मुंबई: ( Ayodhya city occasion of Shri Ram birth anniversary ) रामनवमीनिमित्त अयोध्येत उत्साहाचे वातावरण होते. श्रीराम जन्मोत्सवाच्या आनंदात संपूर्ण अयोध्यानगरी तल्लीन झाली होती. रविवार, दि. ८ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता श्रीराम मंदिरात राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी श्रीरामललाच्या कपाळी लावण्यात आलेल्या सूर्यतिलकाचे दर्शन सार्या भाविकांनी घेतले. गेल्यावर्षीसुद्धा अशा प्रकारे सूयर्र्तिलक लावण्यात आला होता. श्रीराम नवमीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत पोहोचले होते. राम मंदिरासह अयोध्येतील सर्व मंदिरे फुलांनी सजवण्यात आली होती.
‘रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’चे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, “सकाळी प्रभू श्रीरामाचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत प्रभूंचा शृंगार झाला. त्यानंतर नैवेद्य दाखवण्यात आला. दुपारी १२ वाजता जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर आरती करण्यात आली. देवाला ५६ प्रकारचा भोगही दाखवण्यात आला होता. विशेष म्हणजे दहा विद्वान पंडित एक लाख श्रीराममंत्राचा जप यावेळी करताना दिसले.
मंदिर परिसरातील संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि पवित्र झाले होते. हा ऐतिहासिक क्षण प्रत्येक भाविकांपर्यंत पोहोचावा, यासाठी अयोध्येत ठिकठिकाणी एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या होत्या. उन्हाळ्याची वेळ असल्याने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. येणार्या भाविकांसाठी पाण्याच्या बाटल्यांचीही व्यवस्था केली. लोकांना उन्हात उभे राहावे लागू नये, यासाठी हनुमानगढीभोवती तात्पुरत्या तंबूची व्यवस्था करण्यात आली आहे. ठिकठिकाणी कुलरही बसवण्यात आले होते.
अयोध्येत सातत्याने स्वच्छता व्यवस्था ठेवण्यात आल्याचे दिसून आले. सार्या भाविकांनी घेतले. गेल्यावर्षीसुद्धा अशा प्रकारे सूयर्र्तिलक लावण्यात आला होता. श्रीराम नवमीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत पोहोचले होते. राम मंदिरासह अयोध्येतील सर्व मंदिरे फुलांनी सजवण्यात आली होती.
राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून श्रीराम नवमीच्या शुभेच्छा
श्रीराम नवमीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, “श्रीराम नवमीच्या पवित्र सणानिमित्त सर्व देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा. हा सण धर्म, न्याय आणि कर्तव्याचा संदेश देतो. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांनी मानवजातीसाठी त्याग, वचनबद्धता, सौहार्द आणि शौर्याचे सर्वोच्च आदर्श मांडले आहेत. त्यांची रामराज्याची संकल्पना आदर्श मानली जाते. याप्रसंगी सर्व देशवासीयांनी विकसित भारताच्या निर्मितीसाठी एकत्रितपणे काम करण्याची प्रतिज्ञा घ्यावी, अशा शुभेच्छा देते,” असेही राष्ट्रपती म्हणाल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुभेच्छा देताना म्हणाले की, “प्रभू श्रीरामाच्या जन्मोत्सवाचा हा पावन प्रसंग आपल्या सर्वांच्या जीवनात नवीन चेतना आणि उत्साह घेऊन येवो, जो सशक्त, समृद्ध आणि समर्थ भारताच्या संकल्पाला सातत्याने नवीन ऊर्जा प्रदान करो.” तसेच, “रामनवमीचा पवित्र सण तुम्हा सर्वांच्या आयुष्यात आनंद, शांती आणि समृद्धी घेऊन येवो,” अशा शुभेच्छा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्या.