३१ मे पर्यंत मुंबई उपनगरातील रस्त्यांची कामे पूर्ण करा! पालकमंत्री आशिष शेलार यांचे पालिका अधिकाऱ्यांना निर्देश

    07-Apr-2025
Total Views | 7
 
Ashish Shelar
 
मुंबई : मुंबई उपनगरात ज्याठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत ती ३१ मे पर्यंत पुर्ण करा. तसेच रस्त्याची कामे पुर्ण केल्याचा रस्ते निहाय अहवाल पंधरा दिवसात द्या, असे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री अँड आशिष शेलार यांनी सोमवार, ७ एप्रिल रोजी पालिका अधिकाऱ्यांना दिले.
 
पालकमंत्री अँड आशिष शेलार यांनी वांद्रे पश्चिम विभागात सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामाची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर आणि संबधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "मुंबई उपनगरात ज्याठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत ती ३१ मे पर्यंत पुर्ण करा. आता कोणतेही नवीन काम हाती घेऊ नका. रस्त्याची कामे पुर्ण केल्याचा अहवाल रस्ते निहाय पंधरा दिवसात द्या. तसेच पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्या," अशा सूचना त्यांनी दिल्या.
 
हे वाचलंत का? -  सायबर गुन्हे रोखण्यासाठी मुंबई पोलीस दल सक्षम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 
३१ मे पर्यंत होतील तेवढे पूर्ण करा
 
एच पश्चिम विभागातील वांद्रे, खार, सांताक्रूझ पश्चिममधील ७४ रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे सुरु आहेत. या कामांची पाहणी केल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना काही निर्देश दिले. प्रत्येक रस्त्याप्रमाणे त्याठिकाणी असलेल्या उपायुक्तांच्या समन्वयाच्या अंतिम तारखा ठरवणे आणि ३१ मे आधी ते पूर्ण करणे. ज्या ठिकाणी युटीलीटी आहे त्यांचे नुकसान झाले असल्यास त्याचा अहवाल मुंबई महापालिकेने घ्यावा. एच पश्चिममध्ये त्यावर काय कारवाई करणार?, ३१ मे आधी कसं पूर्ण करणार? याचे वेळापत्रक पूर्ण करावे. फेज-१ आणि फेज-२ या दोन्ही कंत्राटदाराच्या पॅकेजमधले जे मोठे रस्ते आहेत ते ३१ मे पर्यंत होतील तेवढे पूर्ण करावे. नवीन रस्ते खोदू नये. गुरु नानक पार्क, खार जिमखाना, बांद्रा जिमखाना, दौलत नगर आयलँड येथील वर्तुळाकार रस्ते मधुपार्क सहित सांताक्रूझपर्यंत पूर्ण करावे. अतिरिक्त आयुक्तांनी प्रत्येक रस्त्याशः पूर्णत्वाचा अहवाल १५ दिवसांत द्यावा," असे निर्देश आशिष शेलार यांनी दिले.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121