अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून आयातशुल्क लादण्याच्या निर्णयास ९० दिवसांची स्थगिती देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. या स्थगितीचा फायदा उठवत भारताने आपली निर्यात वाढवण्यासाठी एक महत्वाची योजना आखली आहे. भारत सरकारकडून अशी महत्वाची दहा क्षेत्रे निवडण्यात आली आहेत
Read More
भारतातील सोन्याचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत असताना, याच चढ्या भावांबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. जागतिक गुंतवणुक कंपनी गोल्डमन सॅच याच्याकडून सोन्याचे भाव प्रतितोळा सव्वालाखांचा आकडा गाठण्याची शक्यता आहे
गेले काही दिवस जोरदार आपटीमुळे गुंतवणुकदारांचे लाखो कोटी पाण्यात जाण्याचा सिलसिला मंगळवारी खंडीत झाला. भारतीय शेअर बाजाराने १५७८ अंशांची जोरदार मुसंडी मारत ७६ हजारांचा टप्पा ओलांडला
भारतातीय बाजारातील सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. भारतीय बाजारातील सोन्याच्या भावांनी प्रतितोळा ९३,०७४ रुपयांची पातळी गाठली आहे. सोन्याच्या भावातील या चढाईमुळे ऐन लग्नसराईच्या काळात नागरिकांच्या तोंडाला यामुळो फेस येणार आहे हे नक्की. भारतातील सोन्याच्या भावांमध्ये तब्बल ३ हजार रुपयांची वाढ झाली असून आता सोन्याचे भाव लवकरच लाखाच्या घरात जाण्याची शक्यता आहे
अमेरिकेकडून आयातशुल्कवाढीला स्थगिती दिल्यामुळे शेअर बाजारात शुक्रवारी आनंदीआनंद पसरला. तब्बल १३०० अंशांच्या उसळीसह सेन्सेक्सने ७५ हजारांचा टप्पा ओलांडला. यामुळे गुंतवणुकदारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. निफ्टीमध्येही ४२९ अंशांची जोरदार वाढ होत २२,८२८ अंशांचा टप्पा निर्देशांकाने गाठला
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केल्याप्रमाणे जगातील तब्बल ७० देशांवर आयातशुल्क लागू झाले आहे. या देशांमध्ये भारताचाही समावेश असल्यामुळे भारतावर त्याचे काय परिणाम होऊ शकतात, याचा विचार आपण करणे महत्त्वाचे ठरते. या आयातशुल्क वाढीमुळे येणार्या काळात भारतावर काय परिणाम होणार, त्यातूनही भारताला कशा संधी निर्माण होऊ शकतात, याच विषयावर माजी मुख्य आयकर आयुक्त आणि आंतरराष्ट्रीय व्यापार, पर्यावरण विषयांच्या अभ्यासक संगीता गोडबोले यांच्याशी साधलेला विशेष संवाद.
सोमवारी शेअर बाजाराच्या जवळपास ३००० अंशांनी झालेल्या पतनानंतर मंगळवारी शेअर बाजाराने झोकात पुनरागमन केले आहे. तब्बल १००० अंशांची उसळी घेत शेअर बाजाराने पुन्हा एकदा गुंतवणुकादारांचा विश्वास परत मिळवला आहे
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिल रोजी जगातील जवळपास ७० देशांवर आयाशुल्क लादण्याचा निर्णय जाहीर केला व त्यात कुठल्या देशावर किती आयातशुल्क लादले जाणार याची यादी जाहीर केली. या ७० देशांमध्ये भारतासह चीनचाही समावेश होता. भारत आणि चीन या दोन्ही देशांवर अनुक्रमे २६ आणि ५४ इतके आयातशुल्क लादण्यात येणार आ
अमेरिकेने लादलेल्या आयातशुल्काची अंमलबजावणी सोमवार ७ एप्रिलपासून सुरु होणार आहे. या आयातशुल्काची धास्ती शेअर बाजाराला पडून सोमवारी २९०० अंशांनी शेअर बाजार कोसळला आहे
अमेरिकेकडून लादल्या गेलेल्या आयातशुल्कामुळे भारतासह जवळपास सर्वच आशियाई बाजारांना जोरदार दणका बसला आहे. भारतीय शेअर बाजाराने तर सोमवारी भूकंप अनुभवला. तब्बल २२२६ अंशांनी शेअर बाजार पडत, सेन्सेक्सने ७३,१३७ अंशांची पातळी गाठली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतासह २५ देशांवर आयातशुल्क लादण्याची घोषणा गुरुवारी करण्यात आली आहे. भारताचाही या देशांमध्ये समावेश केला असून भारतीय वस्तुंवर २७ टक्के आयातशुल्क लादले जाणार आहे. याचा थेट परिणाम म्हणून अमेरिकेला होणारी निर्यात महागणार आहे
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी भारतासह २५ देशांवर आयातशुल्क लादण्याची घोषणा केल्याने भारतीय शेअर बाजाराला कंप भरला. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवारी शेअर बाजार ९३० अंशांनी कोसळला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तुंवर आयातशुल्क लादण्याच्या निर्णयात अखेर भारताचा समावेश झाला आहे. अमेरिकेत आयात होणाऱ्या भारतीय वस्तुंवर २६ टक्के आयातशुल्क लादण्याचा निर्णय घेतला गेला आहे
अमेरिकेकडून भारतावर लादण्यात आलेल्या आयातशुल्क लादण्याची घोषणा केली गेली आहे. त्यामुळे देशातील उद्योगक्षेत्रात खळबळ माजली आहे. अमेरिकेकडून भारतीय मालावर २७ टक्के आयातशुल्क आकारणी करण्यात येणार आहे
मंगळवारच्या जोरदार पडझडीनंतर शेअर बाजाराने यशस्वी पुनरागमन केले आहे. मंगळवारी १४०० अंशांची आपटी खाल्यानंतर बुधवारी शेअर बाजाराने ५९२ अंशांची उसळी घेतली आहे
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतावरही आयातशुल्क लादले जाणार आहे. त्याची अंमलबजावणी २ एप्रिलपासून होईल असे अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अमेरिकेकडून हे आयातशुल्क आकारले जात असले तरी त्यातून भारतालाच मोठा फायदा होणार असल्याचे भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगीतले आहे
जागतिक पातळीवरील आर्थिक उलथापालथ शमण्याची शक्यता निर्माण झाल्याने रुपयाने डॉलरच्या तुलनेत वधारणे सुरु केले होते. परंतु थोड्याच काळात या वाढीला ब्रेक बसला
डोनाल्ड ट्रम्प यांची अलीकडची वक्तव्ये धोक्याचा इशारा देणारी आहेत