अंबरनाथ येथे असलेल्या इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) च्या रेल नीर प्लांटमध्ये लवकरच नवीन पाण्याची लाइन जोडली जात आहे, ज्यामुळे उत्पादन क्षमता वाढेल. उन्हाळ्यात मुंबईतील बहुतांश लोकल रेल्वे स्थानकांवर पाण्याची मागणी वाढते आहे. अनेक वेळा ही मागणी आयरसीटीसीकडून पूर्ण होत नाही. प्लांट सध्या दररोज २ लाख एक लिटर रेल नीरच्या बाटल्या तयार करतो, ज्या १४,००० बॉक्समध्ये पॅक केल्या जातात. रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, नवीन लाईन जोडल्यानंतर ही क्षमता दररोज २०,००० बॉक्सपर्यंत वाढेल.
Read More
पुणे : महाराष्ट्र शासनाचे पर्यटन महामंडळ, विवेक व्यासपीठ आणि संस्कार भारती पुणे महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर सावरकर वीरभूमी परिक्रमा सप्ताहात मी येसुवहिनी या समिधा पुणे प्रस्तुत एक सांगीतिक अभिवाचनाचा कार्यक्रम सेवासदन या शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या अभिवाचनावेळी अवघे सभागृह भारावून गेले होते.
नवरात्रौत्सवादरम्यान 'भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन'तर्फे (आयआरसीटीसी) प्रार्थमिक समभाग विक्रीद्वारे (आयपीओ) सहाशे कोटींचा निधी गोळा करण्याचे उद्दीष्ट्य ठेवले होते. त्यानुसार, मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकावर १०१ पटीने नोंदणी करत समभाग ६४४ रुपयांवर खुला झाला. दिवसभराच्या सत्रात तो ७३४ रुपयांवर पोहोचला होता. तर राष्ट्रीय बाजाराचा निर्देशांक निफ्टीवर ९५.६ टक्क्यांच्या वाढीसह तो ७४३.८० रुपयांवर पोहोचला.