पालघर : ( Bhoomi Pujan Palghar District Office of Bharatiya Janata Party ) पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, खासदार हेमंत सावरा, आमदार श्री हरिश्चंद्र भोये , भाजपा जेष्ठ कार्यकर्ते माननीय श्री बाबजी काठोले सर यांच्या शुभहस्ते पार पडला.
कार्यक्रमास संपूर्ण जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सदर प्रसंगी कार्यकर्ते यांना संबोधित करताना मान्यवरांनी पालघर जिल्हा भाजपामय करणे, येणाऱ्या जिल्हा परिषद- पंचायत समिती- नगरपालिकेत प्रचंड बहुमताने जिल्हा परिषद अध्यक्ष- पंचायत समिती सभापती व प्रत्येक नगरपालिकेत भाजपाचा नगराध्यक्ष हे लक्ष ठेवून काम करावे असे आवाहन करण्यात आले.
नवीन जिल्हा कार्यालय हे पालघर मधील जनतेचे सत्ता केंद्र बनले पाहिजे व यासाठी भाजपा खासदार, आमदार जिल्हाध्यक्ष स्वतः सदर कार्यालयात उपलब्ध असतील व जनतेची कामे करतील असे आश्वासनही देण्यात आले.
भाजपा म्हणजे एक अविरत- अथक काम करणारा परिवार आहे. परिवारातील प्रत्येक सदस्य आपले सर्वस्व झोकून जनतेची कामे करीत असतो व त्यामुळेच भाजप हा एक प्रामाणिक, जनहितकारी, प्रगतिशील परिवार बनला आहे. महाराष्ट्रात भाजपाचे दीड कोटी प्राथमिक सदस्य बनले आहेत व हे जनतेच्या भाजपा वरील विश्वासाचे द्योतक आहे. आजच्या स्थापनादिनी, पुन्हा एकदा सर्वांनी जनतेसाठी- देशासाठी सतत काम करण्याची शपथ घेत कार्यक्रमाची सांगता केली.