२०१३ च्या वक्फ कायद्याने मुस्लिम कट्टरपंथी आणि भूमाफियांना बळकटी, नरेंद्र मोदींचा तत्कालीन सरकारवर निशाणा
09-Apr-2025
Total Views | 19
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी एका प्रसारमाध्यमाने आयोजित केलेल्या ‘Rising Bharat Summit’ या कार्यक्रमात वक्फ सुधारित विधेयकावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, या सुधारित विधेयकामुळे सामाजिकदृष्ट्या एक पाऊल टाकण्यात आल्याचे म्हटले आहे. २०१३ मध्ये वक्फ विधेयक सुधारणा कायद्यातील दुरुस्तीला मुस्लिम कट्टरपंथी आणि जमिनीच्या दलालांना खूश करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्यानंतर त्यांनी पांबर पुलाविषयी भाष्य केले आणि त्या पुलाच्या विकासाचे महत्त्व पटवून दिले आहे.
मोदींनी तामिळनाडूतील पांबल पुलाचे उद्घाटन केले होते आता त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी सांगितले की, अगदी १०० वर्षांआधी इंग्रजांनी पांबन पूल बांधला होता. मात्र, त्सुनामीमुळे त्या पुलाचे मोठे नुकसान झाले होते. नरेंद्र मोदी म्हणाले की, याआधी काँग्रेस सरकारच्या काळात पुलासंबंधित लोक मागणी करत होते, मात्र तसे झाले नाही. त्यानंतर आमचे सरकार आले आणि नंतर आम्ही पुलाचे काम केल्याचा दावा नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी विलंब करणे म्हणजे विकासाचा शत्रू असल्याचा नारा दिला आहे. गेल्या १०० दिवसांत लष्करासाठी मेड इन इंडिया लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर खरेदीसाठी हिरवा कंदील दर्शवला आणि वक्फ सुधारणा करण्याचे विधेयक मंजूर करण्यात आले, अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली. मोदींच्या मते, हे १०० दिवस म्हणजे १०० हून अधिक निर्णय आहेत, ते एकूण १०० संकल्पांच्या एकूण पूर्ततेबाबत आहेत. त्यांनी मुद्रा योजनेच्या १० वर्षांच्या पूर्ततेबाबतही सांगितले आणि पूर्वी खाते उघडण्यासाठी बँक हमी आवश्यक होती आणि कर्ज हे सामान्य कुटुंबांना कर्ज मिळणे म्हणजे स्वप्नमयच होते.
त्यानंतर त्यांनी माहिती दिली की, गेल्या दशकांत योजनेंतर्गत ५२ कोटी हमीशिवाय देण्यात आले. यामुळे ११ कोटी लोकांना पहिल्यांदाच स्वयंरोजगारासाठी कर्ज मिळाले आहे.यामुळे ११ कोटी लोक हे पहिल्यांदाच उद्योजक होतील.
पुढे मोदी म्हणाले की, मुद्रेच्या माध्यमातून ३७ लाख कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले, अनेर देशांचा जीडीपी तेवढाही नाही. त्यांनी आठवण करून देत अधिकाऱ्यांना शिक्षेच्या नियुक्तीसाठी मागास जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात आले. याआधी मागासलेल्यांना मागास राहू द्यावे अशी मागील सरकारची कल्पना होती. त्यानंतर मोदी म्हणाले की, त्यांच्या सरकारने या जिल्ह्यामध्ये काम केले आणि आज तेच जिल्हे विकासाच्या मार्गावर आहेत. आज तेथील तरुण आम्ही हे करू शकतो, असा विश्वास त्यांच्यात निर्माण झाला आहे.
त्यानंतर मोदींनी वक्फ कायदा सुधारणावरही भाष्य केले आहे. २०१३ मध्ये वक्फ विधेयक सुधारणा कायद्यातील दुरुस्तीला मुस्लिम कट्टरपंथी आणि जमिनीच्या दलालांना खूश करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा नरेंद्र मोदी यांनी केला आहे. वक्फ सुधारित विधेयकामुळे अनेकांचे डोळे उघडून अनेकांच्या डोक्यात प्रकाश पाडण्याचे काम केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी केरळातील ख्रिश्चन कुटुंबाचा व्यवसाय, कर्नाटकातील शेतकरी आणि हरियाणातील गुरुद्वारांवरील वक्फचा व्यवसायाचा उल्लेख करण्यात आला आहे.
मोदी म्हणाले की, फक्त एकच सूचना येते असे आणि लोक स्वतःच्या घरासाठी कागदपत्रे शोधत राहायचे. संपूर्ण समाज आणि मुस्लिमांच्या हितासाठी इतका अद्भुत कायदा केल्याबद्दल देशाच्या संसदेचे अभिनंदन करताना ते म्हणाले की यामुळे वक्फच्या भावनेचेही आणि मुस्लिम महिलांचे रक्षण होईल. संसदोतील ७५ वर्षातील ही दुसरी मोठी लढाई होती. दोन्ही सभागृहांमध्ये एकूण १६ तास चर्चा झाली.