मुंबई : पॉपकॉर्न तयार ठेवा, पांघरुणात शिरा आणि रिमोट हातात घ्या – कारण एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात ओटीटीवर धमाका होणार आहे! ज्या गोष्टींची आपण थिएटरमध्ये चुकवली, त्या आता घरी बसून अनुभवता येणार आहेत. आणि हो – काही फ्रेश रिलीजेस पण आहेत जे WEEKEND BINGE WORTHY आहेतच!
'छावा' : शौर्य, इतिहास आणि सिनेमा एकत्र!
१४ फेब्रुवारीला थिएटरमध्ये धडकलेला विकी कौशलचा छावा, आता अखेर नेटफ्लिक्सवर ११ एप्रिलपासून येतोय. ६०० कोटींचा गल्ला जमवलेला हा ऐतिहासिक चित्रपट तुम्ही अजून पाहिला नसेल, तर आता घरीच संभाजी महाराजांचा पराक्रम अनुभवायला विसरू नका. रश्मिका मंदना, अक्षय खन्ना, आणि संतोष जुवेकरसारखी दमदार टीम यामध्ये आहे.
'छोरी २' : नुसरतचा हॉरर अवतार परततोय!
११ एप्रिलपासून प्राइम व्हिडिओवर ‘छोरी 2’ रिलीज होतोय. पहिल्या भागात नुसरतने जीव तोडून अभिनय केला होता आणि आता ती परत आलीये एका नव्या भयावह कहाणी घेऊन. गश्मीर महाजनी आणि सोहा अली खानही आहेत यात.
'ब्लॅक मिरर सीझन ७' : भविष्यातलं वास्तव
नेटफ्लिक्सवर १० एप्रिलला 'ब्लॅक मिरर'चा सातवा सीझन येतोय. टेक्नोलॉजी, मानवी भावना, आणि विचित्र कल्पना यांचं कॉम्बिनेशन पाहायचं असेल तर ही सीरिज परफेक्ट आहे.
'द लास्ट ऑफ अस – सीझन २'
१४ एप्रिलला जिओ सिनेमा (हॉटस्टार नव्हे यंदा जिओने राइट्स घेतलेत!) वर येतोय. सीझन १ ने जगभरात फॅन्स कमावले, आता दुसऱ्या सीझनमध्ये कथा अजून गडद आणि भावनिक होणार आहे.
'द लीजेंड ऑफ हनुमान' : सीझन ६
हनुमान जयंतीच्या आसपासच ११ एप्रिलला हनुमानाच्या साहसांची अॅनिमेटेड सफर पुन्हा सुरू होणार आहे. जिओ सिनेमा वर घरात मुलं असतील, की ही सीरिज मिस करायची नाही.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.