कोलकाता : प. बंगाल राज्यातील कोलकातामध्ये रामनवमी (Ram Navami) शोभायात्रेत काही जिहाद्यांनी रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी दगडफेक केल्याचा दावा भाजपने केला. भाजपने दावा केला की, ते शोभायात्रेतून परतत असताना दगडफेक करण्यात आल्याचा दावा भाजप नेत्याने केला आहे. संबंधित परिस्थिती लक्षात घेऊनही पोलिसांनी दावा फेटाळला आहे.
रामनवमीवर शोभायात्रेवरून वादाला तोंड फुटल्याचा भाजपने दावा केला आहे. भाजपचे खासदार आणि केंद्रीय मंत्री सुकांता मजमुमदार म्हणाले की, कोलकातामधील पार्क संर्कस सेवनमध्ये रामनवमी शोभायात्रेवर हल्ला करण्यात आला. त्यावेळी भगवे झेंडे लावण्यात आलेल्या वाहनांवर जिहाद्यांनी दगडफेक करत उन्माद केला आहे. शोभायात्रेसाठी परवानगी घेतली नसल्याचे कारण पोलिसांनी पुढे केले आहे.
As the Ram Navami procession returned, Hindu devotees were savagely attacked in Kolkata’s Park Circus Seven Point area. Stones rained down on vehicles just for carrying saffron flags. Windshields shattered. Chaos unleashed. This wasn’t random—it was targeted violence. And where… pic.twitter.com/Ed74Xbi2K6
— Dr. Sukanta Majumdar (@DrSukantaBJP) April 6, 2025
केंद्रीय मंत्री आणि बंगालचे भाजपाध्यक्ष सुक्रांत मजूमदार यांनी सोशल मीडियावरील एक्स वर एक पोस्ट केली. ज्यात रामनवमी उत्सवानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली होती. त्यावेळी हिंदू श्रद्धाळूंवर दगडफेक करत हल्ला करण्यात आला. भगवे झेंडे घेऊन शोभायात्रा काढण्याऐवजी वाहनांवर दगडफेक करण्यात आली. वाहनांची तोडफोड करण्यात आली आणि यामुळे अराजकतेला पुन्हा एकदा नव्याने पाठबळ मिळाले. हे सर्व सुरू असताना पोलीस कुठे होते? असा त्यांनी प्रश्न उपस्थि केला. त्यानंतर ते पुढे म्हणाले की,प. बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनींच पोलीस प्रशासन पथक हताळले आहे. मतांसाठी तुष्टीकरण करत असल्याचा दावा भाजपने केला आहे. निष्पाप असणाऱ्या हिंदूंच्या मतदीसाठी त्यांनी कधीच रक्षा केली नाही.
त्यांनी संबंघधित घडलेल्या घटनेचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर शेअर केला आणि लिहिले की, रामनवमीदरम्यान, बंगाली हिंदूंच्या एकजुटीने व्यवस्थेला हलवून टाकले आहे. ममता आता भयभीत झाल्या आहेत, ही तर सुरुवत आहे. पुढील वर्षी याहून मोठी शोभायात्रा काढणार आहोत. दगडफेकणारे आमच्यावर फुलांचा वर्षाव करतील.