अहमदाबादमध्ये रामनवमीची तयारी करताना वाजिद शहंशाहने भाजपचा झेंडा फाडला

    07-Apr-2025
Total Views | 63

Ram Navami
 
गांधीनगर : रामनवमी (Ram Navami) केवळ देशातच नाहीतर जगभरात साजरी करण्यात आली. याच उत्सवादरम्यान काही ठिकाणी कट्टरपंथी जिहाद्यांनी दगडफेक रत शोभायात्रेला गालबोट लागले आहे. गुजरात राज्यातील अहमदाबादमध्ये काही जिहाद्यांनी रामनवमी दिवशीच भाजपचा झेंडा फाडला आहे. त्यानंतर हिंदूंच्या आस्थेवर बोच दाखवत शिवीगाळ केली आहे. ही घटना ६ एप्रिल २०२५ रोजी घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवीगाळ करणाऱ्या कट्टरपंथी मुस्लिमाचे नाव वाजिद शहंशाह असे आहे. त्यानेच शहरातील शांतता भंग केल्याचा आरोप आहे.
वाजिद शहंशाने अहमदाबादमधील दानीलिमडात रावनवमीच्या पार्श्वभूमीवर अयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. अशावेळी अनेक भाजपच्या कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली होती. पीरकमल मशि‍दीच्या नजीक असणारे स्वामीनारायण वसतीगृहाच्या मैदानावर कायर्कर्ता संमेलनाचे आयोजन करण्यात आले. याच कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे झेंडे फडकावण्यात आले होते. ज्यामुळे कार्यक्रमाच्या स्थळी भगवे वातावरण झाले होते. अशातच जिहादी वृत्ती असलेल्या वाजिद शहंशाहने फडकवण्यात आलेला झेंडा फाडला आणि फेकून दिला. त्यानंतर त्याने उपस्थित भाजप कार्यकर्त्यांना शिवीगाळ केली.
 
 
एवढंच नाहीतर, त्याने भाजपच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ केली. यावेळी इतर काही लोकांना जिहाद्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने पुन्हा जातिवाचक वक्तव्य केली, त्यानंतर त्याला धक्के मारत त्याला त्या ठिकाणाहून पाठवण्यात आले. यावेळी दोन्ही बाजूने लोक एकजूट होऊ लागले होते. ज्यात असंख्य मुस्लिमांचा जमाव होता. भाजपच्या कार्यकर्त्यांनी शहंशाहने केलेल्या कृत्याचा निषेध करत निदर्शने केली आहेत आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहेत.
यावेळी भाजप कार्यकर्त्याने हल्लेखोराचे अनेक व्हिडिओज आणि फोटो पुरावा म्हणून ठेवले आहेत. यावेळी प्रसारमाध्यमाच्या काही पत्रकारांनी पोलिसांसोबत घडलेल्या घटनेची माहिती मिळावली. त्यावेळी पोलिसांनी लवकरात लवकर पकडण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121