वक्फ सुधारणा विधेयकावर भाष्य केल्याने कॅब चालक वसीमने शिवीगाळ करत माजी कर्नलला केली मारहाण
07-Apr-2025
Total Views | 46
लखनऊ (Waqf Bill): उत्तर प्रदेशातील निवृत्त लष्कर असलेले सर्य प्रताप सिंह यांनी एका कॅबमधून प्रवास करताना वक्फ सुधारणा विधेयकावर भाष्य केले. त्यावेळी कॅब ड्रायव्हरने प्रवास करणाऱ्या माजी कर्नलला मारहाण करत शिवीगाळ केली. कॅब चालक इथपर्यंत न थांबता त्याने गाडी थांबवली, त्याच्या काही मित्रांना बोलावत त्याने कर्नल सिंग यांच्यावर हल्ला करत बेदम मारहाण केली आहे. दरम्यान कॅब चालकाचे नाव हे वसीम असल्याची माहिती समोर आली आहे.
ही घटना रविवारी घडली असून निवृत्त लष्कर सूर्य प्रताप सिंह हे एका कॅबमधून कानपूरहून लखनऊला जात होते. त्यावेळी हा प्रकार घडला आहे. हा घडलेला सर्व प्रकार व्हिडिओत रेकॉर्ड करण्यात आला. संबंधित व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर दिसते की, निवृत्त असणार्या कर्नलला चालताही येत नव्हते. व्हिडिओत कर्नल रस्त्यावर धडपडत एका युवकाचा पाठलाग करताना दिसत आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कर्नलला बेदम मारहाण करण्यात आली आणि ते चालण्यास असमर्थ झाले. पीटीआयने व्हिडिओच्या आधारे वृत्त समोर आले की, तो मद्यवस्थेत होतो, ते कानपूरातील जिल्हा सैनिक पुनर्वसन कल्याण मंडळातील अधिकारी पदावर कार्यरत आहेत. संदर्भात त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण फोन बंद होता. ही घटना शनिवारी रात्री उशिरा अचलगंज पोलीस ठाणे परिसरात आझाद मार्ग चौकात घडली आहे.