कबड्डीची आवड, मात्र आर्थिक परिस्थिती आणि कौटुंबिक पाठबळ न मिळाल्याने, त्यांची संधी हुकली. पण, तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही. अशा या शासकीय सेवेत आपल्या कर्तृत्वातून महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय गिरविणार्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्याविषयी...
Read More
स्वार्थ बाजूला ठेवून दीनदुबळे, गोरगरिबांना मदतीचा हात देणारे अनेक थोर समाजसेवक आपण आतापर्यंत पाहिले. याच समाजसेवेच्या संस्कारांडे बाळकडू आज लोकप्रतिनिधी म्हणून नावारूपाला आलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मा. नगरसेविका खुशबू पद्माकर चौधरी यांना लहानपणापासूनच त्यांच्या वडिलांकडून मिळाले. समाजकार्यात आघाडीवर असलेल्या चौधरींना माजी मंत्री आणि भाजपचे नेते रविंद्र चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आजच्या ‘जागतिक महिला दिना’निमित्त राजकारणात असूनही, समाजकार्यातून आपल्या कर्तृत्वाची छाप उमटविणार्या खुश
मुंबई : कल्याण डोंबिवली शहरासाठी अमृत योजनेअंतर्गत ३५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी मान्यता दिली आहे. यामुळे कल्याण डोंबिवली शहरासह नव्याने समाविष्ट २७ गावांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी मदत होणार आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. या योजनेला मान्यता मिळाल्याने उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी सर्वच पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ता निवडणूकीसाठी आपण इच्छुक असल्याचे खुलेपणाने सांगत आहेत. मात्र याला शरद पवार गट अपवाद आहे. शरद पवार गटातही अनेकजण पक्षाकडून उमेदवारीचे तिकीट मिळावे यासाठी इच्छुक आहेत. मात्र त्याबाबत त्यांच्याकडून खुलेपणाने कोणतेच वक्तव्य केले जात नाही. एकूणच विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीदेखील मौन बाळगले आहे. इच्छुकांची नावे बाहेर आली तर फाटाफूट होईल या भितीमुळे मौन बाळगल्याची चर्चा आहे.
श्वान निर्बीजीकरणावर कल्याण-डोंबिवली महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र, तरीही शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. गेल्या तीन वर्षांत (मे २०२३ पर्यंत) भटक्या श्वानांनी ४८ हजार, १४ जणांचा चावा घेतला आहे. शहरातील वाढत्या भटक्या श्वानांची दहशत पाहता निर्बीजीकरणावर केला जाणारा खर्च याविषयी साशंकता निर्माण होत आहे. निर्बीजीकरणावर एवढा खर्च केला जात असला तरी शहरातील भटक्या कुत्र्यांची दहशत अजिबात कमी झालेली नाही.
डोंबिवली : डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल हा अपघाताचा ‘हॉटस्पॉट’ होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या पादचारीपुलाच्या पूर्वेकडील बाजूला मोठ्या प्रमाणावर व्यावसायिकांनी गर्दी केली आहे, तर पश्चिमेकडील बाजूच्या टोकाला उतार आहे. विशेष म्हणजे, येथे एक शाळा असल्याने येथे विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. वाहतूक नियंत्रण विभाग याकडे कानाडोळा करीत आहे. वाहनचालक जीव मुठीत घेऊन या पादचारी पुलावरून ये-जा करीत असतात. यावर कडोंमपा प्रशासनाने वेळीच योग्य पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून केली जा
सध्या सर्वत्र कोरोनाचे सावट सुरू आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिकेने आरोग्य सुविधांवर भर देणारा यंदाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यंदाच्या वर्षी जमेची १७०० कोटी रुपयांची बाजू अपेक्षित धरून १६९९ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आज 25 महापालिकांमध्ये लसीकरणाचा ड्राय रन (रंगीत तालीम) घेण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून कल्याण-डोंबिवली मध्ये ही दोन ठिकाणी रंगीत तालीम घेण्यात आली.
‘दै. मुंबई तरुण भारत’च्या बहुचर्चित ‘कोविड योद्धा १२५' या विशेषांकाचे प्रकाशन कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते गुरुवारी, दि. १७ डिसेंबर रोजी त्यांच्या कार्यालयात करण्यात आले. यावेळी उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र वारे, ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य श्याम पाटील तसेच ‘दै. मुंबई तरुण भारत’चे प्रतिनिधी सुधीर लवांडे उपस्थित होते. प्रकाशनानंतर आ.गणपत गायकवाड यांनी या सर्व ‘कोविड योद्ध्यां’चे तसेच हा अंक साकारणार्या ‘दै. मुंबई तरुण भारत’च्या टीमचेही कौतुक केले.
कल्याण खंबाळापाडा रोडवरील डोंबिवली एमआयडीसीत असलेल्या शक्ती प्रोसेस या टेक्सटाईल कंपनीला आज सायंकाळी भीषण आग लागली.या आगीत कंपनीतील कच्चा माल जळून खाक झाला आहे. आग विझविण्याचे अग्नीशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. आग रात्री उशिरार्पयत नियंत्रणात आली नव्हती. शक्ती प्रोसेस ही टेक्साटाईल कंपनी बंद आहे. या कंपनीत देखभाल दुरुस्तीचे काम काही कामगार करीत होते.
कल्याण-डोंबिवली महापालिकेतून १८ गावांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला जोरदार टोला
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील वरिष्ठ सुरक्षारक्षक पदावर कार्यरत असणारे सुरेश पवार यांनी उत्तम कलावंतापासून लेखक, दिग्दर्शक आणि नेपथ्यकार अशा विविध भूमिका फुलविल्या आहेत. त्यांचा हा व्यक्तिवेध...
कल्याण डोंबिवलीतील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर असतानाच गुरुवारी पहाटे डोंबिवलीच्या कोपर रोड भागात 2 मजली धोकादायक इमारतीचा भलामोठा भाग कोसळला. आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून रात्री उशिरापर्यंत टिव्ही पाहत असणाऱ्या व्यक्तीमुळे इमारतीतील लोकांचा अगदी थोडक्यात जीव बचावला.
डोंबिवलीमध्ये ५ वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून शुक्रवारी कल्याण डोंबिवलीत नवे ६ रुग्ण आढळल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या ४९ झाली आहे. ज्यामध्ये एका ५ वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. आज आढळलेल्या ६ रुग्णांपैकी ५ रुग्ण हे डोंबिवली पूर्वेतील आणि १ रुग्ण कल्याण पूर्वेतील आहे.
परिवहन विभागाकडून चार टक्के भाडेवाढ
डोंबिवलीकरांसाठी वाहतूककोंडीचा प्रश्न सुटतो न् सुटतो तोवर त्यांच्या जीवाला घोर लावलाय तो बेकायदेशीर भाडेवाढीने
राज्य सरकारने प्लास्टिकबंदीचा अध्यादेश दोन महिन्यांपूर्वी जारी केला. त्यानुसार ही बंदी लागू करण्यात आली. याबाबत पालिका जनजागृती साधणारे उपक्रम राबवत असली तरी त्याची माहिती व्यापकपणे लोकांपर्यंत पोहचलेली नाही.
स्वच्छतेच्या व शहर सौंदर्याच्या उद्देशालाच हरताळ फासण्याचे काम नागरिकांनी केले
वडवली रेल्वे फाटकात डंपर बंद पडल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम