कसे जगावे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवले, कसे मरावे हे छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवले, तर उत्तरेकडून आलेले हिरवे वादळ कसे रोखावे हे राणी ताराबाई यांनी स्त्री शक्तीची ताकद दाखवून शिकवले. त्यामुळे नुसते जगण्यापेक्षा काहीतरी कर्तृत्व करुन जगा असे प्रतिपादन दुर्ग अभ्यासक आणि इतिहास संकलक - संशोधक लेखक बाळकृष्ण उर्फ आप्पापरब यांनी रविवारी डोंबिवलीत केले.
Read More
श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड आणि दुर्गसृष्टी प्रतिष्ठान, विक्रोळी यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ इतिहास संकलक मा. श्री आप्पा परब यांच्या ३४ व्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. "युद्धपति श्रीशिव युद्ध पंचअंग कोष" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बुधवार, २ नोव्हेंबर २०२२ रोजी दादर येथील मामा काणे हॉटेल सभागृहात इतिहासप्रेमींच्या मोठया उपस्थितीत पार पडला.
‘कोकण इतिहास परिषदे’च्या ९ व्या राष्ट्रीय अधिवेशनाला प्रारंभ
कोणताही तर्कवितर्क न लावता, केवळ शिवकालीन पत्रे व पुराव्यांच्या आधारांवर आप्पा इतिहास सांगतात. त्यांच्या तोंडून शिवशौर्य ऐकताना ते चित्रच जणू आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते.