नुकतेच वर्धा येथे ९६ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडले. अनेक माध्यमांतून संमेलनावर टीका झाली. कार्यक्रम आणि आयोजनावर आसूड ओढले गेले. संमेलनाच्या संपरोपच्या अध्यक्षीय भाषणात नरेंद्र चपळगावकर यांनी आयोजकांकडून आणि रसिकांकडून आपल्याला भरपूर प्रेम मिळाले असे संगितले होते, मात्र एकंदर सूर निराळा असल्याचे व चपळगावकरांचा अवमान झाल्याचे सायली राजाध्यक्ष यांच्या पोस्ट मधून दिसून येते. त्यांनी यावेळी आयोजकांसोबतच मुख्यमंत्री आणि पत्रकारांनीही संमेलनालाआवश्यकता नसल्याचे म्हंटले आहे. संमेलनात अध्यक्षांच्या जेवणाच
Read More
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांनी ४ फेब्रुवारी रोजी वर्ध्यात होणाऱ्या विद्रोही साहित्य संमेलनाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत डॉ. अभय बंग सुद्धा उपस्थित होते. विद्रोही संमेलन हे अकील भारतीय साहित्य संमेलनाचा निषेध करण्यासाठी होते हे सर्वश्रुत आहेच. अशावेळी संमेलनाध्यक्षयांनी विद्रोही संमेलनाच्या मंडपात जाऊन काही वेळ थांबून येणे सर्वांसाठीच आश्चर्यकारक बातमी होती.
वर्धा येथे होणाऱ्या ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी या महिन्यात होणाऱ्या इतर साहित्य संमेलनांबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. दैनिक मुंबई तरुण भारतला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी जिल्हा पातळीवर अशी अनेक संमेलने भरावीत अशीही इच्छा व्यक्त केली आहे.
वर्धा येथे होणाऱ्या ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी या महिन्यात होणाऱ्या इतर साहित्य संमेलनांबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. दैनिक मुंबई तरुण भारतला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ललित गद्य आणि वैचारिक वाङ्मयावर आपली मते मांडली आहेत.
दि. ३ फेब्रुवारीपासून ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास सुरुवात होत आहे. यावर्षी हे संमेलन वर्धा येथील स्वावलंबी शाळेच्या मैदानात आयोजित करण्यात आलेले आहे. ३ ते ५ फेब्रुवारीपर्यंत होणाऱ्या ३ दिवशीय साहित्य संमेलनासाठी साहित्त्यिक व माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर हे संमेलनाध्यक्ष म्हणून लाभले आहेत.
नरेंद्र चपळगावकर यांची ही सर्व लेखन कारकिर्द फार मोठ्या इतिहासाचा एक दीर्घ पट मांडते, त्यावर वर्तमानाची अक्षरं कोरते आणि भविष्याचे मोठे संचित सांभाळून ठेवते. ओघवती भाषा, सरळ निवेदन शैली, व्यक्तिचित्रणातले बारकावे आणि घटना-प्रसंगांचे विश्लेषण करण्याची न्यायबुद्धी या सार्या गुणवैशिष्ट्यांमुळे त्यांचे लेखन एक लखलखीत विचार वैभव म्हणून मराठी साहित्यात मानाचे पान आहे.
नरेंद्र चपळगावकर... त्या नावाआधी तुम्ही वकील, न्यायमूर्ती, विचारवंत, लेखक, भाऊ, मित्र, काका, बाबा, आजोबा आणि मग साहेब यातलं हवं ते लावू शकता. यातलं सगळं ते मनसोक्त जगले आहेत...
वर्धा येथे दि. 3 ते 5 फेब्रुवारी, 2023 या कालावधीत आयोजित 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी वर्धा येथे मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत संभाजीनगर येथील माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
न्यायविषयक व साहित्यविषयक कामगिरीवरून न्या. नरेंद्र चपळगावकर यांना अनेक पुरस्कारही मिळाले. तसेच ते विभागस्तरावरील अनेक साहित्य संमेलनाचेही अध्यक्ष राहिलेले आहेत. आता 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी त्यांची निवड झाली, ते नक्कीच आनंददायक!