कट्टरपंथी डॉक्टरने आपल्याच अल्पवयीन रुग्णाला उपचाराच्या बहाण्याने धर्मांतरास केली जबरदस्ती
06-Apr-2025
Total Views | 41
भोपाळ : मध्य प्रदेशात एका क्लिनिकमध्ये धर्मांतराचा अनोखा प्रकर घडला आहे. उपचाराच्या नावाखाली कट्टरपंथी मुस्लिम डॉक्टरने एका हिंदू युवतीला आपल्या विश्वासात घेत तिला धर्मातर करण्यास सांगितले होते. तिचे अनेकदा ब्रेनवॉशही करण्यात आले होते. तिच्यावर मानसिक दबाव आणला गेला. कुटुंबाचील सदस्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी डॉक्टर खालिद खानच्या मुसक्या आवळल्या आहेत. खालिद खानवर धार्मिक स्वातंत्र्य कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे प्रकरण जबलपूरच्या तिलवाडा पोलीस ठाणे परिसरातील क्रशन वसाहतीत घडले आहे. जिथे कट्टरपंथी धर्मांध डॉ. खालिद खान होमिओपॅथी क्लिनिक चालवत होता. खालिद खानकडे अनेक रुग्ण उपचारासाठी येत होते. त्यावेळी तो एका हिंदू अल्पवयीन युवतीवर उपचार करत होता. पीडित रुग्ण एका आजाराने ग्रासली असल्याने उपचारासाठी नेहमी डॉक्टरांकडे जात होती. याच काळात डॉक्टरांनी तिचा संपूर्ण विश्वास संपादन करत तिला अनेकदा इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगितला. धर्मांतर करण्यासाठी रुग्णाला अनेक प्रलोभने देण्यात आली होती. चमत्कारिकरित्या बरे होण्याचाही मार्ग दाखवला.
जेव्हा मुलीच्या कुटुंबाला आपल्या मुलीच्या वागण्यात आणि बोलण्यात बदल जाणवला तेव्हा त्यांनी हिंदू संघटनांना माहिती देऊन प्रकरणाची चौकशी करण्यात आली. याप्रकरणी तिलवाडा पोलीस ठाण्याचा तक्रार दाखल करण्यात आली आहे. हिंदू संघटनांचे लोक हे मोठ्या संख्येने तिलवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि अटकेची मागणी करत पोलीस ठाण्याबाहेर धरणे धरले. डॉक्टर खालिद खान परिसरात निष्पाप लोकांचे धर्मांतर केले जात असल्याचा आरोप हिंदू संघटनेच्या लोकांनी केला. ज्याची गांभीर्याने चौकशी होणे गरजेचे आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत डॉक्टरला त्याच्या क्लिनिकमधून ताब्यात घेण्यात आले आणि त्याची चौकशी करण्यात आली.
संपूर्ण प्रकरणामध्ये अतिरिक्त एसपी सूर्यकांत शर्मा म्हणाले की, डॉक्टर खालिद कानने तिलवाडा पोलीस ठाण्यात अटक करण्यात आली, त्याच्यावर एका अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून धर्मांतर करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत सर्व पैलूंचा तपास केला जात आहे. प्राथमिक चौकशीनंतर, मध्ये प्रदेश धार्मिक स्वातंत्र्य कायद्यांतर्गत खालिद खानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर संबंधित असलेल्या क्लिनिकनजीक वास्तव्यास असणाऱ्या काही लोकांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत.
सध्या पोलीस हे आरोपी डॉक्टरशी चौकशी करत आहेत. या प्रकरणात आणखी कोणाचा हात आहे का? असे काही प्रश्न या प्रकरणातून निर्माण होत आहेत.