतील, या एकमेव आशेने उद्धव ठाकरे धडपडताना दिसतात. फडणवीसांवर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणार्या उद्धवरावांनी त्यासाठीच तर नागपुरात त्यांची भेट घेतली. ते देवेंद्र फडणवीस होते म्हणून
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लोकसभेपासून एकत्र असाणार्या ‘इंडी’ आघाडीतील बेबनाव समोर आला आहे. काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये पुढे जाण्यास ‘इंडी’ आघाडीमधील इतर पक्ष तयार नाहीत. ‘आप’ने तर काँग्रेसशी ( Congress ) उभा दावा मांडला आहे. त्यामुळे काँग्रेसला देखील मुस्लीम मतांवर डोळा ठेवत, त्यांची वेगळी चूल मांडावी लागली आहे.
दिल्ली विधानसभा ( Delhi Assembly ) निवडणुकीचे बिगुल वाजले असून, सध्या राजधानीत गोठवणारे शीतवारे आणि पावसांच्या सरींतही राजकीय वातावरण मात्र तापलेलेच. दिल्लीचे रण आता पूर्णपणे पेटले आहे. त्यामुळे सत्ताधारी ‘आप’ तिसर्यांदा राजधानीचे कारभारी होणार की जनता काँग्रेसला पुन्हा धुडकावून भाजपला संधी देणार, हे आता सुज्ञ दिल्लीकरांच्याच हाती...
निवडणुकांचा मौसम आला की ‘इंडी’ आघाडीच्या ( Indi Aghadi ) तोंडदेखल्या एकतेला आणखीन तडे जातात. तसाच अपेक्षित प्रकार आता दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही समोर आला असून, ‘आप’ आणि काँग्रेस हे पक्ष निवडणुका स्वतंत्र लढविणार आहेत. तसेच ‘एकला चलो रे’चे वारे बिहारमध्येही वाहू लागले आहेत. त्यामुळे ‘इंडी’ आघाडीचा पोपट अखेरीस मेला का, असा सवाल उपस्थित होणे साहजिकच.
Congress विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतर आधीच काँग्रेसमध्ये गळती सुरू असताना ठाणे काँग्रेसमध्ये आजी - माजी पदाधिकाऱ्यांची गच्छंती करण्यात येत आहे. पक्ष शिस्तीचा भंग केल्याच्या कारणास्तव ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अॅड. विक्रांत चव्हाण यांनी माजी जिल्हाध्यक्ष अनिल साळवी यांना पक्षातुन निलंबीत केले आहे.
वर्ष २०२४ संपण्यास आता अवघ्या चार दिवसांचा कालावधी उरला आहे. हे वर्ष विशेषतः राजकीयदृष्ट्या धक्कादायक वर्ष म्हणून लक्षात राहील. लोकसभा निवडणुकीपासून विविध विधानसभा निवडणुकांपर्यंत जनतेने असा जनादेश ( Results ) दिला, ज्याचा अंदाज मोठ्या राजकीय विश्लेषकांनाही आला नाही.
नवी दिल्ली : आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (रालोआ) ( NDA ) घटकपक्षांसोबत उतरण्याची तयारी केली आहे. ही एकजूट आम आदमी पार्टी(आप)साठी धोक्याची घंटा ठरणार आहे.
नवी दिल्ली : देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या तरतूदीच्या विधेयकावर विचार करण्यासाठी संसदेने शुक्रवारी ३९ सदस्यीय संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) ( JPC Members ) स्थापन केली आहे. समितीचे अध्यक्षपद माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार पी. पी. चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल सोमवारी, १६ डिसेंबर रोजी लोकसभेत ( Loksabha ) 'संविधान (एकशे एकविसावी सुधारणा) विधेयक, २०२४' सादर करतील. ही घटनादुरुस्ती एकत्रित निवडणुकांशी (वन नेशन वन इलेक्शन) संबंधित आहे.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधींच्या नेतृत्वावर खुश असलेले राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनाही आता राहुल गांधी नकोसे झाले आहेत. ‘इंडी’ आघाडीचे ( Indi Aghadi ) नेतृत्व ममता बॅनर्जी यांना देण्यास आपली हरकत नसल्याचे वक्तव्य लालूप्रसाद यादव यांनी केली आहे.
मुंबई : 'मातोश्री' म्हणजे लाखो शिवसैनिकांचे श्रद्धास्थान. बाळासाहेब ठाकरे यांच्या एका हाकेवर राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक मातोश्रीबाहेर ( Matoshree ) जमायचे. पण, बाळासाहेबांच्या पश्चात 'मातोश्री'चा रुतबा कमी झाला. 'मातोश्री'वरील राजकीय दरबाराची जागा 'किचन कॅबिनेट'ने घेतली. त्यांचेचे निर्णय पक्षात अंतिम ठरू लागले. संघटनात्मक पातळीवर कर्तृत्वशून्य असलेल्या शिलेदारांचा भरणा त्यात असल्यामुळे अधोगतीशिवाय काहीच हाती लागले नाही. विधानसभा निवडणूक हे त्याचे ताजे उदाहरण. परंतु, विधानसभेत सपाटून मार खाल्ल्यानंतर
मुंबई : ‘अरे आवाज कुणाचा’ अशी आरोळी कानावर पडली की, मुंबईकरांच्या मुखातून आपसूकच ‘शिवसेनेचा’ असे निघायचे. पण, उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thacheray ) बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली आणि भगव्याशी इमान राखणार्यांचा घात झाला. मुंबईकरांनी त्यांना पाठ दाखवली. लोकसभा निवडणूक ते लांगूलचालन करून जिंकले खरे. पण, विधानसभेने गणिते फिरवली. त्याचे प्रतिबिंब येणार्या मुंबई पालिका निवडणुकीत उमटणार असल्यामुळे धास्तावलेल्या माजी नगरसेवकांनी महायुतीची दारे ठोठावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मुंबई महापालिके
नवी दिल्ली : “दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही. आम्ही स्वबळावर निवडणुका लढवू,” असे रविवार दि. १ डिसेंबर रोजी ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal ) यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. दिल्लीतील त्यांनी ‘इंडी’ आघाडीला धक्का देत ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. आता येथील विधानसभा निवडणूक तिरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपविरोधी इंडी आघाडीमध्ये एकूण २६ पक्ष आहेत. आघाडीने दिल्लीत लोकसभा निवडणूक एकत्र लढवली होती. मात्र, सर्वच जागांवर भाज
लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाच्या नॅरेटिव्हमुळे भाजप महायुतीला मोठा फटका सहन करावा. या नॅरेटिव्हला ( Fake Narrative ) ‘ब्रेक’ लावण्याची जबाबदारी भाजपने आमदारअमित गोरखे यांच्यावर दिली. त्यांनी राज्यभरात ‘बहुजन संवाद यात्रा’ काढत काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या खोट्या प्रचाराची पोलखोल केली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मतदारांनी सजग होत महायुतीला कौल दिला. जनमत बदलण्यासाठी फायदेशीर ठरलेल्या या यात्रेविषयी आमदार अमित गोरखे यांच्याशी साधलेला विशेष संवाद...
ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात याआधीही मोठा भाऊ असलेल्या भाजपने १८ पैकी नऊ जागा जिंकून ठाणे ( Thane ) जिल्ह्यात पुन्हा एकदा भाजपच मोठा भाऊ असल्याचे सिद्ध केले आहे. २०१९ सालच्या तुलनेत भाजपने एक अतिरिक्त जागा जिंकली असून, एकूण झालेल्या मतदानाच्या ५६ टक्क्यांपैकी २६ टक्के मते भाजपच्या पारड्यात पडली आहेत. तर, जिल्ह्यात २० टक्के मते मिळवून शिवसेना दुसर्या स्थानी आहे.
मुंबई : “भाजप महायुतीने ऐतिहासिक विजय प्राप्त केल्यानंतर येत्या दि. ५ डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी ( Shapathvidhi ) होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आझाद मैदानावर सायंकाळी ५ वाजता भव्य सोहळा होईल,” अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी केली.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने अनेकांनी अपक्ष अर्ज दाखल करुन निवडणूक लढवली. परंतु या अपक्ष उमेदवारांमधून केवळ दोघांनाच निवडणूक जिंकून आमदार होण्याचा मान मिळवता आला. यातलंच एक नाव म्हणजे जुन्नर मतदारसंघाचे विजयी उमेदवार शरद सोनवणे. कोण आहेत शरद सोनवणे? विद्यमान आमदाराची थेट तिसऱ्या क्रमांकावर रवानगी करणारे, तसेच साखर कारखान्याच्या संचालकाला धूळ चारत विजयी मताधिक्य मिळवणारे शरद सोनवणे ( Sharad Sonawane ) नक्की आहेत तरी कोण ? त्यांच्या विजयाची कारणं काय आहेत ? हेच जाणून घेऊया या व्हिडिओतून
ठाणे : लोकसभा निवडणुकीवेळेस हिंदूंमध्ये मतदानाबाबत उदासिनता होती. मात्र, बांगलादेश, सिलीगुडी आणि सिमला येथील हिंदूवरील अन्यायाच्या घटनांनंतर हिंदू ( Hindu ) अस्मिता जागी झाली. हिंदू धर्मियांना आपल्या उदासिनतेबाबत पश्चाताप झाल्यानंतर आधी हरियाणा तर आता महाराष्ट्रात अनुकूल निकाल लागले. तेव्हा, यापुढील निवडणुकांमध्येही हिंदू अस्मितेचे धमाके असेच फुटत राहतील, असे भाकीत ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांनी केले.
ठाणे : शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांची सद्दी असलेल्या ठाणे जिल्ह्यात यापूर्वीही भाजप मोठा भाऊ होता. २०१९ सालच्या तुलनेत भाजपने एक अतिरिक्त जागा जिंकून आताही भारतीय जनता पक्षाने १८ पैकी नऊ जागा जिंकत ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा भाजपच मोठा भाऊ असल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळे भाजपचे ( BJP ) ठाणे करण्यासाठी विभागवार पदाधिकार्यांच्या बैठकांचा धडाका सुरू झाला आहे.
ठाणे : “जितेंद्र आव्हाड ( Jitendra Avhad ) यांना वाटत असेल की, ईव्हीएम मशीन हॅक होते आहे, तर त्यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा देऊन बॅलेट पेपरवर निवडणुकीला सामोरे जावे,” असे खडेबोल राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सुनावले. बॅलेट पेपरवर महाराष्ट्रातील पहिली निवडणूक मुंब्रा-कळवा विधानसभेमध्ये घेऊ. म्हणजे दूध का दूध आणि पानी का पानी होईल, असा टोलाही त्यांनी आव्हाड यांना लगावला.
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या ( Mahayuti ) विजयामागे अनेकांचे सुप्त हात होते, तर काही संघटना, संप्रदाय प्रत्यक्ष मैदानात उतरून धर्मजागरणासाठी प्रचार करत होते. त्यांपैकी वारकरी संप्रदायाने महायुतीच्या विजयामध्ये मोलाची कामगिरी बजावली आहे. साधी राहणी, मुखामध्ये श्री विठ्ठलाचे नाव कोणाच्या आल्यात नाही की गेल्यात नाही, ही वारकरी संप्रदायाची ओळख. मात्र, या निवडणुकीमध्ये वारकरी संप्रदायाचे वेगळेच रुप पाहायला मिळाले.
शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या पराभवाची ५ कारणं
'हे' आहेत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले काही साहित्यिक
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे ( Election ) निकाल जाहीर झाले असून, यंदा केवळ दोन अपक्ष उमेदवारांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा अपक्षांचा बोलबाला असल्याचे यापूर्वीच्या निकालांतून दिसून आले आहे. यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही एकूण २ हजार, ८६ अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात असून, त्यात काही बंडखोरांचादेखील समावेश होता. मात्र, फक्त दोनच अपक्षांना यावेळी विजय मिळवता आला आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेचे निकाल लागले असून त्यामध्ये महायुतीने निर्भेळ यश संपादन केले आहे. लोकसभेतील निवडणुकांमध्ये ‘व्होट जिहाद’चा मुद्दा अग्रणी होता. ठिकठिकाणी मुस्लीम मतदार करत असलेल्या एकगठ्ठा मतदानाचा फटका महायुतीला लोकसभा निवडणुकीत बसला होता. या पार्श्वभूमीवर अनेकदा हिंदुंविरोधात वादग्रस्त विधाने करत मुस्लीम मतदारांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न करणार्या ‘ऑल इंडिया-मजलीस-ए-इतेहाद्दुल-मुसलमिन’ अर्थात ‘एमआयएम’च्या ( MIM ) कामगिरीकडेही लक्ष लागले होते. या निवडणुकीमध्ये मालेगाव मध्य मतदारसंघातून ‘एम
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल ( Result ) निश्चितच सर्वांना अचंबित करणारे ठरले आहेत. भाजपने तब्बल १३७ जागांवर विजय मिळवला आहे. लोकसभेत ज्यापद्धतीने विरोधकांनी ’फेक नॅरेटीव्ह’ तयार करत ’व्होट जिहाद’चा कट रचला, त्याला विधानसभा निवडणुकीत ब्रेक लावत महायुतीने दणदणीत विजय मिळवला. समाजामध्ये विरोधकाकडून तयार होणारे फेक नॅरेटीव्ह रोखण्यात संत समन्वय आणि सहयोगी संघटनांचा महत्वाचा वाटा होता. त्यामुळे हा एकाअर्थी समाजातील सज्जनशक्तीचा विजय म्हणणे वावगे ठरणार नाही.
शिवसेना पक्षफुटीपासून सुरू झालेला संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. गेल्या अडीच वर्षांपासून शिवसेनेचे दोन्ही गट आम्हीच खरी शिवसेना, आमचा पक्ष हाच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष आहे असा दावा करत होते. या वादावर विधानसभा निवडणुकीद्वारे उत्तर मिळेल असे बोलले जात होते. राज्यात ५१ मतदारसंघात शिवसेना (शिंदे) ( Shinde ) विरुद्ध शिवसेना (ठाकरे) असा सामना रंगला.
मुंबई : राज्यात महायुतीला लाडक्या बहिणींनी ओवाळणी म्हणून विजयाची माळ गळ्यात टाकली आहे. महाराष्ट्राचा महाकौल कोणाला मिळणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले होते. महायुती २८८ जागांपैकी २२४ जागांवर महायुतीला कौल मिळाला आहे. महायुतीच्या ( Mahayuti ) दिग्गज उमेदवारांना लाडक्या बहिणींचा आशीवार्द मिळाला आहे. तेच दुसऱ्या बाजुला महाविकास आघाडीचा खेळ केवळ ५४ जागांवर आटोपला आहे. इतर आणि अपक्ष मिळून १० जागा आहेत. बुधवार दि. २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी संपुर्ण महाराष्ट्र राज्यात मतदान झाले असून शनिवार
ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार, दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. ठाणे जिल्ह्यात १८ विधानसभा मतदारसंघात एकूण ५६.०५ टक्के मतदान झाले. २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात जेमतेम ५० टक्के मतदान झाले होते. त्यामुळे या खेपेला वाढता टक्का भाजप महायुतीच्या ( Mahayuti ) पथ्यावर पडणार असल्याचा अंदाज राजकीय धुरीण व्यक्त करीत आहेत.
डोंबिवली : गत निवडणुकीपेक्षा यंदा विधानसभा निवडणुकीत मतदानात थोडी थोडकी नव्हे, तर तब्बल १५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. मतदानाचा ( Dombivli Voting ) वाढलेला टक्का हा महायुतीच्या पथ्यावर पडणार आहे, अशी चर्चा शहरात जागोजागी सुरू झाली आहे.
ठाणे : यंदाची विधानसभा सार्वत्रिक निवडणूक ( Election ) टेक्नोलॉजीमुळे सुलभ बनली आहे. २० नोव्हे.रोजी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत २८ ॲप्ससह माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने ही निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. याकरिता राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राचे जिल्हा सूचना अधिकारी नरेंद्र भामरे व त्यांच्या सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले.
मुंबई : बहुचर्चित महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा जवळ आला आहे. बुधवार, दि. २० नोव्हेंबर रोजी राज्यभरात एकाच टप्प्यात मतदानप्रक्रिया ( Voting ) पार पडणार असून, २८८ मतदारसंघातील ४ हजार, १३६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. तुष्टीकरणाचे राजकारण करून महाराष्ट्राची घडी विस्कटण्याचा प्रयत्न करणार्यांना धडा शिकवण्याची संधी.
नवी मुंबई : १५१-बेलापूर मतदारसंघातील नेरुळ सेक्टर-१२ मधील तेरणा मेडिकल कॉलेजमधील मतदान केंद्रामध्ये विशेष सांस्कृतिक झोन तयार करण्यात आला आहे. या मतदान केंद्रामध्ये आगरी-कोळी ( Agari-Koli ) समाजाचा पारंपरिक व्यवसाय दर्शविणारा देखावा ठेवण्यात आला आहे. या मतदान केंद्रामध्ये शाळकरी मुले स्थानिक आगरी कोळींची वेशभूषा करून मतदारांचे स्वागत करणार आहेत. बुधवार, दि. २० नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभा निवडणुकीकरिता मतदान होणार आहे.
मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात आज दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०७.०० वाजेपासून सुरुवात झाली. मुंबई शहर ( Voting in mumbai ) जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात दुपारी ०१.०० वाजेपर्यंत अंदाजे २७.७३ टक्के मतदान झाले आहे.
ठाणे : विधानसभा निवडणुकीसाठी एकमेकांसमोर उभे ठाकलेल्या महायुती आणि महाविकास आघाडीच्या लढाईत या खेपेला मनसेही रिंगणात असल्याने चुरस निर्माण झाली आहे. ठाणे ( Thane ) महापालिका क्षेत्रात येणाऱ्या ठाणे शहर, कोपरी - पाचपाखाडी, ओवळा - माजिवडा आणि मुंब्रा कळवा या चार विधानसभा क्षेत्रात बुधवारी (ता.२० नोव्हे.) मतदानाला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शहरातील सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे मतदारांमध्ये उत्साह
ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता सर्व राजकीय पक्षांनी बाईक रॅली ( Bike Rally ) काढून केली. ठाण्यातील चार बालेकिल्ले सर करण्यासाठी सोमवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी महायुती आणि मविआमध्ये चांगलीच चुरस रंगल्याचे पाहावयास मिळाले. बाईक रॅलीसाठी उभय युती-आघाडीच्या उमेदवारांनी जातीने हजर राहून दुचाकीवर स्वार होत मतदारांना आवाहन केले. बाईक रॅलीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सौभाग्यवती मोटारीत बसून सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, या बाईक रॅलीमुळे सोमवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी जागोजागी वाहतूक कोंडी झाली
मिरा-भाईंदर : निवडणुकीच्या प्रचाराच्या धावपळीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी अनोख्या पद्धतीने मतदारांना साद घातली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मिरा-भाईंदरच्या मतदारांना एका व्हिडियो क्लिपद्वारे भाजप महायुतीचे उमेदवार नरेंद्र मेहता यांना मतदान करून विजयी करण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई : महाविकास आघाडी ( MVA ) सरकारने अडीच वर्षांत राज्यातील ८ लाख, ८९ हजार, १०५ कोटींच्या कामांमध्ये स्पीडब्रेकर लावला होता. ‘मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन’, ‘जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प’, ‘बारसू रिफायनरी’, ‘वाढवण बंदर’, ‘धारावी पुनर्विकास’, ‘गारगाई धरण’, ‘मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क’ अशा प्रकल्पांना स्थगिती दिली. यामुळे जवळपास १४ लाख रोजगार बुडाले आणि दिरंगाईमुळे प्रकल्प खर्चात १५ हजार, २०० कोटींची वाढ झाली, असा निशाणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर साधला. विधानसभा निवडणूक प्रचार सांगतेपूर्वी बाळासाहे
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या असताना आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून नियमभंग केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी मुंबई भाजपा सचिव प्रतिक कर्पे यांनी आदित्य ठाकरेंच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे लेखी स्वरूपात तक्रार केली आहे. आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांनी निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे त्यामुळे त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीला अवघे काही दिवस उरलेले असताना, सज्जाद नोमानी ( Sajjad Nomani ) याने मविआ समोर प्रस्ताव मांडला आहे, नेमकं प्रकरण काय आहे हे जाणून घेऊया आज या व्हिडीओच्या माध्यमातून
मुंबई : मी महाराष्ट्रभर दौरे करत आहे. त्यामुळे मला राज्यभरातून सकारात्मकता जाणवत आहे. विशेषत: महिला मतदारांमध्ये अधिक दिसत आहे. पूर्वी आमच्या सभांना ७० टक्के पुरुष असायचे आणि महिला कमी असायचा. पण, आता महिलाही जवळपास ५० टक्के दिसून येत आहेत. ही निवडणूक मोठी लढाई आहे. पण, आम्ही बहुमताने सरकार बनवू, असा विश्वास भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधला...
कोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुराकुमारा दिसानायके ( Anurakumara Disanayke ) यांच्या ‘नॅशनल पीपल्स पॉवर’ (एनपीपी) पक्षाला श्रीलंकेत सुगीचे दिवस आले आहेत. श्रीलंकेत नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत तीन जागांवरून थेट १२३ जागांवर दणदणीत विजय मिळवल्याने ‘एनपीपी’चा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. दीर्घकाळ आर्थिक आणीबाणीचा सामना करणार्या श्रीलंकेला प्रगतीकडे नेण्यासाठी ज्यांनी भ्रष्टाचार केला, त्या सर्वांवर कठोर कारवाईचे आणि गैरवापर झालेली श्रीलंकेची संपत्ती परत घेण्याचे आश्वासन मतदारांना देणार्या
नाशिक : कामगारांची वस्ती असलेल्या नाशिक पश्चिम मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व गेल्या दहा वर्षांपासून सीमा हिरे ( Seema Hire ) करत आहे. मतदारसंघात असणार्या सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न भाजप आमदार हिरे यांनी आपल्या कार्यकाळात केला. गेल्या दहा वर्षांत केलेल्या विकासकामांच्या बळावर आपण नाशिक पश्चिम मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे जात आहोत. विकासकामांच्या बळावरच यंदा नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये तिसर्यांदा कमळ फुलणार, असा विश्वास आमदार सीमा हिरे यांनी दै. ‘मुंबई तरूण भारत’शी बातचित करताना व्यक्त केला.
नवी दिल्ली : महाराष्ट्रात महायुतीची ( Mahayuti ) सत्ता यावी आणि महायुतीचे सरकार पाच वर्ष चालावे, अशीच महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले आहे.
ठाणे : बुधवार, २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान ( Voting ) होत आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व मतदान केंद्र आणि परिसरात सर्वंकष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत, शनिवारी, कळवा, मुंब्रा आणि दिवा या प्रभागातील सर्व मतदान केंद्रे, १०० मीटरचा परिसर, नजिकची सार्वजनिक शौचालये, पदपथ, मतदान केंद्राकडे येणारे रस्ते, चौक, दुभाजक यांची साफसफाई करण्यात आली. यावेळी मतदान करण्याची शपथही घेण्यात आली.