मुंबई : भाजपने माजी खासदार किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना राज्य सरकारने वक्फनंतर आता मशिदींवरील भोंग्यावरून लक्ष्य केले आहे. याआधी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोंग्यावर भाष्य केले होते. ठरवून दिलेल्या नियमालीचे पालन करावे असा दावा फडणवीसांनी केला होता. सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत भोंगे लावता येणार आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील भोंग्यांवर बंदी आणली आहे. अशातच आता राज्यातील मशिदींवर सुरू राहणाऱ्या भोंग्यांविरोधात राज्य सराकार पाऊल उचलत आहेत. किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना माझी या विषयावर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली असल्याचा दावा किरीट सोमय्याने केला आहे.
Mumbai, Maharashtra: BJP leader Kirit Somaiya says, "Chief Minister Devendra Fadnavis had made an announcement in the Vidhan Sabha. I’ve had a detailed discussion with the CM. The process of drafting new rules and guidelines has already begun. Within 15 days, those guidelines… pic.twitter.com/x6AQUQBTJH
भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत भोंग्यांच्या मुद्द्याला घेऊन घोषणा केली होती. माझी मुख्यमंत्र्यांसोबत एक सविस्तर चर्चा झाली आहे. नवीन नियम आणि मार्गदर्शक तत्वे तयार करण्याची प्रक्रिया आधीच सुरू झालेली आहे. १५ दिवसांच्या आतमध्ये, ती मार्गदर्शक तत्वे कायद्याचा भाग बनतील आणि त्यानंतर कोणत्याही अवैध मशिदी, अनधिकृतपणे आणि साऊंड अशा अवैध परवानग्यांवर कठोर कारवाई करण्यात येतील, असे आदेश देण्यात आला आहे. जर ठरवून दिलेल्या वेळेत म्हणजेच ७२ तासात भोंगे वाजवणे बंद करण्यात यावे अन्यथा ७२ तासात कारवाई करण्यात येणार आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून त्यात एकूण ७२ मशिदींची नावे आहेत.
72 मशीद/भोंगे शिवाजी नगर गोवंडी मुंबई
रोज भोंगे जोरात वाजत आहे... लाऊडस्पिकरच/भोंग्याची परवानगी एकही मशिदनी घेतलेली नाही काल शिवाजी नगर पोलीस ठाण्यात आम्ही तक्रार केली
उद्या पासून कारवाई होणार
अनधिकृत मस्जिदी/भोंगे यादी
1 अलभदिना मस्जिद व मदरसा आता-ए- रसुल तालीमुल कुराण
दरम्यान किरीट सोमय्यांनी अनेकदा हा मुद्दा लावून धरलेला होता. त्यानंतर त्यांनी अनेकदा याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. भोंग्यामुळे आजूबाजूला वास्तव्यास असणाऱ्यांना ध्वनी प्रदूषण निर्माण होऊन नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही समस्या मुंबईतील सर्वात मोठी समस्या आहे. एवढेच नाहीतर सोमय्या यांनी याआधीही बांगलादेशी घुसखोरांवर विविध शहरात जाऊन तक्रार दाखल केल्या होत्या. त्यानंतर आता त्यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.