आजही बहुसंख्य प्रवासवर्णने लिहिली जातात. अशी प्रवासवर्णने माहिती देणार्या वृत्तपत्रीय लेखनाच्या पातळीवरच राहतात. पण याला छेद देऊन प्रवासवर्णनपर ग्रंथांचे लेखन करून वाचकांना जगप्रवास घडवणार्या डॉ. मीना प्रभु यांचे नाव अग्रक्रमाने घेता येईल. नुकतेच डॉ. मीना प्रभु यांचे निधन झाले. मात्र, त्यांनी लिहिलेली प्रवासवर्णने आणि साहित्य अजरामर आहे. त्यांच्या साहित्यकृतींचा, सर्जनशीलतेचा घेतलेला मागोवा...
Read More
इस्रायल आणि हमासच्या युद्धाला वर्षपूर्ती अजूनही पूर्णविराम मिळण्याची कुठेलीही चिन्हं दृष्टीक्षेपात नाही. इराण, हमास, हिजबुल्लाह, यांच्या त्रयीने इस्रायलविरोधात उघडली आणि स्व:ताचेच नुकसान करून घेतले आहे. मागच्या आठवड्यात इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात इराणच्या सुरक्षा व्यवसथेचा भाग असणाऱ्या मिसाईल सिस्टमचे तीन तेरा वाजवले इराणला आता रोज्याच रोज स्व:ताच्या दुष्कृत्यांची फळं भोगावी लागत आहेत.
सृष्टीतील घटक वापरून आहे ते सौंदर्य खुलविणे व जतन करणे याचा खोल शास्त्रीय अभ्यास म्हणजेच सौंदर्यशास्त्र होय. शास्त्र हा शब्द जिथे आला तिथे विज्ञान आलेच. आयुर्वेदामध्ये विविध दिनचर्येतील विधींचा आरोग्य रक्षणार्थ सौंदर्य रक्षण व जतनार्थ उपाय म्हणून उल्लेख केलेला आहे. दिनचर्या म्हणजे रोजच्या दिनचर्येचे वर्णन म्हणजेच काय तर सौंदर्य जतन व वर्धनासाठी रोज नियमितपणे काही नियम पाळले, तर काही तक्रारी त्रास उद्भवतच नाहीत व सुदृढ स्वास्थ व सौंदर्य प्राप्त होऊन ते टिकते.
राजस्थानमधील जैसलमेर येथे भारत आणि इजिप्तच्या लष्करांच्या विशेष दलांमध्ये 'एक्सरसाइज सायक्लॉन-१' हा संयुक्त सराव सुरू आहे. दोन्ही देशांमधील पहिलाच संयुक्त लष्करी सराव असून त्यास १४ जानेवारी २०२३ पासून प्रारंभ झाला आहे.
जागतिकीकरणानंतर ‘आयएमएफ’ने गरीब देशांबद्दल व्यक्त केलेली भीती चिंताजनक जरी असली, तरीही भारताने यासंदर्भात उचललेली पावले जागतिक मंदीची झळ आपण सोसू शकू, अशीच आहेत. मात्र, तरीही ‘आपदा में अवसर’, शोधण्याची ही संधी आपण दवडता कामा नये!
भारत आणि इजिप्त या दोन्ही देशात राजनैतिक, आर्थिक आणि लष्करी संबंध वृद्धिंगत होत आहेत. याच पार्श्वभूमीवर भारताने इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी यांना प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले आहे. भारत-इजिप्तचे संबंध पुनरुज्जीवित करण्याची आणि पारंपरिक द्विपक्षीय संबंधांच्या पलीकडे असलेल्या मुद्द्यांवर समन्वय साधण्यासाठी ही घटना अतिशय महत्त्वाची ठरणार आहे.
इजिप्तच्या सरकारने गव्हाची तातडीची गरज पूर्ण करण्यासाठी जागतिक बँकेकडून ५०० दशलक्ष डॉलर्सची आर्थिक मदत मागितली आहे. जागतिक बँकेने सुरू केलेल्या ‘इमर्जन्सी फूड सिक्युरिटी अँड रेझिलियन्स सपोर्ट प्रोग्राम’मार्फत वित्तपुरवठा होईल अशी आशा आहे. युक्रेन-रशिया युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत गव्हाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत कारण दोन्ही देश अन्नधान्याचे प्रमुख निर्यातदार आहेत, असे अल-मॉनिटरने वृत्त दिले आहे.
जेरूसलेम शहरातील सर्व धर्मियांच्या पवित्र प्राचीन स्थानांना जराही धक्का लागू नये, म्हणून संरक्षणमंत्री जनरल मोशे दायान आणि त्याचा चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल यित्झाक राबिन यांनी पूर्व जेरूसलेममध्ये रणगाडे, तोफा किंवा चिलखती गाड्या न नेता, फक्त पॅराट्रूपर्स पथक उतरवलं. विमानांमधून हवाई छत्रीद्वारे हे हत्यारबंद पॅराट्रूपर्स कमांडो पूर्व जेरूसेलमममध्ये उतरले आणि त्यांनी अरब प्रतिकार मोडून काढत पूर्व जेरूसेलम जॉर्डनच्या ताब्यातून मुक्त केलं. तो दिवस होता दि. ७ जून, १९६७.
गेल्या काही दिवसांपासून इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या पुरातन संघर्षाची ठिणकी पुन्हा एकदा पेटली आहे. त्यामुळे केवळ इस्रायल-पॅलेस्टाईनच नाही, तर संपूर्ण मध्य पूर्व आशियेत युद्धाचे ढग पसरलेले दिसतात. तेव्हा, इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि आजची युद्धसदृश परिस्थिती याचा सविस्तर आढावा घेणारा हा अभ्यासपूर्ण लेख...
अरबस्तानात अनेकदा येणार्या वादळांमध्ये वाळूच्या संपूर्ण टेकड्याच्या टेकड्याच एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतरित होतात. कुठे वाळूच्या खाली दडलेली पाणथळ जागा उघडी पडते, तर कुठे पूर्वी सपाट असणार्या भागात नवी टेकडी उभी राहते. सध्या पश्चिम आशियाच्या राजकारणात तशाच गोष्टी घडत आहेत. आखाती देशांमधील बदलणार्या समीकरणांचे पडसाद थेट भारत, पाकिस्तान, इजिप्त आणि तुर्कीपर्यंत जाणवत आहेत.
‘कोविड’ची साथ जगभर पसरल्यामुळे जागतिक साखळीदेखील विस्कळीत झाली. ती आता पुनःप्रस्थापित होते तोच सुएझ कालव्यातील संकट ओढवले. यामुळे जागतिकीकरणाकडे संशयाने बघणार्यांच्या संख्येत वाढ होत आहे.
भारत आखाती अरब राष्ट्रं, इजिप्त आणि इस्रायलच्या जवळ सरकताना दिसत आहे. याचा अर्थ आखाताच्या पलीकडच्या तीरावर असलेल्या देशांशी संबंध कमी करणे असा होत नाही. पण या गटासोबत आर्थिक, व्यापारी, लष्करी आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात अधिक संधी आहेत. यातील संरक्षण विषयक आव्हानं आणि संधींचा आढावा घेण्याच्या दृष्टीने जनरल नरावणे यांची भेट महत्त्वाची आहे.
नेगेव्ह वाळवंटातल्या बदाऊन टोळ्यांना इस्रायली नगरपालिका आग्रह करत आहेत की, आता भटकत न बसता इथेच स्थिर व्हा.
मागच्या लेखापासून ‘पुरातत्त्व’ (Archaeology) हे शास्त्र आर्यांच्या स्थलांतराच्या किंवा आक्रमणाच्या बाबतीत काय सांगते, ते आपण पाहत आहोत. त्यामध्ये पाश्चात्त्य संशोधकांनी एक मूलभूत गृहीतक मांडलेले आहे. ते म्हणजे, इजिप्त, मेसोपोटेमिया, बॅबिलोनिया, असीरिया, सुमेरिया, वगैरे ठिकाणी सापडलेल्या अत्यंत प्रगत संस्कृतीचे अवशेष आणि हडप्पा, मोहेंजोदरो येथील नागरीकरणाचे अवशेष यांच्या दोघांच्या काळात सुमारे दीड ते पावणेदोन हजार वर्षांचे अंतर आहे. याचा अर्थ या दरम्यान भारताबाहेरच्या त्या प्रगत संस्कृतीच्या लोकांनी भारतात स
तब्बल ३० वर्षे गाजवलेली इजिप्तची सत्ता
मोझेस बेन मैमोंचं सिनेगॉग म्हणजे इजिप्तची ऐतिहासिक वास्तूच आहे. या सिनेगॉगप्रमाणेच इजिप्तमधील आणखी आठ पडीक सिनेगॉग्स दुरुस्त करण्याची सरकारी योजना आहे.
इजिप्तमधल्या स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार ती देवांची भाषा होती. त्याचा अर्थ कुणालाच उलगडता येईना. युरोपीय अभ्यासकांनी त्या लिपीला ‘हायरोग्लीफ’ असं नाव दिलं.
२०११ साली इजिप्तमध्ये क्रांती झाल्यानंतर लोकशाही मार्गाने निवडून आलेले पहिले राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांना जनमत मिळूनही न्यायालयाच्या पायऱ्या चढाव्या लागत होत्या. नेमका हा कोणता संघर्ष होता? हे समजून घेणं गरजेचं आहे.
‘अरब स्प्रिंग’च्या पावलावर पाऊल टाकत उत्तर-पूर्व आफ्रिकेतील सुदान देशातही अशीच एक क्रांती होऊ घातली आहे. या जनक्रांतीची आता ‘सुदान स्प्रिंग’ म्हणूनच जागतिक स्तरावर दखल घेतली जात असून सुदानसाठी वर्तमानकाळ हा सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील म्हणावा लागेल.
इजिप्तचा इतिहास सांगतो की, या राम राजाने आशियातील अनेक भूप्रदेश जिंकले. मात्र, त्याच्यानंतर याने अनेक मंदिरेही बांधली. असा हा ‘रामराज्या’चा वारसा इजिप्तलाही आहे म्हणायचा.
२४ तासांत पृथ्वीच्या सूर्याभोवताली होणाऱ्या एका फेरीमुळे निर्माण होणारी सूर्याची आवर्तने आणि नाईल नदीचा वार्षिक पूर ही नैसर्गिक परिस्थिती फार प्रभावी होती. निसर्गातील नेमक्या याच दोन नियमित घटनांमुळेच पाणी आणि सूर्य यांना देवत्त्व दिले गेले आणि या दोन नैसर्गिक शक्ती, असंख्य चिह्ने आणि प्रतीकांच्या व्यक्त माध्यमात रचल्या गेल्या.
इजिप्तच्या प्राणी-पक्ष्यांच्या चिह्नसंस्कृतीकडे वळण्यापूर्वी एका साम्य-साधर्म्याचा आणि विरोधाभासाचा दृष्टांत पाहूया.
प्राचीन इजिप्तमधील देवालये आणि पिरॅमिडच्या थडग्यांवर, चिह्नलिपीचा वापर करून अनेक घटनांची चिरकाल टिकणारी नोंद केली गेली. अशा नोंदींसाठी चिह्न निवडणारे अभ्यासू वैज्ञानिक आणि ती चिह्न लिपी लिहिणारे लेखनकार अशी मांडणी केली गेली होती. अशा नोंदींना Hieroglyph म्हणजेच ‘हायरोग्लिफ्स’ असे संबोधन वापरले गेले.
Symbolism हे एक फार व्यापक शास्त्र आणि ज्ञानशाखा आहे. दुसऱ्या बाजूला Symbolic हा शब्द, व्यक्त करण्याची निव्वळ एक प्रणाली आहे. Symbolism ही एक प्रगत निश्चित लिखित संकल्पना आहे. मात्र, अभ्यास करूनच त्याचा परिचय करून घेत येतो.
रोज उगवणारा प्रकाशमान सूर्य, रात्रीचा शीतल प्रकाश देणारा चंद्र, आकाशात नियमित नेमाने उगवणारे ग्रह आणि नक्षत्र हे तर सर्व शक्तिमान देवता झालेच.
नाईल नदीच्या काठांवरील त्रस्त नागरिकांना सूर्य आणि चंद्र यांचे दर्शन रोज होत होते आणि नियमित दिसणारा हा प्रकाश देणारा सूर्य तारा त्यांना देव म्हणून स्वीकारावासा वाटला असावा. या प्रकाशमान सूर्याला ‘आमून-रे’ असे संबोधित केले गेले.
आखाती देशांमध्ये सुरू असलेले राजनैतिक वाद अद्याप थांबायचं नाव घेत नाही. पुन्हा एकदा अरब देशांनी कतार विरोधात कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. यावेळी सौदी अरेबियाने आपल्या भोवताली कालवा तयार करून कतारला एक बेट म्हणून वेगळं पाडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
देशाची सेनादले अशा रीतीने त्यांच्या-त्यांच्या इतिहासातले विजयाचे, पराक्रमाचे, गौरवाचे दिवस आवर्जून साजरे करीत असतात.