( Old Shiv Sainik from Bhoiwada Parel area vishvnath khatate join shivsena ) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम करणारे परळ-भोईवाडा परिसरातले जुनेजाणते शिवसैनिक विश्वनाथ (बुवा) खताते, विजय कलगुटकर आणि काशी कोळी यांच्यासह 25 ज्येष्ठ शिवसैनिकांनी शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
Read More
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या मुजोर कारभारामुळे एका महिलेने जीव गमावल्याने शिवसैनिकांनी रुग्णालयावर धडक मोर्चा काढला आहे. आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत रुग्णालयातील अधिकाऱ्यांवर चिल्लर पैसे फेकत निषेध व्यक्त केला.
उद्धव ठाकरेंचे नेमके काय चुकले, याविषयी बाळासाहेबांचे शिवसैनिक तथा भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर ( kalidas Kolambkar ) यांनी परखड भाष्य केले. सलग नऊवेळा विजयी होऊन त्यांनी विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला विशेष संवाद...
उद्धव ठाकरे यांनी लाचारीची हद्द पूर्ण ओलांडली आहेे. सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचे आहे, असे म्हणणारे उद्धव ठाकरे यांनी केव्हा स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला, हे सामान्य शिवसैनिकाला कळलेही नाही. आता त्यांना आदित्यला मुख्यमंत्री करायचे आहे. पण या खोट्या राजकारणात नेमके कोण अडकतय हेच त्यांना समजत नाही आहे.
राम मंदिरावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंचा महायुतीच्या नेत्यांनी शनिवार, दि. १३ जानेवारी रोजी समाचार घेतला. 'कोरोना काळामध्ये मंदिरे बंद ठेवून मदिरालय उघडणारे उद्धव ठाकरे हे काळारामाचे नव्हे, तर तळीरामाचे भक्त आहेत', अशी खरमरीत टीका भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली. उबाठा गटात हिंमत असेल, तर त्यांनी आदित्य ठाकरेंना लोकसभेच्या निवडणुकीत उतरून निवडून आणून दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले.
काँग्रेस मुक्त भारत जेव्हा होईल तेव्हा होईल पण उबाठा मुक्त संजय राऊत व्हायला हवं, संजय राऊत मुक्त उबाठा होण्याची वेळ आली. राऊत मुक्त उबाठा हे ज्या दिवशी होईल त्यावेळी असंख्य शिवसैनिक मोकळा श्वास घेतील" अस मत आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परीषदेत व्यक्त केलय.
ठाणे : १९८९ साली कारसेवक म्हणून अयोध्येला जाण्याची संधी मिळाली होती. धरपकडीचे सत्र सुरू होते. झांशीमधील एका मराठी कुटुंबाने आम्हाला राहण्यासाठी आसरा दिला, अशी आठवण आ. संजय केळकर यांनी सांगितली. अयोध्येला ठाण्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसैनिक रवाना झाल्यानंतर त्यांना आ. संजय केळकर यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी ३४ वर्षांपूर्वीच्या श्रीराम जन्मभूमी आंदोलनाच्या आठवणी जागवल्या. १९८९ साली कारसेवक म्हणून अयोध्येला जाण्याची संधी मिळाली.
“तिघांचे मिळून सरकार येईल असे वाटले तेव्हा त्यांनी आमचा फोनही घेतला नाही. काही हरकत नाही. त्यावेळी हा निर्णय घेऊन जशी बाळासाहेबांच्या विचारांशी फारकत झाली, त्याचवेळी आजच्या परिस्थितीचे बिजारोपण झाले,” अशी घणाघाती टीका उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केली
"आमच्यावर आरोप होतो की आमच्याकडचे आमदार हे ईडीमुळे आले आहेत, होय हे सरकार ईडीचं आहे, ई म्हणजे एकनाथ आणि डी म्हणजे देवेंद्र" अशा शब्दांत विरोधकांनी टोला हाणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले
" माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकाला कमी आमदारांचे पाठबळ असूनही मुख्यमंत्री म्हणून समर्थन दिले हा देवेंद्र फडणवीसांचा मोठेपणा " अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले
राज्यमंत्री असून देखील आम्हाला आमच्या मतदारसंघात फंड मिळत नाही. याउलट आम्ही पराभूत केलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना उप मुख्यमंत्री अजित पवार ताकद देतात. राज्याचे मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याकडे यासंदर्भात वारंवार तक्रार करून सुद्धा कोणतीही कारवाई झाली नाही. असे शिवसेनेच्या शिंदे गटातील शंभूराजे देसाई यांनी म्हंटले आहे. याबाबतचा व्हिडीओ एकनाथ शिंदे यांच्या फेसबुक पेज वरून शेअर करण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीचे पडसाद अवघ्या महाराष्ट्रभर उमटले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरही त्याचे राजकीय परिणाम दिसून येतील, यात शंका नाही. तेव्हा, शिंदे यांच्या बंडाळीनंतर महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा कानोसा घेण्याचा केलेला हा प्रयत्न...
“मुंबईबाहेरील लोकांच्या मतांच्या लोभाने अनधिकृत बांधकामांना तुमचेच नगरसेवक परवानगी देत आहेत,” असा आरोप करत भाजप आमदार नितेश राणे यांनी अनधिकृत बांधकामे कोसळून होत असलेल्या दुर्घटनांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शुक्रवारी खरमरीत पत्र लिहिले आहे. तसेच, निष्पापांच्या रक्ताने तुमच्याच सत्ताधारी शिवसैनिकांचे हात रंगले आहेत,” असे म्हणत शिवसेनेवर जोरदार प्रहार केला आहे.
ठाणे शहर भाजपने मंगळवारी शिवसेनेला पुन्हा एकदा जोरदार धक्का दिला. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या उपशहर संघटक संध्या सुरेश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिला शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
आगामी राज्यसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर राज्यातले शिवसेनेचे सर्व आमदार हे मुंबईत दाखल झाले आहेत. या आमदारांची सोमवारी (दि. ६ जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत बैठक पार पडली. "येणारी अडीच वर्ष ही आपलीच आहेत, आपल्याला सामान्य शिवसैनिकांना न्याय द्यायचाय!", असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी आमदारांना संबोधताना केले. आमदार फुटू नयेत म्हणून या बैठकीत उद्धव ठाकरेंनी आपल्या आमदारांना राज्यसभा निवडणूकीसंदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टीही सांगितल्याचे सांगण्यात येत आहे.
'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेतून माझ्या प्रश्नांच सोडा, शिवसैनिकांना तरी ते काय दिशा मिळाली, काय कळलं असेल का? हा माझा मोठा प्रश्न आहे. मुळात त्यांचे भाषण हे दिशा देणारे नव्हते. मुंबईतील मेट्रो आणि धारावी बद्दल सांगितलं, पण बाकीचं काय? स्वार्थी मुख्यमंत्री आधी कुटुंबाचा विचार करतात हेच वेळोवेळी दिसून आलंय. त्यामुळे बाप बेटेच्या सरकारमधून मुंबईला मुक्त करायची गरज आहे, हे देवेंद्रजी म्हणाले ते योग्यच!', अशी प्रतिक्रिया भाजप आ. नितेश राणे यांनी शनिवार दि. १४ मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या भाषणांतर दै.मुंबई
मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत हनुमान चालीसा म्हणण्याचा निर्धार भाजप खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दांपत्याकडून काही दिवसांपूर्वी करण्यात आला. त्यामुळे शिवसैनिकांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे. शनिवारी (दि. २३ एप्रिल) राणा दांपत्यांना रोखण्यासाठी शिवसैनिकांची मातोश्री बाहेर गर्दी जमली असून ठिकठिकाणी; 'हिम्मत असेल तर येऊन दाखवा. शिवसैनिक सज्ज आहे.', अशी बॅनरबाजीही करण्यात आली आहे. त्यामुळे हनुमान चालिसेच्या पठणाला मुख्यमंत्र्यांचा एवढा विरोध का? असा प्रश्न स
"मुख्यमंत्र्यांनी पाठवलेले शिवसैनिक हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नाहीत. त्याचे शिवसैनिक असते, तर त्यांनी आम्हाला नक्कीच हनुमान चालिसा म्हणण्यासाठी समर्थन दिलं असतं. मात्र आज मुख्यमंत्री सत्तेचा दुरुपयोग करतायत.", असे मत भाजप आमदार रवी राणा यांनी व्यक्त केले. शनिवारी (दि. २३ एप्रिल) मातोश्री येथे जात असता पोलिसांकडून त्यांना दारतच अडवण्यात आले. त्यावेळी ते मध्यमांशी बोलत होते.
"शिवसैनिक म्हणून आम्ही जन्मतःच माजोरडे आहोत. आमचा माज काय आहे हे तुम्ही पाहिलंत आणि तो या पुढेही दाखवू. आम्हाला पोलिसांची गरज नाही.", असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. शनिवारी (दि. २३ एप्रिल) नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शिवसेनेच्या एककल्ली कारभाराला सर्वसामान्य शिवसैनिक कंटाळले असुन सेनेत आऊटगोइंग सुरु झाले आहे. मागील आठवड्यात अनेक शाखाप्रमुख, उपविभागप्रमुखांना पक्षात प्रवेश देऊन भाजपने शिवसेनेला खिंडार पाडले असतानाच आता महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादीनेच शिवसेनेचा गेम केला असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या कार्यकर्त्यानी रविवारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करून शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. आतापर्यंत शिवसेनेच्या दोघा पदाधिकाऱ्यांनी र
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपने त्यांच्याच `होम ग्राऊंड'वर पुन्हा एकदा जोरदार दणका दिला आहे. मंगळवार, दि. २२ फेब्रुवारी रोजी शिवसेनेच्या आणखी काही पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे. यादरम्यान आयोजित केलेल्या 'भव्य पक्षप्रवेश आणि नियुक्ती प्रदान समारंभात' विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ हे उपस्थित होते.
राज्याचे नगरविकास मंत्री व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपने `होम ग्राऊंड'वरच जोरदार धक्का दिला आहे. रविवार दि. २० फेब्रुवारी रोजी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात ३०० शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यात काही शाखाप्रमुखांचाही समावेश आहे. यावेळी आमदार निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी भाजपचे कल्याण शहर कार्यालय तोडले. त्यावर संतप्त झालेल्या भाजपने बाजारपेठ पोलिस ठाणे ते शिवाजी चौकार्पयत मोर्चा काढला. तसेच शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन केले. ज्या शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे त्यांना अटक करा अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजप पदाधिका:यांनी पोलिसांना दिला आहे.
गोपीचंद पडळकर यांनी लगावला शिवसेनेला टोला विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राज्यात वातावरण गरमागरम असताना आरोप प्रत्यारोपांच्या फैरी भाजप आणि राष्ट्रवादीत सुरू आहेत. मात्र, ज्या महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष एकत्र आहेत तिथल्या कार्यकर्त्यांमध्येही नाराजी दिसून येत आहे. अशाच एका फोटोवरून सध्या टोलेबाजी सुरू आहे.
आता जिलेबी-फाफड्याच्या टपर्याही रस्तोरस्ती लागण्याची शक्यता आहे. पण मुद्दा हा आहे की, जिलेबी आणि फाफडा वगैरेंची नावं घेऊन खरेच गुजराती बांधव कुणाचे पाईक होणार आइेत का? असे काहीबाही बोलून लोकांना भुलवायचे दिवस गेले.
भाजपाचे नेते निलेश राणे यांचा शिवसैनिकांना टोला
उद्धव, आदित्य आणि संजय राऊत यांची सेना म्हणजे शिवसेना नव्हे, हे डोक्यात घट्ट बसविले पाहिजे. शिवसैनिक आणि भाजपसैनिक एकाच वैचारिक जहाजात बसलेले आहेत. लढा द्यायचा आहे तो राजकीय लढा उद्धव, आदित्य आणि संजय यांच्या सेनेशी करायचा आहे. सामान्य शिवसैनिकांशी वैचारिक भांडणाला काही आधार नाही, राजकीय ध्येयवादातील भिन्नतेलाही काही आधार नाही, आदर्शांची भिन्नता यालादेखील काही आधार नाही. सगळेच एका दिशेचे प्रवासी आहेत
वाढीव विजबिलांचा प्रश्न सोडवण्यासाठी वसईत शिवसेनेचे आंदोलन
आज दररोज दोन-अडीच हजार कोरोनाचे रुग्ण राज्यात आढळून येतात. पण, ही महामारी आटोक्यात आणण्यासाठी शासनाकडे काय ठोस नियोजन आणि उपाय आहेत जनतेला वार्यावर सोडून कोरोनासारख्या राक्षसाच्या संपर्कात मृत्यूच्या खाईत लोटणे कितपत योग्य आहे, याचे साधे भान सत्ताधार्यांना असू नये, याचेच आश्चर्य वाटते.
शिवसेना सामान्यांच्या हितासाठी लढणारा पक्ष असून उभ्या महाराष्ट्राला पांडुरंगाच्या पंढरीत शिवसेनेची ताकद दाखविण्यासाठी येत्या 24 तारखेला शिवसैनिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे तसेच तालुक्यातील दोन हजार शिवसैनिक पंढरपूरला जाणार असल्याचेही माजी आ. चिमणराव पाटील यांनी कृउबाच्या सभागृहात आयोजित शिवसेनेच्या बैठकीत सांगितले.