आगामी महापालिका निवडणुकीत भाजपचाच वरचष्मा : पदाधिकार्‍यांना विश्वास

    06-Apr-2025
Total Views | 16

Dombivli BJP West Mandal President Sameer Chitnis and Dombivli East Mandal President Mukund Pednekar
 
डोंबिवली : (  Dombivli BJP West Mandal President Sameer Chitnis and Dombivli East Mandal President Mukund Pednekar ) केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. ‘शतप्रतिशत भाजप’ हे धोरण पूर्वीपासून राहिले आहे. आता कल्याण जिल्हा भाजपचे उद्दिष्ट ‘आगामी महापालिका निवडणुका’ राहणार आहे. रविवार, दि. 6 एप्रिल रोजी भाजपचा स्थापना दिवस आहे. त्यानिमित्ताने कल्याण-डोंबिवली स्थानिक पातळीवर पुढील वाटचाल कशी राहील, काय उद्दिष्ट आणि ध्येय राहील, याबाबत डोंबिवली भाजप पश्चिम मंडल अध्यक्ष समीर चिटणीस आणि डोंबिवली पूर्व मंडल अध्यक्ष मुकुंद पेडणेकर यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या कल्याण-डोंबिवली प्रतिनिधी जान्हवी मोर्ये यांनी साधलेला संवाद...
 
पक्षाने सुरू केलेल्या प्राथमिक सदस्यनोंदणी अभियानावेळी तुमचा अनुभव कसा होता?
 
समीर - भाजपने राबविलेल्या प्राथमिक सदस्यनोंदणी अभियानाचा अनुभव अत्यंत प्रेरणादायी होता. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ‘डबल इंजिन’ सरकारने केलेली विकासकामे आणि भाजपचे कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची विकासकामे, त्यांचे मतदारांशी असलेले सलोख्याचे संबंध आणि तळागाळातील कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत, या सर्वांची फलश्रुती म्हणजे डोंबिवलीचे सदस्यनोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करता आले. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदणीला मिळाला.
 
मुकुंद - आ. रविंद्र चव्हाण यांनी प्राथमिक सदस्यनोंदणीसाठी नागरिकांना आवाहन केले. त्या आवाहनाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रात 1 कोटी, 45 हजार प्राथमिक सदस्यनोंदणी करण्याचे उद्दिष्ट होते. आता तो आकडा भाजपने पार केला आहे. लोकांच्या चेहर्‍यावर भाजपचे सदस्य झाल्याचा एक आनंद पाहायला मिळाला, ते समाधानकारक होते.
 
भाजपच्या मागील महापालिका निवडणुकीत आपल्यासह डोंबिवली पूर्वेत नऊ नगरसेवक निवडून आले होते. आगामी महापालिका निवडणुकीत तुम्ही काही उद्दिष्ट्य ठरविले आहे का?
 
मुकुंद - ‘कोविड’ काळात नगरसेवकांचा कार्यकाल संपला. ‘कोविड’मुळे पुन्हा निवडणुका झाल्या नाहीत. या काळात प्रभागातील कामे कशी करायची, हा मोठा प्रश्न होता. पण, आ. रविंद्र चव्हाण यांनी निधी उपलब्ध करून दिला. त्या सहकार्यातून काम उभे केले. प्रभागातील अनेक प्रकारच्या समस्या त्या निधीतून सोडविल्या. डोंबिवलीतून जास्तीत जास्त भाजपचे नगरसेवक निवडून येतील आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपचा महापौर बसविण्याचे स्वप्न आहे, ते पूर्ण होईल.
 
डोंबिवली पश्चिमेत मागील निवडणुकीत सहा नगरसेवक होते. आगामी निवडणुकीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी तुम्ही काही ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ आखला आहे का?
 
समीर - ‘शत प्रतिशत भाजप’ हे भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाचे स्वप्न आहे. संसदेपासून ते पंचायत समितीपर्यंत भाजपचे प्रस्थ असावे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत सत्ता मिळविणे, हे आमचे उद्दिष्ट आहेच. प्रत्येक पक्षाचा निवडणुकीसाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार असतो. पण, तो सर्वांसमोर उघड केला जात नाही. योग्य वेळ आल्यावर भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्याची अंमलबजावणी करतात. आमच्या सगळ्यांचे ध्येय भाजपचे महापौर बसविणे, हेच असणार आहे.
 
शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण आतापर्यंत कोणकोणते कार्यक्रम लावले आहेत?
 
मुकुंद - सरकारी योजना तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि ते पोहोचविण्याचे काम भाजपचे कार्यकर्ते करीत आहेत. या योजना जास्तीत जास्त माजी नगरसेवकांनी, पदाधिकार्‍यांनी प्रभागात राबवाव्या, असे आ. रविंद्र चव्हाण यांनी आवाहन केले होते. ‘अटल योजना’, ‘लाडकी बहीण योजना’, ‘सुकन्या योजना’ अशा अनेक योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. दि. 9 एप्रिल, दि. 11 एप्रिल आणि दि. 12 एप्रिल रोजी एका शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात सर्व योजनांचा समावेश आहे. जेणेकरून या योजनांचा नागरिकांना लाभ घेणे शक्य होईल.
 
डोंबिवली पश्चिमेतही रेशनकार्ड, आधारकार्ड यांसारखे अनेक कार्यक्रम राबविले जातात, याबद्दल काय सांगाल?
 
समीर - ‘अंत्योदय’ ही भाजपची संकल्पना आहे. समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत या योजना पोहोचल्या पाहिजेत, त्यादृष्टीने आम्ही काम करीत आहोत. ‘आयुष्मान भारत कार्ड योजना’, ‘रेशनकार्ड दुरुस्ती’ अशी वेगवेगळ्या प्रकारची शिबिरे आयोजित करतो. आ. रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर भरवितो. डोंबिवली पश्चिमेत ‘कडोंमपा’च्या मदतीने ‘कोविड’काळात लसीकरण करण्याचे शिबीर भरविले होते. हयातीचा दाखला मिळविणे हा एक मोठा विषय आहे. हा दाखला प्रत्येक निवृत्तिवेतनधारकाला द्यावा लागतो. त्यांना उन्हात फिरावे लागते किंवा बँकेत रांगेत उभे राहावे लागते. या योजना राबविल्यामुळे नागरिकांचा त्रास कमी होतो. त्यामुळे पदाधिकार्‍यांनाही समाधान मिळते.
 
आ. रविंद्र चव्हाण यांच्यावर पक्षाने ‘महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष’ अशी मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांच्या ‘होमपीच’वर पक्षाचे काम करताना आता जबाबदारी वाढल्यासारखे वाटते का?
 
समीर - आ. रविंद्र चव्हाण यांच्या ‘होमपीच’वर काम करताना जबाबदारी निश्चितच वाढली आहे. भाजप हा एक परिवार आहे. डोंबिवलीतील भाजपचे चव्हाण साहेब हे कुटुंबप्रमुख आहेत. कुटुंबप्रमुखासाठी आपण काम करतो, ही जाणीव कार्यकर्त्यांना असते. त्यामुळे सर्वजण नेटाने काम करतात.
 
भाजपच्या स्थापना दिवसानिमित्ताने कार्यकर्त्यांना काय संदेश द्याल?
 
मुकुंद - सरकारच्या योजना आहेत त्या तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी केले पाहिजे. या योजनेचा फायदा नागरिकांना व्हावा, यासाठी शिबीर लावले पाहिजे. नागरिकांपर्यंत योजना पोहोचविणे आणि त्यांना त्यांचा फायदा करून देणे, हेच मोठे काम आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
फक्त एक तास द्या वक्फ सुधारित कायद्यात..., ओवैसींच्या १५ मिनिटांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस खासदार इम्रान मसूदने तोडले अकलेचे तारे

"फक्त एक तास द्या वक्फ सुधारित कायद्यात...", ओवैसींच्या १५ मिनिटांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस खासदार इम्रान मसूदने तोडले अकलेचे तारे

Imran Masood एमआयएमचे नेते असिदुद्दीन ओवैसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांनी एका सभेतून केवळ १५ मिनिटे द्या आम्ही काय करतो पाहा, असे देश विघातक वक्तव्य केले होते. त्यानंतर आता संसदेत नुकतेच वक्फ सुधारित कायद्याला मंजूरी देण्यात आली. त्याविरोधात मु्स्लिम समाज आंदोलन करत आहे. याचपार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार इम्रान मसूदने वक्फ सुधारणा कायद्याबाबत मोठे विधान केले आहे. आम्ही सत्तेत आलो तर एका तासात वक्फ कायद्यात बदल करणार असल्याची धमकी वजा इशारा दिले आहे. ते हैदराबादमध्ये १३ एप्रिल रोजी मुस्लिम मिल्ली काउन्सिल..

ममता बॅनर्जी अधुनिक जिना, भाजप नेते तरुण चुघ यांची ममता सरकारवर बोचरी टीका! पश्चिम बंगालमध्ये वक्फ विरोधात हिंसक परिस्थिती कायम

ममता बॅनर्जी अधुनिक जिना, भाजप नेते तरुण चुघ यांची ममता सरकारवर बोचरी टीका! पश्चिम बंगालमध्ये वक्फ विरोधात हिंसक परिस्थिती कायम

Mamata Banerjee "पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आधुनिक जिना म्हणून कार्यरत आहेत. जिना जे काम करत होते आता तेच काम ममता बॅनर्जी करत आहेत. मुर्शिदाबादमध्ये घडलेल्या घटना या १९४० सालतील मुस्लिम लीग कृतीप्रमाणेच घडताना दिसतात", अशी बोचरी टीका भाजप नेते तरुण चुघ यांनी १३ एप्रिल रोजी रविवारी प्रसारमाध्यमाशी बोलताना केली आहे. वक्फ सुधारित विधेयकावरून पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये हिंसक परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ममता सरकार सपशेल अयशस्वी ठरले आहे...

कल्याणमधील आरोपी विशाल गवळी याची तळोजा कारागृहात आत्महत्या

कल्याणमधील आरोपी विशाल गवळी याची तळोजा कारागृहात आत्महत्या

कल्याणमधील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याने रविवारी सकाळी तळोजा कारागृहात आत्महत्या केली आहे. या प्रकरणात आरोपी विशाल याला अटक झाल्यापासूनच समाजातील सर्वच स्तरातून त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली जात होती. परंतु आज विशालच्या आत्महत्येमुळे पिडीतेला नैसर्गिकरित्या न्याय मिळाला आहे असे म्हणत समाजाच्या विविध स्तरातून आनंद व्यक्त केला जात आहे . पिडीतेला न्याय मिळाला असला तरी कायद्याने त्याला फाशी झाली असती तर इतरांवर कायद्यांचा धाक राहिला असता असे सर्वच स्तरातून बोलले जात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121