कवर्धा हिंसाचार प्रकरणात आता भाजपने राज्याचे मंत्री मोहम्मद अकबर यांना बरखास्त करण्याची मागणी केली आहे. या सर्व प्रकरणाची सरकार एकतर्फी कारवाई करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. भूपेश बघेल सरकारचे परिवहन मंत्री मोहम्मद अकबरच या प्रकाराला जबाबदार आहेत, असा थेट आरोप लावा जात आहे. या प्रकाराला उत्तर देताना बघेल यांची जीभ घसरली असून त्यांनी रा.स्व.संघाची तुलना थेट नक्षलींक्षी केली आहे.
Read More
कवर्धा येथे वॉर्ड क्रमांक २७ येथील चौकात सुरुवातीला कट्टरतावाद्यांनी भगवा ध्वज उतरवल्याचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर रविवारी भगवा ध्वज फडकविण्यात आला. याचा वचपा म्हणून कट्टरतावाद्यांनी ध्वज फडकविणाऱ्यांवर हल्ला बोल केला. दडगफेकही झाली. पोलीसांच्या डोळ्यादेखत युवकाला मारहाण होत होती. यात एकूण आठ जण जखमी झाले. स्थानिक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.