रिलायन्स जिओचे खास उन्हाळ्यासाठी ‘डिस्काऊंट डेज’ ऑफर
इलेक्ट्रॉनिक्सवर तब्बल २५ हजार रुपयांपर्यंत सूट मिळणार
07-Apr-2025
Total Views | 8
मुंबई : अल्पावधीतच भारतीयांच्या पसंतीस पडलेल्या रिलायन्स जिओकडून आता उन्हाळी सुट्टीत ग्राहकांसाठी विशेष ऑफर जाहीर करण्यात आली आहे. रिलायन्स जिओकडून डिजीटल डिस्कांऊंट डेज ऑफर जाहीर करण्यात आली आहे. भारतातील या सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स सेलमध्ये कार्ड पेमेंट्सवर तसेच पेपर फायनान्सवर तब्बल २५ हजारांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. ही ऑफर ५ एप्रिल ते २० एप्रिल असे १५ दिवस असणार आहे.
या ऑफर सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तुंवर रिलायन्स माय जिओ, रिलायन्स डिजीटल यासर्व शोरुम्समध्ये तसेच रिलायन्स डिजीटलच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहेत. सोपे फायनान्सिंग, ईएमआयची सुविधा, जलद डिलीव्हरी आणि इन्स्टॉलेशनसह सर्व सुविधा या मध्ये देण्यात आल्या आहेत. यामुळे या सुविधांच्या वापरामुळे भारताला अपग्रेड होण्यास मदत होणार आहे. अपग्रेडेशनसाठी हीच योग्य संधी असणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त भारतीयांनी त्याचा फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
या मध्ये दीड ते ३ टन एसी, २६९९० रुपयांपासून सुरु होत आहेत. यानंतर रेफ्रिजरेटर ६१९९० रुपयांत, लॅपटॉप ३० हजारांपासून सुरु होत आहेत तर याच सेलमध्ये आपल्याला सर्वोत्तम किंमतीत मोबाईल फोनसुध्दा मिळत आहेत त्यामुळे सर्व ग्राहकांसाठी यासर्व अतिशय आकर्षक आणि किफायतशीर ऑफर्स असणार आहेत.
टीव्ही आणि त्यासाठीची उपकरणे, वॉशर ड्रायर, ॲपल एअर पॉड्स ईएमआयवर उपलब्ध आहेत. ॲपलची घड्याळे हे सर्वच आपल्याला इथे किफायतशीर आणि आकर्षक दरांत उपलब्ध असणार आहेत. रिलायन्स जिओकडून जाहीर झालेल्या या खास उन्हाळी ऑफरचा जास्तीत जास्त नागरिकांनी फायदा घेऊन, अत्याधुनिक गोष्टींनी आपले घर सजवावे असे आवाहन करण्यात आले आहे.