मणिपूरात भाजप मुस्लिम नेत्याने वक्फ सुधारणा विधेयकास पाठिंबा दिल्याने जिहाद्यांनी जाळले घर
07-Apr-2025
Total Views | 33
इंफाळ (Waqf Amendment Bill) : मणिपूरमध्ये रविवारी रात्री भाजपचे अल्पसंख्यांत मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अस्कर अली यांनी वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा दिल्याने काही जमावाने त्यांचे घर जाळले आहे. अस्कर यांनी वक्फ सुधारणा कायद्याचे समर्थन करण्यात आले आहे. ही घटना थौबल जिल्ह्यात घडली आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली होती. त्यांच्या निवासस्थानाबाहेर संतप्त जमाव जमला होता. नंतर जमावाने घराची तोडफोड केली आणि आग लावण्यात आली.
And it begins in Manipur like we suspected.
The house of Manipur BJP minority morcha chief Asker Ali was set on fire by an Islamist mob for his support to the Waqf Act. pic.twitter.com/Jx5nclK87J
समाज माध्यमावर अलीने या कायद्याचे समर्थन केले होते. यावर आता संतप्त झालेल्या जमावाने कायदा हातात घेत घर जाळले आहे. घटनेप्रसंगी अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, रात्री ९ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली होती आणि त्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला ज्यात त्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला असून ज्यात अस्कर अलीने माफी मागितली आहे. इंफाळमधील विविध भागांमध्ये वक्फ सुधारणा विधेयक कायद्याविरोधात निदर्शने दर्शवण्यात आली आहेत. या रॅलीत पाच हजार लोक उपस्थित होते. निषेधामुळे, लिलाँगमधील राष्ट्रीय महामार्ग १०२ वरील वाहतूक विस्कळीत झाली होती. काही ठिकाणी निदर्शक आणि सुरक्षा दलांमध्ये चकमकी झाल्या.
अगदी अशीच एक घटना थौबलमधील इरोंग चेसाबात घडली आहे. निदर्शकांनी भाजपच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली आणि कायद्याचा निषेध केला आहे. खोऱ्यातील असणाऱ्या मुस्लिमबहुल भागात सुरक्षा वाढवण्यात आली आहे आणि अतिरिक्त सैन्यही तैनात करण्यात आले आहेत. मंजूर करण्यात आलेल्या वक्फ विधेयक सुधारणा विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे.