दोडामार्ग - हत्तीच्या हल्ल्यात शेतकऱ्याच्या मृत्यू

    08-Apr-2025
Total Views | 316
farmer death in elephant attack



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
सिंधुदुर्गात जिल्ह्यातील दोडामार्गात हत्तीच्या हल्ल्यात लक्ष्मण यशवंत गवस या शेतकऱ्याच्या मृत्यू झाला आहे (farmer death in elephant attack). मंगळवार दि. ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ते काजूबागेत गेले असता त्याठिकाणी फणस खाणाऱ्या हत्तीने त्यांच्यावार हल्ला केला (farmer death in elephant attack). या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी हत्ती पकड मोहिमेची पुन्हा एकदा मागणी केली आहे. (farmer death in elephant attack)
 
 
दोडामार्ग जिल्ह्यातील मोर्ले गावातील ६५ वर्षीय शेतकरी यशवंत गवस हे मंगळवारी काजू बागेत फेरफटका मारण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी पायवाटेच्या वरच्या बाजूला ओमकार नावाचा निमवयस्क तस्कर हत्ती फणस खात होता. गवस हे हत्तीच्या नजेरस पडताच त्याने गवस यांचा पाठलाद केला. बांबू बेटामध्ये त्यांना पकडून फेकून दिले. पुढे सोंडेने हात मोडला आणि नंतर त्यांच्या शरीरावर पाय ठेवला. हत्तीच्या या जोरदार हल्ल्यामुळे गवस यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
 
 
या प्रकारामुळे हत्ती पकड मोहिमेची मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. सध्या सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर मिळून आठ रानटी हत्तींचा वावर याठिकाणी आहे. यामधील काही हत्ती हे चंदगड, आजरा या भागात असून काही हत्ती हे दोडामार्ग तालुक्यात आहे. ओमकार नामक निमवस्यक हत्ती हा कळपापासून वेगळा झाला असून तो स्वतंत्रपणे वावरत आहे. या हत्तींमुळे होणारी पिकनुकसानी ही मोठ्या प्रमाणावर आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी हत्ती पकड मोहिमेची मागणी पूर्वीपासूनच जोर लावून धरली आहे. अशात आता जीवितहानी झाल्याने हत्ती पकड मोहिमेच्या मागणीने जोर धरला आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121