मिझराही ज्यूंची नवी पिढी आता खुद्द इस्रायलमध्ये उम्म कुलथूमसकट इतरही अरबी गाणी अगदी मोठ्ठा आवाज ठेवून बिनधास्तपणे ऐकते. त्यांची अशीही तक्रार आहे की, इस्रायली जीवनात युरोपीय देशांमधले ज्यू जरा जास्तच पुढे-पुढे करतात आणि आम्ही अरबी देशांमधून आलेल्या ज्यूंना चेपायला बघतात. तीन मिझराही ज्यू गायिका बहिणींनी अरबी गाण्यांचा एक अल्बम प्रसिद्ध केला. तो कमालीचा लोकप्रिय ठरला आहे. जेरूसलेमच्या एका अध्ययन संस्थेतली विदूषी लील मेगहन म्हणते, “इस्रायली संस्कृतीचं अरबीकरण होत आहे.” किस्मत जब पलटती हैं, तब यूँ पलटती हैं!
Read More
भारतात ज्यू लोक आहेत; युरोपातल्या विविध देशांंमध्ये ज्यू लोक होते. तिथून ते वेळोवेळी अमेरिकेत स्थलांतरित झाले, हे सगळं आपल्याला साधारण माहिती असतं. पण, चीनमध्येसुद्धा ज्यू लोक होते?
गेल्या काही दिवसांपासून इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या पुरातन संघर्षाची ठिणकी पुन्हा एकदा पेटली आहे. त्यामुळे केवळ इस्रायल-पॅलेस्टाईनच नाही, तर संपूर्ण मध्य पूर्व आशियेत युद्धाचे ढग पसरलेले दिसतात. तेव्हा, इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि आजची युद्धसदृश परिस्थिती याचा सविस्तर आढावा घेणारा हा अभ्यासपूर्ण लेख...
इस्त्रायलमध्येही महाराष्ट्राचा डंका घुमत असल्याने आपल्या राज्यासाठी ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. इस्त्रायलमध्ये मराठी भाषेचे वर्ग चालविले जात असून तेथील नागरिकांना मराठी भाषा शिकता यावी, यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घेतला असल्याचे दिसून येत आहे.
झुरळ दिसल्यासारखे ‘हिटलर’ ‘हिटलर’ ओरडून काही साध्य होणार नाही. त्यातून नवनाझीवादासारख्या आव्हानांचा सामना करणे शक्यच नाही. निवडणुकीपुरते व्यक्तीच्या प्रतिमाभंजनाचे कार्यक्रम नक्की चालू शकतील, पण त्यातून समाजावर येणारे संकट दूर होणे अशक्य!
ज्युईश आस्था-श्रद्धा-निष्ठेनुसार एकूण 13 तत्त्वं आणि सूत्रांचा स्वीकार आणि त्याचे दैनंदिन जीवनात पालन करणे आवश्यक आहे. गंमत म्हणजे ‘धर्म’ या विषयावर आपल्या देशात डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या समाजात जशी मत-मतांतरे असतात, अगदी तसेच इस्रायल या देशांतील ज्यूधर्मीय समाजात होत असते. या धर्मप्रणालीत ‘देव’ म्हणजे या ‘जगाचा निर्माता’ ही प्राथमिक संकल्पना आहे.
आपल्या वडिलांच्या शोधार्थ लिंडा यांनी केलेला संघर्ष, ज्यू म्हणून इराकमध्ये सहन केलेल्या हाल-अपेष्टा यावर प्रकाश टाकणारी ही विशेष मुलाखत...