भटके विमुक्त समाजाला जात प्रमाणपत्र, आधारकार्ड, रेशनिंगकार्डसह विविध दाखले देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
Read More
रामटेक लोकसभा मतदारसंघातुनही महायुतीकडुन शिवसेनेचे राजु पारवे तर महाविकास आघाडीकडुन काँग्रेसच्या रश्मी बर्वे Rashmi Barve यांनी अर्ज दाखल केला आहे. रश्मी बर्वे यांचे जातपडताळणी प्रमाणपत्र रद्द झाल्याची माहीती आहे. त्यामुळे आता त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द केला जाण्याची श्यक्यता आहे.
गेले अनेक दिवस महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचे वादळ सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जालन्याच्या अंतरवली सरटी गावात आंदोलक उपोषणाला बसले होते. यावेळी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. यावर निर्णय घेण्यासाठी सरकारने उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती नेमली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभरात जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती येथे नागरिकांची झुंबड उडालेली आहे. जात पडताळणीच्या अर्जाचे प्रमाण वाढल्याने ऑनलाईन प्रक्रिया मंदावली आहे.
धीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मराठा समाजासाठी १६ टक्के आरक्षणाचा कायदा करण्यात आला. यानंतर आता पुढील प्रक्रियेला वेग आला असून मराठा जात प्रमाणपत्र वाटपास सुरूवात करण्यात आली आहे.
शनिवारी राज्य सरकारने जारी केले प्रमाणपत्राचे नमुने.
शिवसेनेच्या जेष्ठ नगरसेविका, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माजी महापौर वैजयंती घोलप यांचे जात प्रमाणपत्र ठाणे जात पडताळणी समितीने अवैध ठरवले आहे.
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने आपली क्रियाशिलता दाखवत गत सहा महिन्यात धडक मोहिम राबवित १६ हजार १७३ प्रकरणांपैकी तब्बल १४ हजार ७३० प्रकरणे निकाली काढली आहेत.