नवी दिल्ली: ( court verdict on Kunal Kamras prearrest petition ) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल मुंबईत दाखल झालेल्या एफआयआर संदर्भात कुणाल कामरा यास देण्यात आलेले अंतरिम संरक्षण मद्रास उच्च न्यायालयाने १७ एप्रिलपर्यंत वाढवले आहे.
न्यायमूर्ती सुंदर मोहन यांनी कामरा यास दरम्यानच्या काळात संबंधित न्यायालयांशी संपर्क साधण्यासाठी पावले उचलण्याचे आदेश दिले. कामरा याच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे आणि त्यावर आज म्हणजे मंगळवारी सुनावणी होईल, या याचिकाकर्त्याच्या निवेदनाचीही खंडपीठाने नोंद घेतली.