कल्याणमध्ये वूमेन्स फोरम निमा कल्याण यांच्यातर्फे 'निमा वेदा ग्लॅम 2024' ब्रेन अॅण्ड ब्युटी काॅन्टेस्ट ही महिला डॉक्टरांची सौंदर्य स्पर्धा आणि "आनंदी" ही राष्ट्रीय वैद्यकिय शिक्षण परिषद अतिशय यशस्वीरित्या संपन्न झाली.
Read More
कल्याण डोंबिवलीतील वैद्यकीय विश्वामध्ये येथील अग्रगण्य आयुष हॉस्पिटलने एक नवा इतिहास रचला आहे. या रुग्णालयात कल्याणातील पहिली रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी (गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया) यशस्वीपणे करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेसाठी थर्ड जनरेशनच्या कोरी या अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याची माहिती आयुष हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजेश राजू आणि ऑर्थोपेडिक - रिप्लेसमेंट सर्जन डॉ.भरत कुमार यांनी दिली आहे.
कल्याणात येत्या शुक्रवारी 26 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत साई हॉल, वायले नगर, कल्याण पश्चिम येथे रोजगार आपल्या दारी या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने हा मेळावा होत आहे. या मेळाव्यात विविध क्षेत्रातील तब्बल 4 हजार संधी उपलब्ध होणार आहेत. ज्यामध्ये खासगी क्षेत्रासोबतच शासकीय विभागातीलही निवडक पदांसाठी इंटरव्ह्यू घेतले जाणार आहेत.
प्रभू श्रीरामांच्या अयोध्येतील भव्य मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर देशाच्या कानाकोपऱ्यात दिवाळी साजरी होत आहे. या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याणचा ऐतिहासिक भगवा तलाव आज तब्बल 50 हजार दिव्यांनी उजळून निघाल्याचे दिसून आले. कपिल पाटील फाउंडेशन आणि भाजप शहराध्यक्ष वरुण पाटील यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमात हजारो रामभक्त सहभागी झाले होते.
आयएमए कल्याणतर्फे डॉक्टर्स डे निमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये नागरिकांसह आयएमएचे डॉक्टर्सही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.