पुढच्या निवडणूकीपर्यंत उद्धव ठाकरेंची शिवसेना...; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा

    07-Apr-2025
Total Views | 25
 
Raosaheb Danve Uddhav Thackeray
 
जालना : काँग्रेस आणि राष्ट्रवादी संपलेली असून पुढच्या निवडणूकीपर्यंत उद्धव ठाकरेंची शिवसेना राहत नाही, असा दावा भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केला आहे. रविवार, ७ एप्रिल रोजी जालना येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
 
हे वाचलंत का? -  किरीट सोमय्यांना धमकी! काय आहे प्रकरण?
 
यावेळी बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, "एक काळ असा होता की, शिवसेनेचे ३ आमदार आणि भाजपचा मी एकटाच आमदार होतो. आजचा काळ असा आहे, भाजपचे तीन आणि शिवसेनेचे दोन आमदार आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे कोणी आहे का आता? म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची किती ताकद होती. पण आज त्यांच्या वागण्यामुळे, व्यवहारामुळे आणि लोक त्यांच्या विचारापासून दूर गेल्यामुळे काँग्रेस जवळपास संपुष्टात आली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) संपलेला आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पुढच्या निवडणुकीपर्यंत राहत नाही," असा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121