उकाडयात आगीने 'ठाणे' धगधगले - तीन ठिकाणी आगडोंब

गायमुख डम्पिंगमुळे घोडबंदरला धुराचे लोट

    09-Apr-2025
Total Views | 10

Thane Fire
 
ठाणे (Thane Fire): कडाक्याचा उन्हाळा सुरू असताना बुधवारी आगीच्या घटनांनी 'ठाणे' अक्षरशः धगधगले. मंगळवारी रात्री गायमुख जकात नाका येथील डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीने घोडबंदर भागात धुराचे लोट बुधवारी दुपारपर्यत दिसत होते. मंगळवारी रात्री लागलेली ही आग तब्बल १२ ते १३ तासानंतर अग्निशमन दलाने आटोक्यात आणली.
 
घोडबंदर रोड परिसरातील गायमुख जकात नाका येथे कचरा व्यवस्थापनासाठी डम्पिंग ग्राउंड उभारले आहे. मंगळवारी रात्री येथे कचऱ्याला आग लागली. बाळकुम अग्निशमन केंद्राने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे जवान १ फायर वाहन व पाणीपुरवठा विभागाच्या सात वॉटर टँकरच्या मदतीने आग आटोक्यात आणली. आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत एक जेसीबी मशीन व एक पोकलेन मशीनने येथील कचऱ्यातून मार्ग काढण्यात आला. त्यानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. दरम्यान, बुधवारी सकाळच्या सुमारास माजिवडा येथील लोढा क्राऊनमधील इमारत क्रमांक तीन या २१ मजली इमारतीतील १४ व्या मजल्यावरील घरात आग लागली. यात फर्निचर आणि वायरींग जळुन खाक झाली. तर, दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास कौसा, मुंब्रा येथील लव्ह सर्कल जवळील १२ मजली लँड मार्क इमारतीच्या तळमजल्यावरील मीटर बॉक्सला आग लागली.घटनास्थळी टोरंट पॉवर कंपनीचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान रेस्क्यू वाहनासह उपस्थित राहुन आगीवर नियंत्रण मिळवले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
अवैध गर्भलिंगनिदान केंद्रांना बसणार चाप

अवैध गर्भलिंगनिदान केंद्रांना बसणार चाप

कायदेशीररित्या गर्भलिंगनिदान करून बेकायदेशीर गर्भपात करणार्यांना चाप लावण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलली असून अवैध गर्भलिंगनिदान केंद्राची माहिती देणार्यांना एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक केंद्राची ९० दिवसांनी आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात येत असून उल्लंघन करणार्या आणि त्रुटी आढळणार्या केंद्रांवर कायदेशीर कार्यवाही केली जात आहे. तसेच २०२४-२५ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या नियंत्रणाखाली झालेल्या तपासणीमध्ये चार संशयित केंद्रांवर प्राधिकृत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121