ट्रम्प-मस्क यांच्याविरोधात अमेरिकन नागरिक रस्त्यावर

- नोकर्‍या कपात आणि सामाजिक धोरणांचा निषेध

    07-Apr-2025
Total Views | 12
 
 American citizens against Trump Musk
 
वॉशिंग्टन: ( American citizens against Trump-Musk ) गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक निर्णयांचा धडाका लावला आहे. त्यामुळे बेकायदेशीर स्थलांतरितांचा मुद्दा, नवीन टॅरिफ धोरण (आयात शुल्क) किंवा अमेरिकेतील कर्मचारी कपातीचा निर्णय यांचा समावेश आहे.
 
दरम्यान, ट्रम्प यांच्या निर्णयाचा जगभरातील अनेक देशांना फटका बसला आहे. याबाबत डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे सल्लागार एलॉन मस्क यांच्याविरोधात अमेरिकेत मोठ्या प्रमाणात नागरिक निदर्शने करीत आहेत. या निषेधाला ’हँड्स ऑफ’ असे नाव देण्यात आले आहे. ‘हँड्स ऑफ’ म्हणजे आपल्या हक्कांपासून दूर राहणे.
 
डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्या धोरणांविरोधात अमेरिकन नागरिक ‘हॅण्ड्स ऑफ’ असे पोस्टर्स हातात घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. सरकारी नोकर्‍यांमध्ये कपातीचा निर्णय, देशाची अर्थव्यवस्था, मानवाधिकार आणि टॅरिफ धोरण अशा मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन नागरिकांनी शनिवार आणि रविवारी मोठ्या प्रमाणात मोर्चे काढले आहेत.
 
काही दिवसांपूर्वी युनायटेड स्टेट्समधील सरकारी जमिनींचे व्यवस्थापन आणि माजी सैनिकांची काळजी घेणार्‍या कर्मचार्‍यांमध्ये मोठी कपात करण्यात आली. गृह, ऊर्जा, माजी सैनिक व्यवहार, कृषी, आरोग्य आणि मानवी सेवा अशा विभागांतील कर्मचार्‍यांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली. अशा वेगवेगळ्या निर्णयांच्या निषेधार्थ आता अमेरिकन नागरिकांनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला.
 
डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे सल्लागार एलॉन मस्क ज्या पद्धतीने देश चालवत आहेत, त्याचा नागरिकांनी निषेध व्यक्त केला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने घेतलेल्या धोरणांचा विरोध करत निदर्शकांनी आर्थिक धोरणांबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच, काही निदर्शकांनी “डोनाल्ड ट्रम्प आपल्याला जागतिक मंदीमध्ये ढकलतील,” असेही सांगितले. या आंदोलनामध्ये ‘नागरी हक्क संघटना’, ‘कामगार संघटना’, ‘वकील संघटनां’सह यूएसमधील १५० पेक्षा अधिक संघटना आणि हजारो अमेरिकन नागरिक तब्बल १ हजार, २०० ठिकाणी रस्त्यावर उतरले आहेत.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121