प्रतिमा आणि प्रतिसृष्टी या दोन गोष्टींचे वेड माणसाला अनंत काळापासून असावे. काळाच्या ओघात जन्माला आलेली मिथके, दंतकथा हे याच प्रतिसृष्टीचे द्योतक असल्याचे दिसते. प्रख्यात लेखक युवल नोआह हरारी म्हणतो की, माणूस गोष्टींमध्ये विचार करतो आणि याच गोष्टींच्या साहाय्याने आपल्या सभोवताली असलेल्या जगाचा अन्वयार्थ लावतो. विविध कलाविष्कार, अभिव्यक्तीचे भिन्न भिन्न प्रकार हे याच अन्वयार्थाचे रूप असते. वर्तमानातही प्रतिसृष्टी उभारणे तंत्रज्ञानामुळे सोपे झाले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून, आपल्या मनातले अवकाश आपल्यास
Read More
कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग होत चालला आहे, यावर दुमत असायचे कारण नाही. देश विदेशातील बाजारपेठांपासून ते कामाच्या ठिकाणांपर्यंत वेगाने होणारे बदल आत्मसात करत, माणूस आपल्या भविष्याचा पाया रचतो. दुसर्या बाजूला प्रगत तंत्रज्ञानाबद्दलच्या अज्ञानामुळे साशंकता आणि भीती या दोन भावना, प्रामुख्याने लोकांच्या मनात घर करतात. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयाचा विचार करत असतानाच, आपसूकच हे तंत्रज्ञान कोणत्या क्षेत्रात माणसांची जागा घेईल, हा विचार सर्वप्रथम केला जातो. या बद्दलची चिंता आणि चिंतन स्वाभ
भारतातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात जपानच्या कौशल्याचा वापर करून भारत 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी स्वत:च्या तांत्रिक आणि भौतिक संसाधनांचा अधिकाधिक वापर करत आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी स्टील पूल हे या प्रयत्नाचे मोठे उदाहरण आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने चार रेल्वे रुळांवर 'मेड इन इंडिया' स्टील पुलांचे गर्डर यशस्वीरीत्या लॉन्च केले. मुंबई ते अहमदाबाद अशा ५०८ किलोमीटर हायस्पीड मार्गासाठी सध्या महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात काम सुरु आहे.
प्रयागराज येथे महाकुंभात सहभागी होण्यासाठी देश-विदेशातून मोठ्यासंख्येने भाविक आले आहेत. महाकुंभाच्या पहिल्या दिवशी सकाळी ११ वाजेपर्यंत साधारण ८० लाख हून अधिक भाविकांनी स्नान केले. विदेशी पर्यटकही याठिकाणी सहभागी झाले होते. महाकुंभाच्या दृष्टिकोनातून मकर संक्रांती हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असून विविध आखाड्यातील साधूसंत या दिवशी पहिले अमृतस्नान करतील. तरी काही विदेशी पर्यटकांमध्ये पहिल्या दिवसापासूनच उत्साह निर्माण झाल्याचे दिसते आहे. mahakumbh mela devotees from Other Countries
जन्मदरातील अभूतपूर्व घट कमी करण्यासाठी जपान सरकार निरनिराळे मार्ग अवलंबताना दिसते. तरुणांना कुटुंबनिर्मितीसाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जपान सरकारचे आता आपल्या कर्मचार्यांकरिता ‘चार दिवसांचा कार्य आठवडा’ लागू करण्याचा मानस असल्याचे समोर आले आहे.
जगभरात प्रतिष्ठेचा मानला जाणारा नोबेल शांतता पुरस्कार या वर्षी जपानच्या निहोन हिदांक्यो संघटनेला दिला जाणार आहे.
जपान सरकारने ज्या अविवाहित महिला शहर सोडून गावी स्थायिक झाल्या, त्यांना ७० हजार डॉलर म्हणजे ५.८७ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने जपानच्या ग्रामीण भागातील महिला शहरात दाखल होतात. मात्र, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीसाठी त्या शहरातच स्थायिक होतात. त्या गावी परतत नाहीत. त्यामुळे शहरातील अविवाहित महिलांची संख्या वाढली आहे, तर दुसरीकडे गावातल्या आणि आजूबाजूच्या गावातल्या मुलीच शहरात गेल्याने ग्रामीण भागात अविवाहित पुरुषांची संख्या वाढली. तेव्हा, शहरातील या मूळच्या गावकडच्या
जपानमधील विद्यार्थ्यांना मराठी भाषा समजावी, तिथे मराठी भाषेचा प्रचार व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाने ३१ जानेवारी २०२४ जपानमधील ‘एदोगावा इंडिया कल्चरल सेंटर’ व ‘टोक्यो मराठी मंडळ’ यांच्याशी सामंजस्य करार केला होता
मुंबईकर लवकरच 'आरे ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स'पर्यंत शहराच्या पहिल्या भूमिगत मेट्रो प्रणालीमध्ये प्रवास करू शकतील. कारण मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या योजनेनुसार या मार्गावरील पहिल्या टप्प्यातील व्यावसायिक ऑपरेशन्स जुलैपर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे. याच पार्श्वभूमीवर जपानचे मुंबईतील महावाणिज्यदूत यागी कोजी-सान यांच्या शिष्टमंडळाने सोमवार, दि.२७ रोजी हुतात्मा चौक मेट्रो स्थानकाला भेट दिली. यावेळी त्यांनी एमएमआरसीद्वारे करण्यात आलेल्या कामाचे कौतुक केले आणि पहिला टप्पा सुरू करण्यासाठी शुभेच्छा
भारताच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या सुखकर प्रवासासाठी आता जपानी औद्योगिक दिग्गज कंपनी हिताची आणि कावासाकी यांनी अत्याधुनिक शिंकनसेन ट्रेन सेट पुरवण्यासाठी एका कॉन्सोर्टियमची स्थापना केली आहे. भारतीय रेल्वे अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली की, भारतातील हवामानाला मिळतेजुळते आणि संचलन गरजा पूर्ण करण्यासाठी ट्रेनचे डिझाइन तयार करण्यासाठी या कॉन्सोर्टियममध्ये चर्चा सुरू आहे.
जपान देशाच्या जपान मिंट (टांकसाळी) या प्रशासकीय संस्थेतर्फे आयोजित 'आंतरराष्ट्रीय नाणे संकल्पना 2023' स्पर्धेत 'कोकणातली अश्मयुगीन कातळशिल्प' या विषयावर आधारित नाणे डिझाईन सादर करणारे शिल्पकार मुकेश पुरो यांना 'फाईन मास्टर आर्टिस्ट' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर त्यांनी सादर केलेल्या कलाकृतीला 'फाईन आर्ट' म्हणून गौरविण्यात आले आहे. विशेष म्हणजे मुकेश पुरो यांनी कातळशिल्पांची छबी रत्नागिरीची अजून एक खास परिचित ओळख असलेल्या हापूस आंब्याच्या पार्श्र्वभूमीवर साकारली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या नवभारताची निर्मिती करु इच्छित आहेत, त्या भारताकडे जाण्याचा रस्ताच महाराष्ट्रातून जातो, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांना जपानच्या 'कोयासन विद्यापीठा'तर्फे मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे. मंगळवारी मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात हा सोहळा पार पडला. पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले कार्य यासाठी ही मानद डॉक्टरे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानच्या 'कोयासन विद्यापीठा'तर्फे मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे. मंगळवारी मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात हा सोहळा पार पडला. यावेळी जपानचे मुंबईतील महावाणिज्यदूत डॉ. फुकाहोरी यासुकाता यांचे संपुर्ण भाषण..
भारताने चांद्रयान-३ मोहिम यशस्वीरित्या पूर्ण केली असून आता चांद्रयान-४ चे वेध लागले आहेत. परंतू, या मोहिमेमध्ये भारत आपल्या मित्र देशाची मदत घेणार आहे. जपान एरोस्पेस एक्सप्लोरोशन एजन्सी (JAXA) च्या सोबतीने चांद्रयान-४ मोहिम राबवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
चीनचे संरक्षणमंत्री ली शेंगफू बेपत्ता झाले असल्याचे बोलले जात आहे. 29 ऑगस्ट रोजी बीजिंगमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात त्यांना शेवटचे बघितल्याचे सांगण्यात येत आहे. तेव्हापासून ते बेपत्ता असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दरवर्षी पावसाळ्यात मुंबईकरांना साचणाऱ्या पाण्याचा आणि रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. परंतू, आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साचणाऱ्या पाण्यावर उपाय शोधला असल्याचे सांगितले आहे.
केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने जानेवारी ते मार्च या तिमाहीच्या 'विकासदरा'चे आकडेवारी जाहीर केले आहेत. या आकडेवारीनुसार भारताचा 'विकासदर'६.१ टक्क्याने वाढला आहे.
नुकताच जपानमधील एका मंदिरात अल्ला हा एकमेव ईश्वर असल्याचा दावा करीत एका धर्मांधाने अक्षरश: धुडगूस घातला. यानिमित्ताने पुन्हा एकदा जपानसारख्या प्राचीन संस्कृती-परंपरा अद्याप जोपासणार्या देशातही इस्लामी कट्टरपंथीयांनी शिरकाव केल्याचे अधोरेखित होते. त्यामुळे युरोपीय देशांप्रमाणे आता जपानमधील वाढते इस्लामीकरण हा चिंतेचा विषय ठरला असून, हे धोक्याचे संकेत जपानसह बिगर-मुस्लीम देशांनी वेळीच ओळखण्याची गरज आहे.
पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतातील अशा विचारवंतांपैकी एक आहेत, ज्यांनी ‘विचारांचे स्वराज’ - म्हणजेच ‘भारतीय मनाचे उपनिवेशीकरण’ हा विचार मांडला. भारत राजकीयदृष्ट्या स्वतंत्र झाला आहे. पण, वैचारिकदृष्ट्या अजूनही वसाहतवादी मानसिकता मोठ्या प्रमाणात रुजू आहे. तेव्हा, नवीन संसद भवनाचे होणारे राष्ट्रार्पण आणि ‘भारत काय विचार करतो, याकडे जगाचे लक्ष आहे,’ या पंतप्रधान मोदींच्या विधानाचा एकात्म मानवदर्शनाच्या माध्यमातून मांडलेला हा विचार...
नवी दिल्ली : आव्हानांनाच आव्हान देणे हा माझा स्वभाव आहे. संपूर्ण जग आज भारताकडे आशेने पाहत आहे. त्यामुळे त्यांचा आशा पूर्ण करण्याचे आव्हान भारताने स्विकारले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले. जपान, पापुआ न्यूगिनी आणि ऑस्ट्रेलिया दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरुवारी मायदेशी आगमन झाले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी भाजपतर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जी-७ शिखर परिषदेनिमित्त जपान दौऱ्यावर आहेत. यावेळी हिरोशिमा येथे प्रसिद्ध जपानी लेखक डॉ. टॉमीओ मिझोकामी यांनी नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. मिझोकामी हे भारतीय भाषांचे चाहते तसेच जाणकार आहेत. त्यांचे हिंदी व पंजाबी भाषांवर प्रभुत्व आहे. यावेळी त्यांनी पुढील हिंदी साहित्य संमेलन जपान मध्ये भरवण्याविषयी मोदींना विनंती केली.
एक वर्ष उलटूनही रशिया-युक्रेन युद्ध शमलेलं नाही. या दोन्ही देशांव्यतिरिक्त जगातील अन्य भूभागही या युद्धामुळे प्रभावित झाले आहे. या युद्धाची झळ आशियाई देशांनाही बसतेय. चीन रशियाशी जवळीक साधतोय. भारत अमेरिका आणि युरोपच्या नाराजीनंतरही रशियाकडून तेल खरेदी करतोय. तिकडे जपानही जुने मतभेद विसरून दक्षिण कोरियासोबत मैत्रीपूर्ण संबंध आणखी मजबूत करण्यावर भर देतोय.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ७, क्वाडसह अन्य बहुपक्षीय शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी जपान, पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलियाच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी ४० हून अधिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे शिखर परिषदेत द्विपक्षीय बैठकांसह अनेक जागतिक नेत्यांशी संवाद साधणार आहेत.
वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी वृक्षलागवडीचा पर्याय हा कधीही फायदेशीर. परंतु, मुंबईसारख्या फारसे मोकळे भूखंड नसलेल्या शहरात वृक्षलागवडीलाही मर्यादा येतात. त्यावरच उपाय म्हणून काही वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने मियावाकी वनांच्या उभारणीला वेग दिला. तेव्हा, या मियावाकी वनांचे फायदे व मुंबईतील या वनांची सद्यस्थिती याचा आढावा घेणारा हा लेख...
चतुर्भुज सुरक्षा संवाद’ म्हणजेच ’क्वाड’ हा ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि युनायटेड स्टेट्स या चार राष्ट्रांतील धोरणात्मक सुरक्षा संवाद आहे, जो सदस्य देशांतील चर्चेद्वारे राखला जातो. या क्वाडची स्थापना २००७ मध्ये करण्यात आली. व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी करीन जीन-पियरे यांनी आपल्या एका दैनंदिन पत्रकार परिषदेत क्वाडमध्ये नवीन सदस्य जोडण्याची कोणतीही योजना झाली नसल्याचे सांगितले.
नवी दिल्ली : जपानमधील वाकायामा शहरात जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या भाषणादरम्यान एका अज्ञात व्यक्तीने पाईप सारखी वस्तू फेकली. या पाईपबॉम्बद्वारे त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे.
मिझुहो इंडिया जपान स्टडी सेंटर २१ एप्रिल रोजी ‘क्रिएटिंग अ ग्लोबल लिंगुआ फ्रँका: रोल इन अ कॉमन लँग्वेज आणि ब्रिजिंग द लँग्वेज डिव्हाईड’ या विषयावर वेबिनारचे आयोजन करणार आहे. भाषा ही दोन संस्कृतींना जोडनंतर एक महत्वपूर्ण दुवा असल्याने या दिशेने पावले उचलणे गरजेचे असल्याचे होत असलेल्या चर्चांमधून दिसून यते. नुकतेच इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सने सुद्धा शेजारील देशांसोबत भाषिक दुवा साधण्याचा प्रस्ताव जाहीर केला.
राज्यातील कुस्तीपट्टूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑलिम्पिक सारख्या विविध स्पर्धा, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून पदकांची संख्या वाढविण्यासाठी कुस्ती या खेळासंबंधी तंत्रज्ञान आदान-प्रदान करण्याबाबत जपानमधील वाकायामा स्टेट व महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. मंत्री महाजन यांचे शासकीय निवासस्थान सेवासदन येथे जपानच्या वाकायामा स्टेटच्या शिष्टमंडळासोबत प्राथमिक चर्चा करण्यात आली त्यावेळी मंत्री महाजन बोलत ह
गण्यासाठी शहराकडे स्थलांतर करणारे लोक प्रत्येक देशात आहेत. त्यामुळे ग्रामीण भाग ओस पडत असून शहरांमध्ये लोकसंख्येचा विस्फोट होताना दिसतो. या पार्श्वभूमीवर जपानचे वास्तवही काही वेगळे नाही. जपानमध्ये राजधानी टोकियोमध्ये प्रचंड लोकसंख्या एकवटली आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागात केवळ वयोवृद्ध नागरिकच राहतात. त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागाच्या विकास दरामध्ये विषमता आली. त्यातच जपानचे युवा सध्या ‘एकल संकल्पने’च्या आहारी गेले आहेत. लग्न किंवा कोणत्याही प्रकारचे संबंध न ठेवता, स्वतंत्र वैयक्तिक एकल आयुष्य जगावे, याकडे जप
देशांमधील हवाई संरक्षण सहकार्याला चालना देण्यासाठी भारत आणि जपानच्या वायुसेनेतर्फे जपानमध्ये 'वीर गार्डियन-2023' या संयुक्त हवाईसरावाचे आयोजन केले आहे.
सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत प्रत्येक देशात त्या-त्या टाईम झोननुसार केले जाते. परंतु, अंतराळात संशोधन करणारे अंतराळवीर कोणत्यावेळी नववर्षाचे स्वागत करतील, याची प्रचंड उत्सुकता नेटकर्यांत दिसून आली आहे. जगभरात नवीन वर्षाचे वेगवेगळ्या पद्धतीने जल्लोषात स्वागत केले जाते. पण, आंतरराष्ट्रीय ‘स्पेस स्टेशन’ मधील अंतराळवीर जे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे ४०० किलोमीटर अंतरावर फिरत आहेत त्यांचे काय, असा प्रश्न केला जातो.
कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत असताना परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची RT-PCR चाचणी करण्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे. चीन, जपान, कोरिया आणि थायलंडमधून येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंगही केले जाईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे. विमानतळावर या प्रवाशांमध्ये कोविड 19 ची लक्षणे आढळल्यास किंवा कोविड चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास प्रवाशांना क्वारंटाईन केलं जाईल.
चीन खरंतर फार पूर्वीपासूनच जपानच्या निशाण्यावर आहे. गेल्या काही वर्षांपासून जपानने चीनविरुद्ध शस्त्रास्त्रे गोळा करण्यासही सुरुवात केली आहे. त्यातच जपानने नुकतीच त्यांच्या ’जीडीपी’च्या दोन टक्के संरक्षण अर्थसंकल्पात वाढ केली. त्यामुळे दुसर्या महायुद्धानंतर आता जपान आक्रमक शस्त्रे का खरेदी करत आहे? चीन आणि जपानमधील वाद कशावरून सुरू आहे? याचा आढावा घेणारा हा लेख...
“वाहन उद्योगावर लादण्यात आलेले अवाजवी कर आणि कार असणे म्हणजे चैन नव्हे, या बाबींमध्ये बदल केला तरच भारत चीनशी बरोबरी करु शकेल. वाहन उद्योगावर लावण्यात आलेली सध्याची प्रचलित पद्धती कायम ठेवल्यास भारतला चीनशी बरोबरी करण्यास तब्बल १४० वर्षे लागतील,” असे विधान मारुती उद्योग समूहाचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी केले आहे.
चीनमधील कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या धडकी भरवणारी आहे. चीनशिवाय इतर काही देशांमध्येही कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून केंद्र सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी आज उच्च अधिकाऱ्यांची बैठक घेतली. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दर आठवड्याला कोरोनाची रिव्ह्युव्ह मिटिंग घेणार असल्याचंही म्हटलं आहे. तर महत्त्चाचं म्हणजे गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचा सल्ला केंद्र सरकाने दिला आहे.
चीनची सूत्रे पुन्हा एकदा शी जिनपिंग यांनी स्वतःकडे ठेवल्यानंतर चीनमध्ये अंतर्गत गटबाजी आणि रस्त्यावरील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. कोरोनासारखी गंभीर आपत्ती जगाला दिल्यानंतर चीनने देशात अत्यंत कठोरातील कठोर नियम लोकांवर अक्षरशः लादले. लोकं घराबाहेर पडू नये म्हणून बाहेरून कुलूप लावण्याचे उद्योगही चीनने करून पाहिले. चीनपेक्षा अन्य लहानसहान देशांना चीनच्या या चुकीचा मोठा फटका बसला.
शिंजो आबे यांच्या पुढाकाराने भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्या गटाला ‘क्वाड’ असे नाव दिले गेले असल्यामुळे अनेक तज्ज्ञांनी पश्चिम आशियात उभ्या राहाणार्या चार देशांच्या या गटाला ‘पश्चिमी क्वाड’ म्हटले जाईल, असा अंदाज व्यक्त केला होता. पण, हा गट चीनला केंद्रस्थानी ठेवून तयार झालेला नाही. आखातातील बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संधी हे त्यामागचे प्रमुख कारण आहे.
पंतप्रधानपदाच्या आपल्या दुसर्या खेपेत शिंजो आबेंनी भारतासोबत संबंध सुधारण्यास प्राधान्य दिले. या काळात त्यांनी तीन वेळा भारताला भेट दिली, तर नरेंद्र मोदींनीही अनेक वेळा जपानला भेट देऊन त्याची परतफेड केली. आज जपान हा भारतातील तिसरा सर्वांत मोठा गुंतवणूकदार देशांपैकी एक झाला असून, भारत-जपान द्विपक्षीय व्यापार १७ अब्ज डॉलरच्या वर गेला आहे.
एका वैयक्तिक मित्राबरोबरच देशाच्या सच्चा साथीदाराच्या मृत्यूने भारताची मोठी हानी झाली आहे. शिंजो आबे एका राजकीय नेत्याच्याही पलीकडे प्रत्येक आघाडीवर खांद्याला खांदा लावून भारताबरोबर उभे राहणारे व्यक्तिमत्त्व होते. आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात त्यांनी जपानच्या भारताबरोबरील संबंधांना नव्या उंचीवर पोहोचवले.
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे काल, शुक्रवार, दि. ८ जुलै रोजी एका हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात निधन झाले. आबे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ऋणानुबंध मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासूनचे. तेव्हा, आपल्या या अतिशय जवळच्या मित्राविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलेला हा भावनोत्कट ब्लॉग...
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबेंवर खुनी हल्ला झाला आणि त्यात त्यांचे निधन झाले. या घटनेमुळे सगळे जग शोकाकुल झाले आहे. या पाश्वर्र्भूमीवर कोरोना फेम चीनमध्ये काय दृश्य आहेत? तर, चीनच्या ‘विबो’ या समाजमाध्यमांवर चिनी नागरिक शिंजो आबेंच्या मृत्यूवर चक्क आनंद व्यक्त करत आहेत. ते एकमेकांचे अभिनंदन करून संदेश लिहित आहेत की, “आज आम्ही एक प्लेट जास्त भात खाऊ.” तर काही चिन्यांनी मत व्यक्त केले आहे की, जे शिंजो आबेंबरोबर झाले, तेच जपानच्या विद्यमान पंतप्रधान तसेच दक्षिण कोरियांच्या राष्ट्रप्रमुखांसोबत सुद्धा होऊ शकते
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर नारा शहरात शुक्रवारी दि. ८ रोजी सकाळी गोळीबार करण्यात आला. आबे हे पश्चिम जपानमध्ये भाषण करत असताना त्यांच्यावर मागून हल्ला करण्यात आला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे शुक्रवार दि. ०८ रोजी संध्याकाळी निधन झाले. आबे यांच्यावर नारा शहरात शुक्रवारी दि. ८ रोजी सकाळी गोळीबार करण्यात आला होता. आबे हे पश्चिम जपानमध्ये भाषण करत असताना त्यांच्यावर मागून हल्ला करण्यात आला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु त्यांचे निधन झाले आहे
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची आज नारा शहरात एका प्रचार कार्यक्रमात भाषण करत असताना गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ४० वर्षीय हल्लेखोराने जपानच्या पश्चिम भागात माजी पंतप्रधानांवर दोन वेळा गोळ्या झाडल्या. त्यांच्या निधनावर जागतिक नेते शोक व्यक्त करत असताना, पंतप्रधान मोदींनी शनिवारी दि. ९ जुलै रोजी एक दिवसाचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे. शिंजो आबे यांचे भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जवळचे नाते होते.
चीन आणि जपान नंतर परकीय गंगाजळी (फॉरेक्स रिझर्व्ह)च्या बाबतीत तिसर्या क्रमांकावर असलेला देश आहे स्वित्झर्लंड. पण, स्विझर्लंडचे वैशिष्ट्य असे आहे, स्विस बँकेत ठेवलेला पैसा पूर्णपणे गोपनीय आहे. त्यामुळे स्वित्झर्लंडचे व्यवहार कळणं कठीण आहे. ‘फॉरेक्स रिझर्व्ह’ कसे गुंतवले गेले, हे ‘ट्रॅक’ करणं सोप्पं नाही. तसेच जपानच्या ‘येन कॅरी ट्रेड’प्रमाणे ‘स्विस फ्रँक’चा ही ‘कॅरी ट्रेड’ आहे. पण त्याची व्याप्ती कमी आहे. ‘फॉरेक्स रिझर्व्ह’मध्ये भारत चौथ्या क्रमांकावर आहे, तर पाचव्या क्रमांकावर रशिया आहे.
एशिया चषक स्पर्धेत भारताने जपानचा १-० पराभव करत कांस्यपदक पटकावले आहे. पहिल्या क्वार्टरच्या सुरुवातीलाच राजकुमार पालने भारताला आघाडी मिळवून दिली आणि त्यानंतर त्यांनी आघाडी कायम राखली. जपानला सात पेनल्टी कॉर्नर मिळाले तर भारताला फक्त दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले पण भारताने सर्कल पेनिट्रेशनच्या आकडेवारीत ११-१० ने आघाडी घेतली.
जवाहरलाल नेहरुंनी तेव्हा हत्ती भेट देऊन जपानशी दृढ संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. पण, आज मोदी मात्र हत्ती भेट न देताही फक्त जपानच नव्हे, तर ‘क्वाड’ गटातील सर्वच देशांशी संबंध बळकट करत असल्याचे या सगळ्यातून दिसते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जपानमधील टोकियो येथे दुसर्या ’क्वाड’ सदस्य राष्ट्रनेत्यांच्या शिखर परिषदेत जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासह भाग घेतला.
जपानमधील शिखर परिषदेत अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाने कोरोना महामारीच्या काळात केलेल्या लसीकरण कार्याचे कौतुक केले आहे.
उद्या, दि. २४ मे रोजी टोकियोमध्ये होणारी ‘क्वाड’ बैठक महत्त्वाची ठरणार आहे. जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या तीनही राष्ट्रांनी रशिया विरोधात उघड भूमिका घेतली आहे, याउलट भारताची भूमिका वेगळी आहे. परंतु, याही भेटीत भारत आपली भूमिका पुन्हा एकदा मांडेल. युरोपात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आशियाई राष्ट्रांवरदेखील होत आहे. चीन-तैवानच्या संघर्षाचा मुद्दा पुन्हा नव्याने जागतिक व्यासपीठांवर चर्चेस येत आहे.