‘बहादूर अम्मी!’

    09-Apr-2025
Total Views | 13
 
 Bahadur Ammi
 
 केरळच्या कट्टरपंथी मुस्लीम समुदायांमध्ये एक नवीन पद्धत रूढ झाली आहे. ज्या महिला रुग्णालयात न जाता बाळाला घरातच जन्म देतात, त्या महिलांना हे लोक ‘बहादूर महिला’ म्हणून सन्मानित करतात. पण, अशा प्रकारे बहादुरी दाखवणार्‍या पाच हजारांपेक्षा जास्त महिला गेल्या पाच वर्षांत केरळमध्ये मृत्युमुखी पडल्या. आसमाही या बहादुरीची बळी ठरली. पाचव्या मुलाला घरात जन्म देताना आसमाला भयंकर रक्तस्राव झाला. पण, तिच्या पतीने सिराजउद्दीनने तिला दवाखान्यात नेले नाही. शेवटी अतिरक्तस्राव होऊन अत्यंतिक वेदनेने ती हकनाक मेली. बिचारी आसमा!
 
आसमा आणि तिचा पती सिराजउद्दीन आणि त्यांची चार मुलं केरळमध्ये चिट्टीपरंबू इथे भाड्याच्या घरात राहायचे. नुकतेच पाचव्या मुलाला घरात जन्म देताना आसमाचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यावर सिराजउद्दीनने तिचा मृतदेह त्याच्या गावी एर्नाकुलम येथे नेला. तिथे घरातच तिचे शव तो पुरत होता. पण, पोलिसांनी त्याला पकडले. सिराजउद्दीनने ठरवून आसमाला दवाखान्यात नेले नाही, असा आरोप काही लोकांनी केला आहे. कारण, सिराजउद्दीन हा युट्युबवर ‘मदावूर काफिला’ नावाचे चॅनेल चालवायचा. यामध्ये ‘घरगुती पद्धतीने इलाज’ यावर तो बोलायचा; म्हणजे तकरीरे करायचा. आधुनिक औषधोपचारवर त्याचा विश्वास नव्हता. तर काही लोकांचे म्हणणे आहे की, दवाखान्यात आधुनिक पद्धतीने उपचार करणे, हे हरामच होते.
 
कारण, बेपर्दा अवस्थेत आसमाला परक्या लोकांनी पाहिले असते आणि तिला स्पर्शही केला असता असेही सिराजउद्दीनला वाटत असावे, म्हणून त्याने तिला दवाखान्यात नेले नाही. तसेही मुस्लीम वस्त्यांतील काही लोकांनी आधुनिक उपचाराला विरोध केला, अशा घटना जगभरात घडत असतात. याच आयामातील संकल्पना म्हणजे, महिलांनी मुलांना घरातच जन्म द्यायचा. एक आई आपल्या बाळाला जन्म देते, तेव्हा तिचा पुनर्जन्म होतो असे म्हणतात. आसमाच्या मृत्यूबाबत वाटते की, बाळाला जन्म देण्याच्या त्या पुर्नजन्माच्या क्षणी आरोग्य सेवा नाकारणार्‍यांना त्या बाईच्या, त्या आईच्या वेदना कशा समजणार? या अनुषंगाने केरळमधल्या त्या काही लोकांची ‘बहादूर अम्मी’ ही संकल्पना खूप विचार करायला लावते. हिजाबसक्ती, बहुपत्नीत्व, तिहेरी तलाक, हलाल याबद्दल आपण ऐकत असतो. आता ही ‘बहादूर अम्मी’
 
कर्नाटकचे काँग्रेसराज!
 
र्नाटकचे गृहमंत्री जी परेमश्वर म्हणाले की, “मोठ्या शहरात अशा घटना घडत असतात.” ‘अशा’ म्हणजे कशा घटना? तर पूर्व बंगळुरुमध्ये एक महिला रस्त्याने चालली होती. इतक्यात पाठीमागून एक इसम आला. त्याने तिला पकडले आणि तिच्यावर अत्याचार करू लागला. तिने त्याच्याविरुद्ध निकराचा प्रतिकार केला. त्यामुळे आरोपीने तिथून पळ काढला. याबाबत एका व्यक्तीने समाजमाध्यमावर व्हिडिओ पोस्ट करत माहिती दिली. प्रसारमाध्यमावर या घटेनची वाच्यता केल्यामुळे कर्नाटक पोलिसांना दखल घ्यावी लागली. आरोपीवर गुन्हाही दाखल करण्यात आला. भर रस्त्यात एका महिलेचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न झाला. पण, कर्नाटक काँग्रेसचे नेते परमेश्वर यांना अजिबात गंभीर वाटत नाही. नव्हे, कर्नाटकच्या रस्त्यावर महिलांवर असे अत्याचार झाले, तर ते काही गंभीर स्वरूपाचा गुन्हा नाही, असेच त्यांना म्हणायचे आहे का?
 
काँग्रेसमध्ये ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ सिनेमातलेे ‘बडे बडे शहरोमें छोटी छोटी बाते होती हैं सॅनोरिटा’ हे वाक्य खूपच आवडीचे आहे, असे दिसते. त्यामुळेच तर परमेश्वर या काँग्रेसी नेत्याला एका महिलेवरचा अत्याचार म्हणजे मोठ्या शहरात घडणारी नेहमीची घटना वाटते. गृहमंत्री म्हणजे राज्याचा एकप्रकारे कायदा-सुव्यवस्थेसंदर्भातला पालकच. पण, कर्नाटकच्या कायदा- सुव्यवस्थेचा पालकच महिला अत्याचाराबद्दल जराही गंभीर नाही. आता काय कर्नाटकच्या महिलांनी अत्याचार झाल्यावर अत्याचार मुकाट सहन करायचा का? त्यांनी असेच समाजायचे का, की मोठ्या शहरात अशा घटना घडत असतात, त्यात काय इतके? बरं, परेमश्वर मागे कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्रिसुद्धा होते. ते आठ वर्षे कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष होते.
 
कर्नाटक राज्याची धुरा या असल्या माणसाकडे देण्यामागे काँग्रेस पक्षाचे काय बरं उद्दिष्ट असेल? परमेश्वरने असे का म्हटले, याचे स्पष्टीकरण काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी प्रियांका गांधी किंवा मल्लिकार्जुन खर्गे तरी विचारतील का? हेच जर भाजपशासित राज्यात भाजप नेत्याने-मंत्र्याने म्हटले असते तर? तर किती गदारोळ उठला असता, याची फक्त कल्पना करा. दुसरीकडे काँग्रेसशासित राज्यांत असेच होणार, अशी धारणा जनतेची झाली की काय, असे वाटते! शेवटी सत्तागुण आणि प्रतिमा आपली आपली!
 
अग्रलेख
जरुर वाचा
हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

Kancha Gachibowli तेलंगणा राज्यातील हैदराबाद विद्यापीठाच्या नजीक असणाऱ्या कांचा गचिबोवली (Kancha Gachibowli) ही ४०० एकर जंगलतोड करण्यात आली. तेलंगणा सरकारने आयटी कंपनी उभारण्यासाठी ही जागा घेतली होती. मात्र त्यांनी जंगलातील झाडे कापून नैसर्गिक हानी केली आहे. यामुळे संबंथित विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलन केले होते. कांचा गचिबोवली जंगलात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक करणासाठी फायदेशीर जंगल होते. यालाच देशभरातून विविध माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. याच पद्धतीने आता ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121