पालघरमधील वाडा, मोखाडा तालुक्यात अवकाळी पावसाने अतोनात नुकसान! प्रशासनाकडून पंचनामे सुरू

    08-Apr-2025   
Total Views | 11

unseasonal rain in palghar
पालघर : (Palghar Unseasonal Rain) पालघर जिल्ह्यामधील वाडा, मोखाडा या तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या घरांचे, तसेच आंबा, चिकू या फळबागांसह इतर शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी घरांचे नुकसान झाले असून वीजपुरवठा देखील खंडीत झाला होता. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावल्याने शेतकरी चिंतेत असून सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी करत आहे. याबाबत प्रशासनाकडून पंचनामे करण्यात येत आहेत.
 
कोसबाड येथील हवामान खात्याने ३१ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार, ४ एप्रिल रोजी वाडा, मोखाडा या तालुक्यांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला होता.तर अनेक ठिकाणी गारपीट झाली होती. या अवकाळी पावसामुळे येथील नागरिक व शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली होती. वादळी वाऱ्याने झाडे उन्मळून पडली, तर अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला होता. आंबा, चिकूच्या फळबागा, इतर भाजीपाला यांसह हरभरा, तुर, वाल, भुईमूग, यांसारखी कडधान्ये पिके काढणीसाठी तयार झाली होती. या पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी होऊन नुकसान झाले आहे.
 
प्रशासनाने याबाबत पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे आदेश कृषि व महसूल विभाग कार्यालयाला दिले होते, त्यानुसार प्राथमिक अहवाल महसूल प्रशासनाकडे प्राप्त झाला असून अंतिम अहवाल मात्र प्रतिक्षेत आहे. यानंतरच निश्चित नुकसान किती प्रमाणात झाले आहे हे ठरणार असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.
 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\
अग्रलेख
जरुर वाचा
हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

Kancha Gachibowli तेलंगणा राज्यातील हैदराबाद विद्यापीठाच्या नजीक असणाऱ्या कांचा गचिबोवली (Kancha Gachibowli) ही ४०० एकर जंगलतोड करण्यात आली. तेलंगणा सरकारने आयटी कंपनी उभारण्यासाठी ही जागा घेतली होती. मात्र त्यांनी जंगलातील झाडे कापून नैसर्गिक हानी केली आहे. यामुळे संबंथित विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलन केले होते. कांचा गचिबोवली जंगलात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक करणासाठी फायदेशीर जंगल होते. यालाच देशभरातून विविध माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. याच पद्धतीने आता ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121